ओशो वाणी भाग 19

 ओशो वाणी भाग 19                           विचारांचा एवढाच उपयोग आहे की विचारांची व्यर्थता लक्षात यावी. ही समजदारी एवढ्यासाठीच  गरजेची आहेकी ही समज पर्याप्त नाही. जसे आपण काट्याने काटा काढतो तसे जर आपण विचारांनी विचार काढून शकू तर तेवढे पुरेसे आहे.विचारांनी कुणीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. विचारांनी सत्यापर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये बाधा निर्माण होते. यामुळे जर आपण बाधेला दूर सारु शकलो, तर आपण म्हणू शकतो की एका अर्थाने विचारांनीही आपल्याला सहारा दिला. बाधा राहिली नाही, दूर सारली गेली, तेवढा सहारा दिला.साधारण विचारक आहेत,ते विचारांमध्ये गुंतून राहतात.जे महा विचारक आहेत, ते विचारांपासून मुक्त होऊन जातात. विचार जेव्हा खूप खोलवर प्रवेश करतो तेव्हा लवकरच या गोष्टीची प्रतीती व्हायला सुरुवात होते की विचारांनी पोहोचणे शक्य होणार नाही. विचार करा, परमात्म्याच्या विषयी तुम्हाला काही माहीत नाही, सत्याचा तुम्हाला कुठलाही अनुभव नाही,जीवन काय आहे त्याची कुठलीही प्रतीती नाही, विचार करून तुम्ही काय करावे? कसा विचार करावा? ज्या सत्याची तुम्हाला काहीही माहीत नाही त्याबद्दल तुम्ही कसा विचार करावा? उधार शास्त्र, कुणीतरी सांगितलेले वचन यांची तुम्ही पुनरुक्ती कराल. हे विचार करणे कुठे असेल? ही तर पुनरुक्ती असेल. त्यातही तुम्ही नवे कसे जोडू शकाल? विचार तर कधीही मौलिक असत नाही.विचार तर नेहमीच शिळा आणि जुना असतो. विचार नवा असतच नाही, असूच शकत नाही.जर मी तुम्हाला असे म्हणेल की कोणतीही एक अशी गोष्ट विचार करून सांगा जी तुम्हाला माहित नाही.तुम्ही विचार कसा करावा? विचार करण्यासाठी माहीत असणे आवश्यक आहे. पूर्वीपासून माहीत असेल तरच विचार चालू शकतात. आणि जर पूर्वीपासून माहीत असेल तर विचार करण्याची काय आवश्यकता आहे? माहित असलेल्या गोष्टींचा विचार  करण्यात काय प्रयोजन आहे? माहीत नसलेल्या चा विचार केला जाऊ शकत नाही. नाही तर मग विचार तर असा आहे की जसे म्हैस रवंथ करत असते.केलेले जेवण पुन्हा पुन्हा तोंडात आणून चावत असते. असे हे विचारवंत आहेत. कुठल्यातरी पुस्तकात वाचले आहे, कुण्या व्यक्तीकडून ऐकले आहे, आता त्याचा रवंथ करीत आहे. पण त्यातून नवीन काही जन्मू शकत नाही.विचार मृत आहेत.त्यांच्यामध्ये जीवनाचे अंकुर येत नसतात. परमात्मा अज्ञात आहे,तर विचारांनी तुम्ही त्याला जाणू शकणार नाही. त्याचा मार्ग निर्विचार आहे. विचारांना सोडून द्या, जे शिकले आहे ,त्याला बाजूला सारा.ऐकले आहे ते विसरून जा, जे समजले आहे त्यापासून मनाच्या पट्टीला साफ करून घ्या. एखाद्या आरशासारखे कोरे, कुठल्याही विचारांच्या तरंगा शिवाय या विश्वाचा साक्षात्कार करा. त्या निस्तरंग दर्पणातच जे प्रतिबिंब बनते, तेच परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. विचार तुम्हाला एवढाच सहारा देऊ शकतात की यापुढील विचारांना बंद करण्यात सहयोगी होऊ शकतील. मी  तुमच्याशी बोलत आहे, जे बोलत आहे ते तुमच्यासाठी विचारच असतील. माझ्यासाठी जरी ते अनुभव असतील, मला जरी साक्षात्कार झाला असेल, पण जेव्हा तुम्हाला सांगेल तुमच्यासाठी तर ते विचारच असतील. तुम्ही जर ऐकत असाल, जर विचारांनी बाधा निर्मिती होत असेल तर बोलून बोलून मी तुमची बाधा वाढवीत आहे. पण या आशेने की तुम्ही समजेल तर विचारांचा काटा तुमच्या मनातील दुसऱ्या काट्यांना काढून टाकेल. कधीकधी विषाने विषाचा प्रभाव कमी होतो. तुमच्या शरीरात एखादा आजार निर्माण होतो, तुम्ही डॉक्टर कडे जाता, तो त्याच आजाराच्या जीवाणू चे एक इंजेक्शन तुम्हाला देतो आणि त्याचे शुभ परिणाम होतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या आजारासाठी असे इंजेक्शन दिले जाते तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरात झंझावात निर्माण होतो,आणि  तुमचे शरीर त्या आजाराशी लढण्यासाठी तत्पर होऊन जाते. संघर्षरत होऊन जाते.  त्या संघर्ष करण्याच्या प्रयत्नातच तुम्ही आजाराच्या जवळ येऊन जाता. याचा अनुभव तर तुम्हाला आहेच. पायात काटा घुसला की दुसऱ्या काट्याने तुम्ही त्याला काढून टाकता. ऍलोपॅथी ची बहुसंख्य औषधे विषापासून तयार झाली आहेत. आजार विष आहे.त्याला मिटवण्यासाठी आणखी मोठे विष आपण रुग्णाला देतो. विचार बाधा आहेत,त्यांना हटवण्यासाठी मी तुम्हाला काही विचार देतो. या विचारांचा उपयोग करा, याचा अर्थ असा नाही की तुमचे विचार फेकून द्यावेत आणि माझे विचार सांभाळून ठेवावे.असे केले तर हा वेडेपणा ठरेल. एक काटा काढला, आणि ज्या काट्याने काढला तो काटा जखमेमध्ये सांभाळून ठेवला.  दोन्ही काटे फेकून देण्या योग्य आहेत.जे तुमचे विचार आहेत ,तेही आणि जे मी तुम्हाला देतोय, तेही.दोन्हींना एकदाच फेकून द्या ज्यामुळे तुम्ही निर्विचार होऊन जाल. विचारांचा एवढाच उपयोग आहे, यापेक्षा जास्त कुठलाही उपयोग नाही. नकारात्मक उपयोग आहे. बुद्धिमान व्यक्ती आपल्या विचारांचा नकारात्मक उपयोग करतो,मूर्ख, बुद्धिहीन व्यक्ती आपल्या विचारांचा विधायक उपयोग करतो  विधायक, पॉझिटिव्ह उपयोग करण्याने त्यातच गुंतून जातो, गोंधळून जातो. नकारात्मक उपयोग करण्याने त्यातून पार निघून जातो.     प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25