Posts

Showing posts from July, 2023

ओशो वाणी भाग 28

 मनुष्याने स्वतःचे एक जग बनवले आहे.. निसर्गाच्या विपरीत असे एक जग मनुष्याने बनवले आहे.सिमेंटचे रस्ते ,सिमेंटची घरे ,सिमेंटची जंगले मनुष्याने बनविली आहेत,ज्यात ही खबरच मिळत नाही की परमात्मा ही आहे.मोठ्या नगरांमध्ये परमात्मा जवळजवळ मेला आहे कारण परमात्म्याची खबर फक्त तिथेच मिळू शकते जिथे गोष्टींची वाढ होत असते.रोप मोठे होते तर ते खबर देते की ते जिवंत आहे .आता कुठली इमारत ,कुठले घर तर वाढत नाही.ते जसे आहे तसेच राहते.सिमेंटचा रस्ता तर काही वाढत नाही .जसा आहे तसाच राहतो ,मृत आहे. जीवनाचे लक्षण काय आहे? वाढणे, वृद्धी.वर्धमान होणे हे जीवनाचे लक्षण आहे.आम्ही एक मृत जग बनवले आहे.मशीन वाढत नाही,घरे वाढत नाहीत ,सिमेंटचे रस्ते वाढत नाहीत,सर्व मृत आहेत ,सर्वकाही थांबलेले आहे.या थांबलेल्या अवस्थेत आम्हीही जगत आहोत, आम्ही ही थांबलेले आहोत.या? ज्यांच्या सोबत आपण राहतो तसेच आपणही होऊन जातो.मनोवैज्ञानिक म्हणतात की जो माणूस यंत्रांसोबत काम करतो तो शेवटी यंत्रच होऊन जातो.आणि होऊन जातोच .हे बिलकुल स्वाभाविक आहे . आमचे कृत्य हळूहळू ,हळूहळू आपल्या सवयी बनवत.तेच आपल्याला घेरून टाकते.माणसाने जे एक सिमेंट आणि ल

ओशो वाणी भाग27

 मनुष्याच्या वासना तोपर्यंत त्याला पकडून ठेवतात तोपर्यंत त्याच्याकडे संकल्प, विल नाही .जोपर्यंत त्याच्याजवळ  संकल्प सारख्या सत्तेचा जन्म झाला नसेल या संकल्प बाबत थोडे खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय कोणीही मनुष्य आपल्या वासनांना वश करू शकत नाही. संकल्पचा काय अर्थ आहे? संकल्पचा अर्थ इंद्रियांचे दमन नाही. संकल्प चा अर्थ स्वतःच्या होण्याचा अनुभव आहे. संकल्पचा अर्थ आहे स्वतःच्या असण्याचा अनुभव .तुम्हाला भूक लागली आहे, तुमचे शरीर म्हणते मला भूक लागली आहे .तुम्ही म्हणता की हो,मी ऐकले आहे,पण आत्ताच मी राजी नाही जेवण करण्यास.आणि तुम्ही जर हे पूर्ण मनापासून म्हणू शकला, की मी आत्ताच जेवण करण्यासाठी राजी  नाही,तर शरीर तत्काळ त्याची मागणी बंद करते. तत्काळ मागणी बंद करते. ज्या क्षणी शरीराला माहीत होते की तुमच्यापाशी शरीराच्या वर असा संकल्प आहे, तेव्हा शरीर तत्काळ मागणी बंद करते. तुमची कमजोरी च शरीराची ताकद बनते आणि तुमची ताकद हीच शरीराची कमजोरी बनते. पण आपण कधी शरीरापासून भिन्न आहोत अशी घोषणा करत नाहीत. कधी कधी छोटे छोटे प्रयोग करून बघणे गरजेचे आहे.खूप छोटे प्रयोग, ज्यामध्ये त