Posts

Showing posts from May, 2023

ओशो वाणी भाग 24

 तुम्ही कधीच निश्चित नसता, कारण निश्चय केंद्रित होण्याने येत असतो. तुम्ही स्वतःच्या बाबतीतच निश्चित नाहीयेत, आणि दुसर्यां संबंधी निश्चित होने तर असंभवच आहे, जेव्हा तुम्ही स्वतः संबंधीच अनिश्चित आहात. तुम्ही स्वतः संबंधी अस्पष्ट, अन्धूक अन्धूक आहात.  काही दिवसां पूर्वी एक व्यक्ति इथे आला होता. त्याने मला सांगितले कि मी कुण्या मुलीवर प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे.  मी काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोल वर पहात राहिलो.. काहीही न बोलता. तो बेचैन झाला, मग त्याने विचारले, "तुम्ही मला असे का पहात आहात? मला अजब वाटत आहे" मग त्याने विचारले, "तुम्हाला काय वाटते, माझे प्रेम खोटे आहे? "तरी मी काही बोललो नाही. त्याला पहातच राहिलो. आणि तेव्हा त्याने विचारले, " तुम्ही असे का समजता कि हा विवाह योग्य होणार नाही? आणि तो स्वतःच म्हणाला कि, "मी स्वतः या गोष्टी वर फार विचार केला नव्हता. आणि हेच कारण आहे कि मी आपल्या कड़े आलो आहे. मला माहित नाही कि मी प्रेमात आहे सुद्धा की नाही. " मी एक ही शब्द बोललो नव्हतो. मी फक्त त्याच्या डोळ्यांत डोकवून पहात होतो. पण

ओशो वाणी भाग 23

 ओशो वाणी भाग 23.                        तुम्ही सतत स्वप्न पहात असता. रात्रीच नव्हे,तर संपूर्ण दिवसही स्वप्न पहात असता. हे पहिल्यांदा समजून घेण्याची गरज आहे की जागृत अवस्थेतही तुम्ही स्वप्न पाहत असता. दिवसा एखादेवेळी डोळे बंद करा, शरीराला थोडे शिथिल करा,आणि दिसेल की स्वप्न चालू आहे. ते कधीच बंद होत नाही.आमचे दैनंदिन कामकाज चालत असल्याने ते फक्त दबून राहते. हे दिवसाच्या ताऱ्या सारखे आहे .रात्री तुम्ही ताऱ्यांना पाहता,दिवसा पाहत नाही. तारे सदा असतात .दिवसा सूर्याच्या प्रकाशात फक्त लपून  जातात.तुम्ही एका खूप खोल विहिरीत उतरलात तर तुम्हाला दिवसाही आकाशातील तारे दिसतील. तारे पाहण्यासाठी अंधाराची गरज आहे.त्यामुळे एका विहिरीत उतरा आणि त्याच्या गोलाईतून वर पहा, तुम्हाला दिवसाही तारे दिसतील.तारे तिथेच आहेत.असे नाही की रात्रीचे ते तिथे असतात, आणि दिवसा नसतात. रात्री तुम्ही त्यांना सहजपणे पाहू शकता.दिवसा ते दिसू शकत नाहीत कारण सूर्याचा प्रकाश बाधा बनतो. हीच गोष्ट स्वप्नांच्या बाबतीतही खरी आहे असे नाही की तुम्ही झोपेतच स्वप्न पहात असता. झोपेत स्वप्ने सहजपणे अनुभवता येतात, कारण त्यावेळी दिवसाचा कार

ओशो वाणी भाग 22

 ओशो वाणी भाग,22.                        तिबेट मध्ये एक फकीर होता, मिलारेपा.एक व्यक्ती येऊन त्याला म्हणाला,"मला काही सिद्धी प्राप्त करायची आहे, मला काही मंत्र द्या." त्याने खूप समजावले की माझ्याकडे कुठलाही मंत्र नाही. खूप समजावले की मंत्र असेल कुणापाशी तरी व्यर्थ आहे. मंत्र कुठेही नेत नाही. नासमज लोक मंत्र घेतात त्यामुळे जे खूप धूर्त आहेत ,ते मंत्र द्यायला लागतात. कोणता मंत्र कुठे नेत नाही.जे आमच्यामधील खूप चलाख आहेत,धूर्त आहेत ते मंत्र द्यायला लागतात, कारण मूर्ख लोक मंत्र घेण्यासाठी उत्सुक असतात. कारण त्यांना असे वाटते की याने काही होऊन जाईल.तो म्हणाला,"मंत्रा बिंत्राने काही होणार नाही, कधी काही झाले नाही. सर्व मंत्र मनुष्याने शोधून काढले आहेत, म्हणून परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग बनू नाही शकत."पण तो ऐकायला तयार नव्हता, म्हणून त्या फकिराने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कागदावर एक  मंत्र लिहून त्याला दिला आणि सांगितले, "हे घेऊन जा आणि रात्री आंघोळ करून या मंत्राचा 5 वेळेस पाठ कर.,तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होऊन जाईल."तो माणूस तिथून पळाला.आभार मानायचे ही

