ओशो वाणी भाग 16

 ओशो वाणी भाग 16.                         समस्या तर आहेत,समस्या चारी बाजूंना आहेत,पण तुम्ही स्वतः समस्या नाहीत. तुम्ही त्यांच्या पार जाऊ शकता. तुम्ही त्यांना एका दृष्ट्या प्रमाणे अशाप्रकारे पाहू शकता , जसे तुम्ही शिखरावर उभे राहून दरीमध्ये वाकून पहात आहात. दृष्टा होऊनच तुम्ही समस्यांचे समाधान करू शकता. वास्तविक पाहता एखाद्या समस्येचे दृष्टा होण्यातच ती समस्या अर्धी सुटून जाते,कारण जेव्हा तुम्ही तिला पाहू शकता, तिचे तटस्थ अवलोकन करू शकता, तेव्हा तुम्ही तिच्यापासून बिलकुल दूर राहू शकता, अस्पर्शित राहू शकता.तर तुमच्या डोळ्यात एक स्पष्टता येते.ती स्पष्टता तुम्हाला ही समस्या सोडविण्याची किल्ली प्राप्त करून देते आणि अधिकांशतः  तर साऱ्या समस्या अस्तित्वातच यासाठी असतात की आपल्या जवळ ती स्पष्टता नसते जिने आपण त्यांना समजून घेऊ शकतो. तुम्हाला समस्येच्या समाधानाची आवश्यकता नाही,स्पष्टतेची आहे. समस्येला जर योग्य प्रकारे समजून घेतले गेले, तर ती सुटू शकते कारण समजदारी च्या अभावामुळे समस्या निर्माण होते.तुम्ही समस्या निर्माण करता कारण तुम्हाला समज नाही,तर मूळ प्रश्न समस्येला सोडविणे हा नाही.मूळ प्रश्न आहे समज निर्माण करणे. जर समज जागृत केली गेली, जर पाहण्यामध्ये स्पष्टता आणली जाऊ शकली, जर समस्येपासून तटस्थ होऊन तिचा सामना केला गेला ,तिला अशाप्रकारे जर आपण पाहू शकलो, की ती तुमची नाही तर इतर कुणाची समस्या आहे, जर स्वयंआणि समस्या यांच्यामध्ये एक अंतर बनवले जाऊ शकले, तर समस्या सुटुन जाते.ध्यान ते अंतर, ती दूरी, तो दृष्टिकोन देतो, ध्यानामध्ये तुमच्या चेतनेचा  स्तर वर जातो आणि तुम्ही समस्येपासून वेगळे होऊन तिला पाहू शकता. जसे जसे तुम्ही ध्यानात अजून खोलवर जाल, तुमची चेतना अजूनच वर उठत जाते. तुम्ही खूप उंचावरून आपल्या समस्यांकडे वाकून पाहू शकता.आता समस्या खूप खोलवर दरीत आहेत, आणि तुम्ही उंच पर्वत शिखरावर उभे आहात. त्या उंचीवरून या दृष्टिकोनातून पाहिल्यास सर्व समस्या भिन्न दिसू लागतात आणि जेवढे तुम्ही आणि तुमच्या समस्या मधील अंतर वाढत जाते तेवढेच तुम्ही असे अनुभव करू शकता की त्या समस्या तुमच्या नाहीत. तुम्ही हे पाहिले असेल की जेव्हा एखादी समस्या तुमची नसते तेव्हा तुम्ही खूप चांगले सल्ले देऊ शकता.समस्या दुसऱ्या कुणाची असेल,जेव्हा दुसरे कुणी अडचणीत असेल तेव्हा तुम्ही खूप बुद्धिमान असता. पण जेव्हा समस्या तुमची स्वतःची असते,तेव्हा तुम्हाला हे लक्षातच येत नाही की काय करावे? काय झाले?समस्या तर तीच आहे,पण आता तुम्ही त्यामध्ये सम्मिलित आहात. जेव्हा समस्या कुण्या दुसऱ्याची होती, तेव्हा तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये एक अंतराळ होता, आणि तुम्ही तटस्थपणे तिला पाहू शकत होता.प्रत्येक जण इतरांसाठी चांगला सल्लागार होऊ शकतो,पण जेव्हा समस्या स्वतःवर येते तेव्हा आपली सारी बुद्धिमत्ता हरवून जाते. कारण आता समस्या आणि तुम्ही यामध्ये कुठलेही अंतर उरले नाही. ध्यानाद्वारे तुमची चेतना नवीन आयामां  मध्ये उघडू लागते.तुमच्यामध्ये एक नवीन बिंदू जन्म घेतो,जिथून तुम्ही गोष्टींना एका अंतरावरून पाहू शकता. समस्या तर आताही असतील पण तुमच्या आणि त्यांच्यामध्ये एक अंतर असेल.असे वाटेल की ती कुणा दुसऱ्यांच्या सोबत घटत आहे.आता तुम्ही स्वतःलाही चांगला सल्ला देऊ शकाल, पण देण्याची कुठलीही आवश्यकता राहणार नाही. ध्यानाची संपूर्ण कलाच आपण आणि समस्यांमध्ये एक अंतर बनविण्याची आहे. आता तर जी स्थिती आहे ती ही आहे की तुम्ही आपल्या समस्यांमध्ये एवढे अडकलेले आहात, की ना तुम्ही विचार करू शकता, ना मनन करू शकता, ना त्यांना पाहू शकता. समस्या अनेक असू शकतात,पण  एका तटस्थ आणि स्पष्ट चित्ता साठी त्या असूनही असत नाहीत.               प्रा. महेन्द्र देशमुख,९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25