Posts

Showing posts from April, 2023

ओशो वाणी भाग 18

 ओशो वाणी भाग 18.                          तिसरा स्तर आपल्या वेदनांचा आहे, आपल्या संवेदनांचा आहे .24तास आपण कुठल्या ना कुठल्या संवेदनांनी घेरलेले असतो एकतर आपण सुखाने घेरलेले असतो किंवा दुःखाने वेढलेले असतो.जेव्हा दुःख असते, तेव्हा आपण दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आणि सुखाची आकांक्षा करतो. हेच आपले टेन्शन, हीच आपली समस्या असते ,हाच आपला त्रास असतो. जेव्हा सुख येते, तेव्हा आपल्या मनात ही भीती निर्माण होते की पुन्हा दुःख तर येणार नाही? म्हणून आपण सुखाला पकडून ठेवण्याची इच्छा करतो,आणि दुःखाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा टेन्शन,त्रास आणि तणाव कायम राहतो. माणूस खूप विचित्र परिस्थितीत आहे. दुःख असेल तेव्हा तो दुःख सहन करतो, यासाठी दुःख सहन करतो कि दुःख आहे आणि ते दूर व्हावे,आणि सुख असेल तर यासाठी  दुःखी होतो की सुख तर आहे,पण दुःख येऊ नये. दुःख बाहेर राहावे आणि सुख कायम राहावे. सुखाला पकडू इच्छितो, दुःखाला दूर हटवायला पाहतो. दुःखाला दूर करण्यात आणि सुखाला पकडण्यात ,दोन्ही परिस्थितीत उत्तेजना निर्माण होते. दुःखही एक उत्तेजना आहे ,ती व अप्रितिकर उत्तेजना आहे.सुख ही एक उत्ते

ओशो वाणी भाग 17

 ओशोवाणी भाग 17.                        जीवनात दुःखही आहे आणि सुखही. कारण जन्मही आहे,आणि मृत्यूही.पण या गोष्टीवर बरेच काही अवलंबून आहे, की दोन्हीपैकी आपण कुणाची निवड करून जीवनाचा पाया रचतो? जर कोणी व्यक्ती मृत्यूची निवड करून जीवनाचा पाया रचत असेल,तर मग जन्मही केवळ मृत्यूची सुरुवात वाटेल. आणि जर कुणी जीवनाची निवड करून पाया रचत असेल तर मग मृत्यूही जीवनाची परिपूर्णता आणि जीवनाचा शेवटचा बहार वाटू लागतो.जर एखादा व्यक्ती दुःखाला जीवनाचा आधार म्हणून  निवडत असेल तर सुख ही फक्त दुःखात जाण्याचा उपाय दिसू लागेल आणि जर एखादा व्यक्ती सुखाला जीवनाचा आधार बनवेल तर दुःखही केवळ एका  सुखातून दुसऱ्या सुखात परिवर्तन होण्याची मधली कडी वाटू लागेल. हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे, आपण कशाची निवड करतो याने संपूर्ण जीवनाची व्यवस्था बदलून जाते.जीवनात अशांती आहे, शांती ही आहे. आपण कशाची निवड करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. ध्यान अशांती ला जीवनाच्या आधारापासून हटवण्याची विधी आहे आणि जीवनाच्या आधारात मौन आणि शांती ठेवण्याची व्यवस्था आहे. पण आपण अशांत होण्यामध्ये खूप निष्णात आहोत.आणि आपण कोणतीच

