ओशो वाणी भाग 25

 संसाराला चिखल समजाल, तर इथूनच चुकीला सुरुवात झाली. संसारात फुललेली कमळे तुम्हाला दिसत नाहीत? बुद्ध कुठे उमलले? महावीर कुठे उमलले? कबीर कुठे उमलले? हे ज्या जगजीवनच्या सूत्रांवर आपण विचार करीत आहोत ते जगजीवन कुठे उमालले? ते सूत्र कुठे जन्मले? हे जगजीवन चे गीत कुठे उमटले?याच संसारात, याच चिखलात. तर चिखलाला फक्त चिखल म्हणू नका त्यात कमळे ही असतात. चिखल कमळाची जननी आहे, त्याचा सन्मान करा. चिखलाशिवाय कमळ कुठे? चिखलाला सोडून पळून जाल तर मग कमळ कसे जन्मेल? चिखलाचा उपयोग करा. कमळ चिखलाची संभावना आहे. कमळ चिखलात  दबुन पडले आहे. शोधा ,तपास करा,भेटेल.भेटले आहे.तुम्हालाही भेटेल. पळून कुठे जाल?चिखलापासून पळून गेलात तर लक्षात ठेवा कमळापासूनही पळून गेलात. लक्षात ठेवा, सुकून जाल,सडून जाल, पण सुगंध कधीही येणार नाही. म्हणून मी म्हणतो,संसारातून पळून जाणे हा पळपुटेपणा आहे ,पलायन आहे. संसाराचा उपयोग करा. संसार एक अवसर आहे ,महान अवसर आहे.एक आव्हान, जिथे प्रत्येक क्षणी परमात्मा तुम्हाला जागे करण्याचे किती आयोजन करत आहे. कुणाच्या तोंडून शिवी निघते तुमच्यासाठी.जर तुम्ही समजदार असाल तर ही शिवी तुम्हाला जागे करेल,कुणी निंदा करून गेले तर ती निंदा तुम्हाला जागवेल. कुणाशी टक्कर झाली, तर ती टक्कर तुम्हाला जागे करेल .क्रोध आला,क्रोधामुळे आग झाली,खोल पर्यंत घाव झाले तर तो क्रोध तुम्हाला जागे करेल. करुणा निर्माण झाली, रस वहायला लागला, तर ती करुणा तुम्हाला जागृत करेल. प्रेम निर्माण झाले, प्रार्थना बनली तर प्रार्थना जागवेल. इथे दुःखही जागवेल,  सुख ही जागवेल,आणि संसार सुखदुःखाचा चिखल आहे. पण या सुखदुःखाच्या चिखलातच, सुखदुःखाच्या तणावातच कमळाची अपूर्व फुले ही उमलतात.इथे बीजे पडलेली आहेत. याच चिखलात पडलेली आहेत. समजदार व्यक्ती तर विष ही अमृत बनवतो आणि नासमज अमृता चे ही विष बनवतो. ज्यांनी तुम्हाला सांगितले आहे संसार सोडून पळून जा,ते नासमझ च असू शकतात, आणि याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला हे सांगतोय की कधीकधी पर्वतावर एकांतात निघून जाऊन तिथे मौन आणि एकांतात काही दिवस राहून येणे चुकीचे आहे,पण लक्षात ठेवा, जाऊन परत इथेच यायचे आहे. पर्वत तुमची सवय बनून जाऊ नये. पर्वत तुमची आसक्ति बनून जाऊ नये. असे होऊ नये की जंगलातली शांतता तुमची आसक्ति बनून जावि आणि बाजारातील कोलाहल तुम्हाला सहन होऊ नये.असे झाले तर अजूनच तुमची हार झाली .ही तर अजून तुमची कमजोरी झाली. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त दीन झाला. जंगलातील शांती..कधीकधी जा..कधीकधी उपभोगा.तोही संसार आहे. संसाराची दुसरी बाजू. त्यालाही भोगा, पण परत या बाजारात.पुन्हा पुन्हा परता बाजारात कारण खरी परीक्षा बाजारातच आहे.आणि ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जंगलात जेवढे शांत होतात तेवढेच शांत बाजारातही आहेत, त्या दिवशी समजून घ्या की काही घडले आहे. त्यापूर्वी नाही.त्यादिवशी समजून घ्या की काही झाले आहे.स्वतःचे स्वरूप प्राप्त झाले आहे.आता परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल,काही फरक पडत नाही. हार हो की जीत, आतील लहर अस्पर्शीत राहते.सुख येवो की दुःख, आतील गीत जसेच्या तसे. जीवन असो की मृत्यू, आत सर्व अस्पर्शीत. या अस्पर्शीत अवस्थेचे नावच संन्यास आहे. संन्यासाचा अर्थ असा नाही की जीवनाच्या विपरीत आहे.संन्यासाचा अर्थ आहे  द्वंद्वा मधे निर्द्वंद्व राहण्याची कला. मी तुम्हाला संसार सोडण्यास सांगत नाही .हो, कधी कधी सुट्टी घ्या संसारापासून. दोन-चार दिवस, महिना पंधरा दिवस जंगलात निघून जा, पण पुन्हा परत या.आणि प्रत्येक वेळी हे येणे जाणे तुमची खोली वाढवेल,तुमची उंची वाढवेल. 

अनुवाद:प्रा.महेंद्र देशमुख. 9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.