Posts

Showing posts from August, 2023

ओशो वाणी भाग 29.

 मृत्यूची घटना अतिशय रहस्यमय आहे, आणि त्याच प्रमाणे आत्महत्येची घटनाही.पृष्ठभागावरून हे निश्चित करू नका की आत्महत्या काय आहे?अनेक गोष्टी असू शकतात.मला स्वतःला असे वाटते की जे लोक आत्महत्या करतात हे या जगातील खूप संवेदनशील, खूप प्रतिभावान लोक आहेत.त्यांच्या संवेदनशील आणि प्रतिभावान असल्यामुळे त्यांचा या विक्षिप्त जगाशी ताळमेळ बसू शकत नाही.समाज विक्षिप्त आहे,तो विक्षिप्त पायावर आधारलेला आहे.त्याचा सर्व इतिहास वेडेपणा, हिंसा, युद्ध आणि विध्वंसाचा आहे.कुणी म्हणते की माझा देश जगातील महानतम देश आहे,आता ही विक्षिप्तता आहे.कुणी म्हणतो की माझा धर्म जगातील महानतम आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आता ही विक्षिप्तता आहे आणि ही विक्षिप्तता रक्त मास मज्जा या पर्यंत जाऊन पोहोचली आहे.आणि लोक खूप खूप निस्तेज आणि संवेदनाहीन झाले आहेत.त्यांना व्हावे लागते, नाहीतर जगणे मुश्किल होऊन जाते.या चारी बाजूंना पसरलेल्या संवेदनाहीन समाजात तुम्हालाही संवेदनाहीन होऊन जावे लागते.अन्यथा तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊ लागता.जर तुम्ही समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊ लागलात तर समाज समजतो की तुम्ही वेडे झाला आहात .खरे तर समाज वे