ओशो वाणी भाग 16

 ओशो वाणी भाग 16.                         समस्या तर आहेत,समस्या चारी बाजूंना आहेत,पण तुम्ही स्वतः समस्या नाहीत. तुम्ही त्यांच्या पार जाऊ शकता. तुम्ही त्यांना एका दृष्ट्या प्रमाणे अशाप्रकारे पाहू शकता , जसे तुम्ही शिखरावर उभे राहून दरीमध्ये वाकून पहात आहात. दृष्टा होऊनच तुम्ही समस्यांचे समाधान करू शकता. वास्तविक पाहता एखाद्या समस्येचे दृष्टा होण्यातच ती समस्या अर्धी सुटून जाते,कारण जेव्हा तुम्ही तिला पाहू शकता, तिचे तटस्थ अवलोकन करू शकता, तेव्हा तुम्ही तिच्यापासून बिलकुल दूर राहू शकता, अस्पर्शित राहू शकता.तर तुमच्या डोळ्यात एक स्पष्टता येते.ती स्पष्टता तुम्हाला ही समस्या सोडविण्याची किल्ली प्राप्त करून देते आणि अधिकांशतः  तर साऱ्या समस्या अस्तित्वातच यासाठी असतात की आपल्या जवळ ती स्पष्टता नसते जिने आपण त्यांना समजून घेऊ शकतो. तुम्हाला समस्येच्या समाधानाची आवश्यकता नाही,स्पष्टतेची आहे. समस्येला जर योग्य प्रकारे समजून घेतले गेले, तर ती सुटू शकते कारण समजदारी च्या अभावामुळे समस्या निर्माण होते.तुम्ही समस्या निर्माण करता कारण तुम्हाला समज नाही,तर मूळ प्रश्न समस्येला सोडविणे हा नाही.मूळ प्रश

ओशो वाणी भाग 15

 ओशो वाणी भाग 15.                        जे लोक जीवनात लीन होतात आणि आणि जे जीवनाला पूर्णपणे पिऊन घेतात, जे जीवनाला पूर्णपणे आत्मसात करतात, ते जीवनाचा साक्षात्कार पण करू शकतात.ही गोष्ट थोडी समजून घेणे आवश्यक आहे कारण जी गोष्ट याच्या पूर्णपणे विरोधी आहे, त्याची मुळे आपल्या खूप खूप खोलवर गेलेली आहेत.जीवनाला सर्व बाजूंनी सोडून देण्याचा, त्याचा त्याग करण्याचा भाव हजारो वर्षांपासून आपल्या मध्ये आहे. तो खूप खोलवर आपल्या अन कॉन्शस पर्यंत, आपल्या अचेतन मनापर्यंत प्रविष्ट झालेला आहे. भोजन करावयाचे असेल तर अस्वादाने भोजन करावे, स्वाद घेणे पाप आहे. शिक्षक समजावतात की स्वाद घेणे पाप आहे. अस्वाद. स्वाद घेऊ नका, संगीत ऐकू नका. कारण संगीता चा रस तर इंद्रियाचे सुख आहे. कानाचे सुख आहे. सौंदर्य पाहू नका, कारण सौंदर्य..सौंदर्य तर रूप आहे .डोळे फोडून घ्या, तर तुम्ही त्यागी आहात कारण सौंदर्य तर रूप आहे, डोळ्यांचे सुख आहे. ही तर सगळी इंद्रियांची सुखे आहेत. या सर्वांना सोडून द्या, या सर्वांचा त्याग करा,आणि इंद्रियांचे सर्व द्वार बंद केले गेले तर माणसात काय शिल्लक राहते?तुम्हाला माहित आहे? काही नाही. नकार.इंद

