Posts

रजनीश वाणी भाग 35.

 1) मी काय पाहतोय? पाहतोय की मनुष्य झोपलेला आहे. तुम्ही झोपलेले आहात.प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे.रात्रच नव्हे ,दिवसही निद्रेतच जात आहेत . निद्रा तर निद्रा आहेच परंतु हे तथाकथित जागरण ही निद्राच आहे.केवळ डोळ्यांच्या उघडल्याने झोप संपत नाही.त्यासाठी तर अंतःकरणाचे खुलणे आवश्यक आहे.वास्तविक जागरणाचे द्वार अंत:करण आहे.ज्याचे अंत:करण झोपलेले आहे ,तो जागा असूनही जागा नसतो आणि ज्याचे अंत:करण जागे असते तो झोपलेला असूनही झोपत नाही. 2) जीवन जागरणामध्ये आहे. निद्रा तर मृत्यूचेच रूप आहे.जागृतीचा दिवा हृदयाला आनंदाने भरतो.निद्रा तर अंधकार आहे आणि अंधकारामध्ये असणे दुःखामध्ये, पिडे मध्ये, संतापामध्ये असणे आहे..स्वतःला विचारा की तुम्ही कुठे आहात? काय आहे? जर संतापात असाल, भयग्रस्त असाल ,दुःख आणि पिडे मध्ये  असाल तर समजा की अंधकारामध्ये आहात.हे जाणून घ्या की निद्रावस्थेत  आहात.जगण्याच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वी हे जाणणे आवश्यक आहे की तुम्ही निद्रेत आहात.जो हे समजून घेत नाही तो जागाही होऊ शकत नाही. कारा गृहातून मुक्त होण्याच्या आकांक्षेचा जन्म होण्यासाठी स्वतःच्या कारागृहामध्ये असण्याचा...

रजनीश वाणी; भाग 34.

 संत सुंदरदास म्हणतात..  गोविंद के किये जीव जात है रसातल कौं ..  गुरु उपदेशे सु तो छुटे जम फंद तें ..  गोविंद के जीव बस परे कर्मानी कै ..  गुरु के निवाजे सो फिरत है स्वच्छंद तै!!  खूप अद्भुत वचन आहे.. सुंदर दास म्हणतात..  गोविंद के किये जीव जात है रसातल कौं.. गोविंदाने बनवले आहे लोकांना..आणि लोक नरकात जात आहेत. गुरुउपदेश सु तो छुटे जम  फंद तें..  गुरुचा उपदेश ऐकाल तर मृत्यूच्या फासातून सुटका होईल, फाशी टळेल. गोविंद के किये जीव बस परे कर्मणी के.. गोविंदाने बनविलेले जीव..आणि कर्माच्या फेऱ्यात पडले आहेत, वासनांमध्ये गुंतले आहेत, इंद्रियांमध्ये गुंतले आहेत, हजार प्रकारच्या कारागृहांमध्ये पडले आहेत. गुरु के निवाजे सो फिरत  है  स्वच्छंद तें..  परंतु ज्याला गुरुने वाचवले,तो मुक्त होऊन, स्वतंत्र  बनून, स्वच्छंद बनून फिरत आहे ,विचरत आहे.ते असे म्हणत आहेत की जरा बघा तर..गोविंदाने बनविलेल्या जीवाची अशी गत होत आहे. ज्याच्यावर गोविंदाच्या हाताची छाप आहे, तो भटकत आहे.पण ज्याच्यावर गुरुचा हात पडला, तो वाचला. असे समजू नका की सुंदर दास गोव...

रजनीश वाणी: भाग 33.