ओशो वाणी भाग 21

 ओशोवाणी भाग 21                          आपली मनोदशा अशी आहे की  जे काही आपल्या समोर घडते, आपण त्याच्यासोबत एक होऊन जातो. कुणी तुम्हाला शिवी दिली, क्रोध निर्माण झाला, त्या क्षणी तुम्ही क्रोधा सोबत एक होऊन जाता. तुम्ही हे विसरूनच जाता की क्षण भरा पूर्वी क्रोध नव्हता, तेव्हाही तुम्ही होता. क्षणभरानंतर क्रोध पुन्हा निघून जाईल,तेव्हाही तुम्ही असाल, तर हा क्रोध मध्ये आलेल्या धुक्या सारखा आहे.त्याने तुम्हाला कितीही घेरलेले असेल,पण तो तुमचा स्वभाव नाही. चिंता आली, तर चिंतेचे ढग घेरतात आणि सूर्य त्याच्या आड लपून जातो.तुम्ही विसरूनच जाता की मी पृथक आहे,वेगळा आहे. सुख आले, की तुम्ही नाचायला लागता, दुःख आले, की रडायला लागता.जे काही घडते,त्याच्याशी तुम्ही एक होऊन जाता. याला हळूहळू वेगळे करायला शिकायला हवे.प्रत्येक स्थितीत वेगळे करायला शिकायला हवे. भोजन करत असताना हे जाणले पाहिजे की जे भोजन करीत आहे,ते शरीर आहे.भूक लागली, तर हे जाणून घ्या कि ज्याला भूक लागली आहे ते शरीर आहे, मी फक्त जाणणारा आहे. चेतनेला कुठलीही भूक लागू शकत नाही.उष्णता लागेल, आणि घाम वाहत असेल तर हे जाणून घ्या की ते तुमच्या शरीरासो

ओशो वाणी भाग 20

 *ओशोवाणी भाग 20 या जगात प्रत्येक मनुष्याला, इथे ज्याने जन्म घेतला आहे, अनेक समस्यांपैकी एका समस्येचा सामना करावा लागतो. त्याचे अस्तित्व आणि संसारिक उद्देश हे दोन्ही सोबत चालू शकत नाहीत. हे जग त्याच्याकडून काम करून घेऊ पाहते,त्याला गुलाम बनविण्याची त्याची इच्छा आहे. त्या लोकांची त्याला वापरून घेण्याची इच्छा आहे, जे सत्तेत बसलेले आहेत, आणि तो स्वाभाविकपणे त्यांचा प्रतिरोध करतो. तो स्वतः आपल्या स्वतःमध्ये मग्न राहू इच्छितो .जग कुठल्याही व्यक्तीला त्याच्या स्वभावा प्रमाणे होण्याची आणि फुलण्याची परवानगी देत नाही. जग प्रत्येक व्यक्तीला एका उपयोगी, कुशल, आणि आज्ञाकारी वस्तूच्या रूपात घडविण्याचा प्रयत्न करते. त्याला असे वाटत नाही की कुणी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा विद्रोही, आपल्या अधिकारांचा दावा करणारा आणि आपल्या वैयक्तिकतेची घोषणा करणारा बनावा. उलट त्याला नेहमी एका साधना प्रमाणे प्रयोग केला जाणारा,जवळपास एखाद्या यंत्र मानवाप्रमाणे बनवून ठेवू इच्छिते. या जगाला असे वाटत नाही की तुम्ही मनुष्य बनून राहावे .त्याला वाटते की तुम्ही एक योग्य यंत्राप्रमाणे बनून राहावे. तुम्ही जेवढे योग्य असाल तेवढा

ओशो वाणी भाग 19

 ओशो वाणी भाग 19                           विचारांचा एवढाच उपयोग आहे की विचारांची व्यर्थता लक्षात यावी. ही समजदारी एवढ्यासाठीच  गरजेची आहेकी ही समज पर्याप्त नाही. जसे आपण काट्याने काटा काढतो तसे जर आपण विचारांनी विचार काढून शकू तर तेवढे पुरेसे आहे.विचारांनी कुणीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. विचारांनी सत्यापर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये बाधा निर्माण होते. यामुळे जर आपण बाधेला दूर सारु शकलो, तर आपण म्हणू शकतो की एका अर्थाने विचारांनीही आपल्याला सहारा दिला. बाधा राहिली नाही, दूर सारली गेली, तेवढा सहारा दिला.साधारण विचारक आहेत,ते विचारांमध्ये गुंतून राहतात.जे महा विचारक आहेत, ते विचारांपासून मुक्त होऊन जातात. विचार जेव्हा खूप खोलवर प्रवेश करतो तेव्हा लवकरच या गोष्टीची प्रतीती व्हायला सुरुवात होते की विचारांनी पोहोचणे शक्य होणार नाही. विचार करा, परमात्म्याच्या विषयी तुम्हाला काही माहीत नाही, सत्याचा तुम्हाला कुठलाही अनुभव नाही,जीवन काय आहे त्याची कुठलीही प्रतीती नाही, विचार करून तुम्ही काय करावे? कसा विचार करावा? ज्या सत्याची तुम्हाला काहीही माहीत नाही त्याबद्दल तुम्ही कसा विचार करावा? उधा