ओशो वाणी भाग, 14

 ओशो वाणी भाग 14.                          या जगात प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचे एक प्रयोजन आहे, एक लक्ष्य आहे, जे त्याला पूर्ण करावयाचे आहे. पण प्रत्येक व्यक्ती मनातून अनेक खंडांमध्ये विभागला गेलेली आहे, कारण त्याला आपल्या लक्ष्याचा बोध नाही. त्याचे संपूर्ण चित्त त्या उसण्या घेतलेल्या लक्ष्यानी भरलेले आहे जे दुसऱ्यांनी त्याला दिलेले आहेत. जर तुम्ही हे जाणत नसाल की तुमच्या असण्याचे, तुमच्या अस्तित्वाचे काय लक्ष्य आहे ?जर तुम्ही हे जाणत नसाल की वास्तवात तुम्हाला काय व्हायचे आहे ,आणि काय करावयाचे आहे? तर सगळं काही एक दिशा भ्रम बनून जाते. कधी तुम्ही तिकडे ओढले जाता, तर कधी इकडे.तुम्ही वेगवेगळ्या दिशांना भटकत राहताआणि हेच संपूर्ण विषादाचे कारण आहे. तुम्ही एवढ्या दिशांमध्ये विभक्त झालेले आहात की तुमचे संपूर्ण व्यक्तित्व खंड खंड होऊन गेले आहे.एक खंड उत्तरेच्या दिशेने जात आहे,तर दुसरा खंड दक्षिणेकडे. तुम्ही सतत एका संघर्षांमध्ये जगत आहात. तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्ही कोणत्या दिशेला जात आहात, कारण तुमचे कोणतेही एक व्यक्तित्व नाही. तुम्ही एक अखंड व्यक्ती तेव्हाच बनू शकता ज्यावेळी तुम्हाला

ओशो वाणी भाग 13

 ओशो वाणी भाग 13.                          एक प्रामाणिक चित्त, एक ऑथेन्टीक माईंड असले पाहिजे. आमचे सारे चित्त औपचारिक आहे, फॉर्मल आहे, प्रामाणिक नाही. ना आपण कधी प्रामाणिक रूपाने प्रेम केले आहे, ना प्रामाणिकपणे कधी घृणा केली आहे, ना प्रामाणिकपणे क्रोध केला आहे, ना कधी प्रामाणिक रूपाने कुणाला क्षमा केली आहे. आमच्या चित्ताचे सारे आवर्तन,आमच्या चित्ताचे सारे रूप औपचारिक आहे, खोटे आहे, मिथ्या आहे.आता मिथ्या चित्ताला घेऊन जीवनाचे सत्य कुणी कसे जाणून घेऊ शकेल? सत्य चित्ताला घेऊनच जीवनाच्या सत्याशी संबंधित होता येईल.आमचे सर्व माईंड, आमचे सर्व चित्त, आमचे सर्व मन मिथ्या आणि औपचारिक आहे हे समजून घेणे उपयोगी आहे. सकाळी सकाळी आपण आपल्या घराच्या बाहेर आला आणि रस्त्यावर तुम्हाला कुणी दिसले आणि तुम्ही त्याला नमस्कार केला,  तुम्ही त्याला म्हणता की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला,तुमचे दर्शन झाले,खूप छान वाटले.पण मनातल्या मनात तुम्ही असा विचार करता कि या दुष्टाचा चेहरा सकाळी सकाळी कुठून दिसला असेल?हे अन ऑथेंटिक माईंड आहे. इथे गैर प्रमाणिक मनाची सुरुवात झाली. 24 तास आपण असेच दुहेरी प्रकारे जीवन जगत असतो.

ओशो वाणी भाग 12

 ओशो वाणी भाग"12                     माझी धारणा खूप वेगळी आहे, तिला समजून घ्याल तर एक नवीन दृष्टी मिळू शकते.जेव्हा एक माणूस धनाच्या शोधात असेल, तर आपण असा विचार करतो की तो ईश्वराच्या विरुद्ध शोध घेत आहे.मी असा विचार करत नाही. मी असे समजतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. जेव्हा एक माणूस पदाचा शोध घेत आहे, तेव्हा लोक विचार करतात की तो ईश्वराच्या विपरित  काहीतरी शोधत आहे. मी विचार करतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. आणि मी  त्याला याप्रकारे समजतो.एका माणसाची आपण कल्पना करू, तुमचेच उदाहरण घेऊ. मी जर तुम्हाला म्हणेल की आपण किती धनाने तृप्त व्हाल? तर आपले मन एक आकडा ठरवेल,तत्काळ, आणि पुढे निघून जाईल की एवढ्याने काम चालणार नाही. मी कोणताही आकडा तुम्हाला सांगेन, कुठलीही संख्या ,आणि तुमचे मन म्हणेल की एवढ्याने भागणार नाही. याचा अर्थ काय झाला?याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत अनंत धन भेटणार नाही, तोपर्यंत तुमचे काम चालणार नाही. तुम्हाला मी म्हणेल , की मोठ्यात मोठे पद तुम्ही घ्या. हे पद तुम्ही घ्या आणि यानंतर मागू नका. तुम्ही शेवटचे पद मागा. तर कदाचित तुम्ही निर्णय करू शकणार नाही. खरेतर परम पद भेटल्य