 व्यक्ती,जेवढा बुद्धिमान होईल तेवढी स्वतःच्या पद्धतीने जगण्याची त्याची इच्छा होईल.फक्त बुद्धिहीन व्यक्तीवर वरून लादल्या गेलेले नियम प्रतिक्रिया, रिएक्शन निर्माण करणार नाहीत.म्हणून जग जेवढे बुद्धिहीन होते तेवढे वरून लादल्या गेलेल्या नियमांच्या विरोधात क्रांती नव्हती. जेव्हापासून जग बुद्धिमान होत चालले आहे, क्रांतीची सुरुवात झाली आहे .सगळीकडे नियम तोडले जात आहेत.मनुष्याचा वाढत असलेला जो  विवेक आहे, त्याला स्वतंत्रता पाहिजे आहे.स्वातंत्र्याचा अर्थ स्वच्छंदता  नाही, पण स्वातंत्र्याचा अर्थ हा आहे की मला आपल्या व्यक्तित्वाची स्वतंत्रता, पूर्ण निर्णय घेण्याची स्वयंव्यवस्था हवी आहे.आपली व्यवस्था हवी आहे.तर अनुशासनाची जुनी सर्व परंपरा एकदम खड्ड्यात येऊन उभी राहिली आहे. ती आता तुटेलच.तिला पुढे नेण्याचे प्रयत्न केले जाऊ शकत नाहीत. तिला पुढे चालवण्याचे प्रयत्न करू नये कारण जेवढे आपण तिला चालवण्याची इच्छा करू तेवढ्याच तीव्रतेने आपली मनो प्रेरणा तिला तोडण्यासाठी आतुर होईल आणि तिला  तोडण्याची आतुरता बिलकुल स्वाभाविक आणि उचित आहे.हे चूकही नाही.तर आता एका नवीन अनुशासनाच्या विषयाबद्दल...

रजनीश वाणी: भाग 32.

 रजनीश वाणी :भाग 32 जीवनाला जेवढे तुम्ही जागे राहून जगताल तेवढ्याच बारीक आणि सूक्ष्म जीवनाचा तुम्हाला अनुभव येईल, आणि जेवढ्या सूक्ष्माचा तुम्ही अनुभव कराल तेवढेच जास्त तुम्ही जाणताल.ते दोन्ही संयुक्त आहेत आणि एक दुसऱ्याचे सहयोगी आहेत.रस्त्यावर तुम्ही चालत आहात, दारुड्या व्यक्ती पण चालत आहे त्याच रस्त्यावर, पण त्याचे पाय बघा,एकही पाय जागेवर पडत नाही.तसे तर तोही घरी पोहोचेलच.तुम्ही पण चालता आणि मग तुम्ही एका बुद्धालाही चालताना पहा, तेव्हा  तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये आणि दारुड्या व्यक्तीमध्ये जेवढा फरक आहे, तितकाच तुमच्यामध्ये आणि बुद्धामध्येही आहे.तसे तर दारुड्या व्यक्तीही घरी पोहोचतो, तुम्हीही घरी पोहोचता, बुद्ध ही घरी पोहोचतील, पण तुमच्या चालण्याचा गुण वेगवेगळा आहे.दारुड्या व्यक्ती बिलकुल बेहोशी मध्ये चालत आहे, बुद्ध बिलकुल शुद्धीवर राहून चालत आहेत ,तुम्ही कुठेतरी दोघांच्या मध्ये आहात.कधीतरी थोडीशी शुद्धीची झलक मिळते, पुन्हा अंधार येतो.कधी तुम्ही  जागे असता, कधी तुम्ही झोपलेले असता,कधी तुमचे डोळे उघडे असतात, कधी बंद होऊन जातात.तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितले, तर ...

रजनीश वाणी: भाग 31.

 रजनीश वाणी: भाग 31. तुम्ही आत्महत्येबद्दल  काय विचार करता? तुम्ही काय वेडे आहात की आणखी काही? मला माहित आहे की तुम्ही जीवनाला कंटाळून गेला आहात, तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे. जर तुम्ही खरोखरच जीवनाला कंटाळून गेला आहात , तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे, तर आत्महत्या करू नका, कारण आत्महत्या पुन्हा तुम्हाला याच जीवनात ओढून आणेल आणि असेही होऊ शकते की याहून अधिक घाणेरडे जीवन तुम्हाला भेटेल ,या जीवनापेक्षा जे तुम्ही आता जगत आहात. कारण आत्महत्या तुमच्यामध्ये अजून जास्त घाण जन्माला घालेल. आत्महत्या करणे हा अस्तित्वाचा अनादर आहे.अस्तित्वाने तुम्हाला विकसित होण्यासाठी जन्म दिला आहे,या जीवनाचा अवसर दिला आहे आणि तुम्ही हा अवसर असाच  व्यर्थ गमावता आणि जोवर तुम्ही विकसित होत नाही,विकसित होऊन बुद्ध बनत नाही, तोवर तुम्ही जीवनात पुन्हा पुन्हा फेकले जाल .लाखो वेळा यापूर्वीही हे झालेआहे.आता वेळ आलेली आहे, जागे व्हा! ही संधी ,हा अवसर चुकवू नका.इथे माझ्याजवळ राहून आत्महत्येची खरी कला शिका.खऱ्या कलेमध्ये आपल्या देहाला नष्ट केले जात नाही.देह सुंदर आहे, देहाने काहीही चूक केलेले नाही.ते तर मन आ...

