Posts

Showing posts from December, 2023

ओशो वाणी: भाग 30.

 तुमच्याकडे संवेदनशील इंद्रिये आहेत, पण तुम्ही संवेदना हरवून बसला आहात.तुमच्यातील संवेदनशील अंश जवळपास संवेदना शून्य ,मृत आहेत.ते तुमच्या शरीरावर आहेत फक्त पण त्यात ऊर्जा प्रवाहित होत नाही आहे.ते तुमच्या अस्तित्वाचे जिवंत अंग राहिले नाहीत .तुमच्या आत काहीतरी मृतप्राय होऊन गेले आहे.ते थंड, अवरुद्ध होऊन गेले आहे.हजारो वर्षांच्या दमनामुळे संपूर्ण मानव जाती सोबत हे घडले आहे,आणि शरीराच्या विरोधात चालत आलेल्या विचारधारा आणि संस्कार बद्धतांच्या हजारो वर्षांनी तुम्हाला पंगू बनवून टाकले आहे.तुम्ही फक्त नावालाच जिवंत आहात.आता  सर्वात पहिले काम हेच करावे लागेल, तुमच्या संवेदी अंगांना वास्तविक रूपात जिवंत आणि संवेदनशील असले पाहिजे,केवळ तेव्हाच त्यांच्यावर स्वामीत्व निर्माण होऊ शकेल.तुम्ही पाहता, पण वस्तूंना खोलवर नाही पाहू शकत.तुम्ही वस्तूंना फक्त वरवर, त्यांचा पृष्ठभाग तेवढा पाहता.तुम्ही स्पर्श करता, पण तुमच्या स्पर्शात उष्णता नसते.तुमच्या स्पर्शाने आत आणि बाहेर काहीही निर्माण होऊ शकत नाही,प्रवाहित होत नाही.तुम्ही ऐकताही.पक्षी गीत गात आहेत,आणि तुम्ही ऐकता आणि तुम्ही म्हणू शकता की होय, मी ऐकत आहे