ओशो वाणी भाग 11

 ओशो वाणी भाग-11.                         या विश्वात काहीही असंबंधित नाही. एव्हरीथिंग इज रिलेटेड, दि वर्ल्ड इज अ फॅमिली. हे जे जग आहे,एक परिवार आहे.तिथे  असंबंधित काहीही नाही.तिथे सर्व काही जोडलेले आहे. तुटलेले काहीही नाही.तिथे दगडाशी माणूस जोडलेला आहे,जमिनीशी चंद्र-तारे जोडलेले आहेत. चंद्र तार्‍यां शी आपल्या हृदयाची धडधड जोडलेली आहे,आपले विचार सागराच्या लाटांशी जोडलेले आहेत. पर्वतांवर चमकणारे बर्फ आपल्या मनात चालणाऱ्या स्वप्नांशी जोडलेलेआहे.तिथे तुटक असे काही नाही. तिथे सगळे काही संयुक्त आहे, इथे सर्व एकत्र आहे, इथे वेगळे वेगळे होण्याचा उपाय नाही, कारण इथे मध्ये अंतर नाही, जिथून वस्तू तुटतील. वेगळे असणे,तूटलेले असणे हा केवळ आपला भ्रम आहे. यासाठी योगाचे चौथे सूत्र आपणास सांगत आहे:ऊर्जा संयुक्त आहे,ऊर्जा एक परिवार आहे. न चेतन अचेतन यापासून तुटलेले आहे न अस्तित्व अनास्तित्वा पासून तुटलेले आहे, न पदार्थ मनापासून तुटलेला आहे, न शरीर आत्म्यापासून तुटलेले आहे. न परमात्मा पृथ्वीपासून तुटलेला आहे, प्रकृतीपासून तुटलेला आहे. तुटलेला असणे हा शब्दच खोटा आहे. सर्व काही जोडलेलेआहे. सर्व एकत्र आहे, स

ओशो वाणी भाग 10

 ओशोवाणी भाग-10.                          आज पर्यंत ज्या सूत्रावर आम्ही मनुष्याचे निर्माण करण्याचे प्रयत्न केले ते सूत्र असे आहे की मनाला,चित्ताला पळवा,त्याच्या आत्म्याला व्यथित आणि त्रस्त करा, त्याच्या आत्म्या मध्ये विष भरून टाका वेडेपणाचे ,की तो वेडा होऊन जाईल यासाठी, की मी काही बनून दाखविन,मी काही होऊन दाखविन. आणि याच ज्वराच्या आधारे माणसाकडून काम करून घ्या.हे काम स्वस्थ नाहीये.आम्ही जे कोणते काम करत आहोत, ते सारे काम अस्वस्थ आहे, ज्वरग्रस्त आहे, फिवरीश आहे, कारण आपल्या अंतर्यामी प्राण वेड्यासारखे धावत आहेत. आम्ही काम करण्यात उत्सुक नाही आहोत, तर आम्ही  पुढे  जाण्यामध्ये उत्सुक आहोत.त्यामुळेच कुठलेही काम आनंद देत नाही, कुठलेही काम शांती देत नाही, कोणतेही काम जीवनाची प्रफुल्लता बनत नाही, कोणतेही काम संगीत नाही बनू शकत, कोणतेही काम प्रार्थना बनू शकत नाही. प्रत्येक कामाला आपण शिडी बनवतो की आपण त्याद्वारे अजून पुढे पोहोचू. आणि पुढे पोहोचूनही  काही फरक पडणार नाही. अजून पुढच्या पायऱ्या दिसू लागतील आणि कुठेही पोहोचून काहीही फरक पडणार नाही. आम्ही जिथे पोहोचू,आपली नजर पुढची असेल आणि आपण जिथे