रजनीश वाणी: भाग 30.

 तुमच्याकडे संवेदनशील इंद्रिये आहेत, पण तुम्ही संवेदना हरवून बसला आहात.तुमच्यातील संवेदनशील अंश जवळपास संवेदना शून्य ,मृत आहेत.ते तुमच्या शरीरावर आहेत फक्त पण त्यात ऊर्जा प्रवाहित होत नाही आहे.ते तुमच्या अस्तित्वाचे जिवंत अंग राहिले नाहीत .तुमच्या आत काहीतरी मृतप्राय होऊन गेले आहे.ते थंड, अवरुद्ध होऊन गेले आहे.हजारो वर्षांच्या दमनामुळे संपूर्ण मानव जाती सोबत हे घडले आहे,आणि शरीराच्या विरोधात चालत आलेल्या विचारधारा आणि संस्कार बद्धतांच्या हजारो वर्षांनी तुम्हाला पंगू बनवून टाकले आहे.तुम्ही फक्त नावालाच जिवंत आहात.आता  सर्वात पहिले काम हेच करावे लागेल, तुमच्या संवेदी अंगांना वास्तविक रूपात जिवंत आणि संवेदनशील असले पाहिजे,केवळ तेव्हाच त्यांच्यावर स्वामीत्व निर्माण होऊ शकेल.तुम्ही पाहता, पण वस्तूंना खोलवर नाही पाहू शकत.तुम्ही वस्तूंना फक्त वरवर, त्यांचा पृष्ठभाग तेवढा पाहता.तुम्ही स्पर्श करता, पण तुमच्या स्पर्शात उष्णता नसते.तुमच्या स्पर्शाने आत आणि बाहेर काहीही निर्माण होऊ शकत नाही,प्रवाहित होत नाही.तुम्ही ऐकताही.पक्षी गीत गात आहेत,आणि तुम्ही ऐकता आणि तुम्ही म्हणू शकता की होय, मी...

रजनीश वाणी भाग 29.

 मृत्यूची घटना अतिशय रहस्यमय आहे, आणि त्याच प्रमाणे आत्महत्येची घटनाही.पृष्ठभागावरून हे निश्चित करू नका की आत्महत्या काय आहे?अनेक गोष्टी असू शकतात.मला स्वतःला असे वाटते की जे लोक आत्महत्या करतात हे या जगातील खूप संवेदनशील, खूप प्रतिभावान लोक आहेत.त्यांच्या संवेदनशील आणि प्रतिभावान असल्यामुळे त्यांचा या विक्षिप्त जगाशी ताळमेळ बसू शकत नाही.समाज विक्षिप्त आहे,तो विक्षिप्त पायावर आधारलेला आहे.त्याचा सर्व इतिहास वेडेपणा, हिंसा, युद्ध आणि विध्वंसाचा आहे.कुणी म्हणते की माझा देश जगातील महानतम देश आहे,आता ही विक्षिप्तता आहे.कुणी म्हणतो की माझा धर्म जगातील महानतम आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आता ही विक्षिप्तता आहे आणि ही विक्षिप्तता रक्त मास मज्जा या पर्यंत जाऊन पोहोचली आहे.आणि लोक खूप खूप निस्तेज आणि संवेदनाहीन झाले आहेत.त्यांना व्हावे लागते, नाहीतर जगणे मुश्किल होऊन जाते.या चारी बाजूंना पसरलेल्या संवेदनाहीन समाजात तुम्हालाही संवेदनाहीन होऊन जावे लागते.अन्यथा तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊ लागता.जर तुम्ही समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊ लागलात तर समाज समजतो की तुम्ही वेडे झाला आहात .खरे तर समा...