ओशो वाणी भाग 9

 ओशोवाणी भाग 9.                      एका वाळवंटातील धर्मशाळेत एक  मोठा उंटांचा काफिला आला होता. यात्री थकलेले होते आणि उंट ही थकले होते. उंटांच्या मालकाने खुंट्या गाडल्या आणि त्यांना उंटांसाठी दोर खंड बांधले जेणेकरून उंट विश्रांती घेऊ शकतील. पण खुंट्या गाडताना हे लक्षात आले की त्या पैकी एका उंटाची खुंटी आणि दोर हरवले होते.त्या उंटाला मोकळे सोडणेही कठीण होते कारण रात्री अंधारात तो हरवण्याची शक्यता होती. त्यांनी धर्मशाळेच्या मालकाला जाऊन सांगितले की जर आम्हाला एक दोर आणि खुंटी भेटली तर आपली मोठी कृपा होईल कारण आमची खुंटीआणि दोर हरवला आहे. धर्म शाळेचा मालक म्हणाला, खुंटी आणि दोरखंड तर आमच्याकडे नाहीत, पण तुम्ही असे करा, खुंटी काढा, दोर बांधून टाका, आणि उंटाला म्हणा की झोपी जा. काफिल्याचा मालक खूप आश्चर्यचकित झाला.तो म्हणाला की जर खुंटी आणि दोर आमच्याकडे असले,तर आम्ही स्वतः उंटाला बांधले नसते का? आता आम्ही कोणती खुंटी गाडावी आणि कोणती दोरी बांधावी? धर्मशाळेच्या मालक यावर हसायला लागला आणि म्हणाला, हे आवश्यक नाही की उंटाला खरी खुंटी आणि खऱ्या दोरीने बांधावे. नकली  खुंटी ने उंटाला बांधले जाऊ

ओशो वाणी भाग 8

 ओशोवाणी भाग 8.                            जेव्हा तुम्हाला कुणी शिव्या देईल तेव्हा तुम्ही दोन काम करू शकता. एक जे तुम्ही करता कि जेव्हा  तुम्हाला कुणी शिव्या देतो तेव्हा तुम्ही शिव्या देता.. जर शिव्या देणारा तुमच्यापेक्षा शक्तिशाली असल्याचे दिसले तर मनातल्या मनात शिव्या देता आणि वर वर हसत राहता. जर समोरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा कमजोर दिसला तर उघड उघड स्वरूपात शिव्या देता. एका छोट्या शाळेत एक ख्रिश्चन पादरी मुलांना समजावत होता की क्षमा केली पाहिजे.  क्षमा मोठा गुण आहे. जेव्हा तुम्हाला कोणी शिव्या देईल त्याला क्षमा करून टाका. मग त्याने एका लहान मुलाला विचारले की बोल, मी सांगितलेले तुला समजले? तो म्हणाला, बिलकुल समजले, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर मी बिलकुल सहजपणे क्षमा करून टाकतो पण आपल्यापेक्षा लहानांना क्षमा करणे असंभव आहे. आपल्याहून मोठ्यांना मी सहजपणे माफ करू शकतो पणआपल्याहून लहानांना क्षमा करणे असंभव आहे. कमजोर व्यक्तीला क्षमा करणे असंभव आहे. शक्तिशाली व्यक्तीला तर तुम्ही माफ करूनच टाकता कारण झंझट आहे, पण ज्या दिवशी तुम्ही एखाद्या कमजोर व्यक्तीला क्षमा करून टाकाल त्यादिवशी तुमच्या आयुष्

ओशो वाणी भाग 7

 ओशो वाणी भाग 7.                           एका फकिराची गोष्ट मला आठवते.. एक छोटीशी फकिराची झोपडी होती. रात्र होती, जोराचा पाऊस चालू होता. रात्रीचे बारा वाजले असतील, फकीर आणि त्याची पत्नी दोघे झोपले होते,कुणी माणसाने दरवाजा ठोठावला. छोटीशी झोपडी होती, कदाचित कुणाला आश्रय पाहिजे असेल. त्या फकीराने आपल्या पत्नीला सांगितले की द्वार उघड, कुणीतरी दारात उभा आहे, कुणी यात्री, कुणी अपरिचित मित्र. ऐकले तो काय म्हणाला? तो म्हणाला, कुणी अपरिचित मित्र. आपले तर जे परिचित आहेत, तेही मित्र नसतात. तो म्हणाला, कुणी अपरिचित मित्र!हा प्रेमाचा भाव आहे. कुणी अपरिचित मित्र दारात उभा आहे, दार उघड. त्याची पत्नी म्हणाली, पण जागा तर फार कमी आहे, आपल्या दोघांच्या लायकच मुश्किलीने आहे. त्यात कुणी तिसरा माणूस मध्ये आला तर आपण काय करायचे? तो फकीर म्हणाला, वेडे, हा कुण्या श्रीमंतांचा महाल नाही की छोटा पडेल, ही गरीबाची झोपडी आहे. श्रीमंतांचा महाल छोटा पडतो नेहमी, एक पाहुणा आला तर महाल छोटा पडतो त्यांचा. ही गरीबाची झोपडी आहे. त्याची पत्नी म्हणाली, यात झोपडी, श्रीमंत आणि गरीब याचा काय प्रश्न? जागा लहान आहे. तो फकीर म्हण

ओशो वाणी भाग 6

 ओशो वाणी भाग 6.ओशो वाणी भाग 6                              जे सहज घडत असेल, तेच कर्तव्य आहे. जे जबरदस्तीने करावे लागेल, तेच अकर्तव्य आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण तुमची परिभाषा अगदी उलट आहे. तुम्ही तर कर्तव्य त्यालाच म्हणता, जे नाईलाजाने करावे लागत आहे. बाप आजारी आहे, पाय दाबावे लागत आहेत, तुम्ही म्हणता, कर्तव्य करीत आहोत.. याचा अर्थ असा आहे की मरा तरी, किँवा बरे तरी व्हा, कर्तव्य करून घेऊ नका. आता हे कोणत्या पापांचे फळ भोगावे लागते आहे की आता सिनेमा पहायला गेलो असतो, की क्लबमध्ये नाच होत असता, की रोटरीची बैठक होत आहे.. आणि आता हे बापाचे पाय दाबावे लागत आहेत. कुणी सांगितले होते आम्हाला जन्म द्यायला? हे सर्व विचार मनात उठत आहेत. कर्तव्याचा अर्थ तुम्हाला समजतो? कर्तव्याचा अर्थ आहे: जे तुम्हाला करायची इच्छा नव्हती आणि करावे लागत आहे. तुम्ही एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडता, तेंव्हा तर तुम्ही हे म्हणत नाही की हे कर्तव्य आहे. तेव्हा तुम्ही म्हणता, हे प्रेम आहे. पण जेव्हा तुम्ही आईला पहायला जाता, तेव्हा म्हणता, कर्तव्य आहे. तुम्ही आपल्या प्रेयसीला भेटायला जाता, तेंव्हा म्हणत नाही की कर्त

ओशो वाणी भाग 5.

 ओशो वाणी भाग 5.ओशो वाणी भाग 5                             सुदैवी आहेत ते लोक, ज्यांना कुणी गुरू भेटतो. गुरूचा अर्थ आहे, माणसाच्या रुपात परमात्मा.तो माणूस देखील आहे,तो तुमचया चुका अन तुमची दुःख देखील समजू शकेल अन् तो परमात्मा देखील समजू शकेल. अन् तो परमात्मा देखील आहे. तो तुमची दुःख अन् चुका नुसत्या समजूच नाही शकणार, त्याला नुसती तुमची सहानुभूतीच नाही वाटणार तर तो तुमचे मार्गदर्शनही करू शकेल. पण जर गुरू नाही मिळाला.. जे सोपे नाहीये. कारण शंभर गुरूंची दारे ठोठावली तर नव्यांनव चुकीचे सिद्ध होतील, ते अगदी स्वाभाविक आहे. जगात जिथे खरी नाणी असतात, तिथे खोटी नाणीही चालतात. आणि खोटी जास्त चालतात! तुमच्या खिशात ही एक खरे नाणे असेल, अन् एक खोटे तर तुम्ही खोटं चालवायचा प्रयत्न करता. खरं तर कधीही चालेल. म्हणुन अर्थशास्त्री असे म्हणतात की  खोट्या पैशाला चालायची मोठी सनक असते, ती आधी चालतात. खरी तर तिजोरीत लपून जातात, खोटी बाजारात जातात! ही स्थिती साऱ्या खऱ्या गोष्टींची आहे. खऱ्या गुरूची देखील तीच स्थिती आहे. तुम्हाला तो बाजारात नाही आढळू शकणार. तो तर बाजूला होऊन जातो. बाजारात तुम्हाला तो भेटेल जो

ओशो वाणी भाग 4

 ओशो वाणी भाग 4.ओशोवाणी भाग 4.                            या बोधाने भरायला उशीर की मीच मालक आहे, मीच सृष्टा आहे,जे काही मी करत आहे, त्यासाठी मीच जिम्मेदार आहे.. जीवनात क्रांती घडून येते. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला जिम्मेदार समजाल तोपर्यंत क्रांती असंभव आहे कारण तोपर्यंत तुम्ही निर्भर राहाल. तुम्हाला वाटते की दुसरे तुम्हाला दुःखी करत आहेत तर मग तुम्ही कसे सुखी व्हाल ?हे असंभव आहे कारण दुसऱ्यांना बदलणे तुमच्या हातात नाही .तुमच्या हातात तर फक्त स्वतःला बदलणेआहे .जर तुम्हाला असे वाटते की भाग्या मुळे तुम्ही दुखी होत आहेत तर गोष्ट तुमच्या हाताबाहेर गेली.भाग्य तुम्ही कसे बदलाल? भाग्य तुमच्या वर आहे आणि तुम्ही जर असा विचार करता की जे होत आहे ते तुमच्या नशिबातच विधात्याने लिहिले आहे तर तुम्ही एक परतंत्र यंत्र होऊन जाल. तुम्ही आत्मवान राहणार नाहीत. आत्म्याचा अर्थच हा आहे की तुम्ही स्वतंत्र आहात आणि कितीही पीडा तुम्ही भोगत असाल ते तुमच्याच निर्णयाचे फळ आहे.ज्या दिवशी तुम्ही निर्णय बदलाल त्यादिवशी जीवन बदलून जाईल आणि जीवनाला पाहण्याच्या दृष्टीकोणा वरच सर्व काही अवलंबून असते. मी एके दिवशी मुल्ला नसर

ओशो वाणी भाग, 3

 ओशो वाणी भाग 3.                       प्रत्येक प्रश्न आपल्या जन्मासोबतच स्वतःच्या उत्तरालाही जन्म देत असतो. कुठलेच प्रश्न बिना उत्तराचे नसतात. असा कुठलाही प्रश्न नाही ज्याचे उत्तर नसते. पण दुसऱ्याचे उत्तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर होऊ शकेल की नाही हे सांगता येणार नाही. प्रश्न तुमचा आहे, उत्तर माझे आहे. हे अंतर खूप मोठे झाले. हे अंतर एवढे मोठे झाले की त्यात सेतू निर्माण होईल, हे अंतर पार होऊ शकेल का यात शंकाच आहे.तुम्ही तुम्ही आहात, मी मी आहे. मग माझे उत्तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर कसे बनू शकेल? हा सेतू निर्माण कसा होईल? मग मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर का देतोय? व्यर्थ मेहनत का करतोय? यासाठी नाही की माझी उत्तरे तुमची उत्तरे बनावित तर यासाठी की तुम्हाला हे लक्षात यावे की कुठलाही प्रश्न बिना उत्तराचा नसतो,आणि तुम्ही आपल्या उत्तराच्या शोधात निघावे. मला असे वाटते की तुम्ही आपले उत्तर शोधावे. पण कदाचित आपण उत्तर शोधता शोधता निराश झाला असाल आणि आपण उत्तराचा शोध थांबवला असेल. निराश होण्याचे काही कारणही नाही. स्वतःच्या अंतरात खोलवर खोदत जा, ज्या चित्ताने प्रश्न निर्माण केला आहे, तेच चित्त त्याचे

ओशो वाणी भाग 2

   ओशो वाणी: भाग 2.                             अनुशासन म्हणजे काय? आज जे जगात दिसत आहे, तो तर अर्थ असा आहे की बाहेरून लादलेले नियम. शिक्षक लादतात, आई वडील लादतात, शाळा लादतात, समाज लादत असतो, असे करा, आणि तसे करू नका. असे उठा, असे बसा. याला ते शिस्त म्हणतात. मी याला शिस्त म्हणत नाही. मी तर अनुशासन त्याला म्हणतो की तुमच्या मधील विवेकाला जागे केले जावे आणि तुमचा विवेक तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करावे. एकच शिस्त आहे ती म्हणजे मनुष्याचा विवेक जागा असावा. अजून कोणतीही शिस्त नाही. आणि जी आंतरिक शिस्त आहे, ती आतून येणारी शिस्त हीच खरी शिस्त आहे आणि तीच खूप किमती आहे. बाहेरून थोपलेली शिस्त ही भयंकर गोष्ट आहे,ती आत्म्यालाच नष्ट करत असते. तर एक म्हणजे व्यक्तीची समज वाढली पाहिजे. जसे आपण आज शांत बसला आहात. याची दोन कारणे असू शकतात. एक तर तुम्हाला बोलण्याची परवानगी नसेल. सर्वांनी चूप बसावे अशी शिस्त, आज्ञा असेल तर ती बाहेरून लादलेली शिस्त होय, जी हानिकारक आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून मला ऐकण्यासाठी शांत बसला असाल, तर ती आतून अंतकरणा मधून आलेली शिस्त आहे. आतून येणारी शिस्त ही स्वतंत्रता आहे.आणि ब

ओशो वाणी..bhag1

 ओशो वाणी भाग 1  : भाग १. "जीवन काय आहे?". _________________. जीवन काय आहे? एक पवित्र यज्ञ. पण त्यांच्यासाठीच जे सत्यासाठी स्वतःची आहुती देण्यास तयार असतात. जीवन काय आहे? एक अमूल्य अवसर. पण त्यांच्याचसाठी जे साहस, संकल्प आणि श्रम करतात. जीवन काय आहे? एक वरदान रूपी आव्हान.. पण त्यांच्यासाठीच जे त्याचा स्वीकार करतात, त्याला सामोरे जातात. जीवन काय आहे? एक महान संघर्ष. पण त्यांच्यासाठीच जे स्वतःची संपूर्ण शक्ती एकवटून विजयासाठी झुंजतात. जीवन काय आहे? एक भव्य जागरण. पण त्यांच्यासाठीच जे स्वतःच्या निद्रेशी आणि मुर्च्छेशी लढत असतात. जीवन काय आहे? एक दिव्य गीत. पण फक्त त्यांच्यासाठी ज्यांनी स्व