ओशो वाणी भाग 26.

 चित्ताची ही सवय आहे की त्याला कोणता ना कोणता आधार हवा असतो.चित्ताला आपल्या जीवनासाठी भोजन हवे असते.ते आधार मागत असते. कुठलातरी आधार पाहिजे.राम राम जपत असाल तर चित्ताला खूप प्रसन्नता आहे,काहीही हरकत नाही. कुठले भजन गात राहाल तर चित्ताला कुठलीच कठीणता नाही. त्याला कुठले ना कुठले भोजन मिळाले तर ते अस्तित्वात राहील, आणि ते टिकून राहिले तर आत्म्याचा अनुभव होऊ शकणार नाही. तर त्याचे भोजन हिरावून घ्यायचे आहे, त्याला निराधार करावयाचे आहे.हीच आपली साधना आहे.आता आपणच त्याला आधार दिला तर तर चित्त तर खूप प्रसन्नतेने त्याचा स्वीकार करेल. एक आधार दिला तर थोड्या कमी प्रसन्नतेने, जास्त आधार दिला तर जास्त प्रसन्नतेने. चंचलतेमध्ये चित्त खूप प्रसन्न राहते.  ध्याना त  त्याला अडचण वाटायला लागते कारण आपण त्याचा आधारच हिरावून घेत  आहोत. तुम्हाला ही गोष्ट समजली ना? ते बिना आधाराचे राहूच शकत नाही. त्याला आपल्या मरणाची भीती वाटते .आणि ते बिलकुल स्वाभाविक आहे. आणि हीच तपश्चर्या आहे की जेव्हा ते आधार मागत असेल तेव्हा आपण साहस करून त्याला आधार देऊ नये. तर हे होऊ शकेल की सुरुवातीला आपण आधार न देता ही ते आधार पकडेल. पण ते आधार जास्त काळ टिकणार नाहीत. जे आधार आपण त्याला देतो, तो तर टिकू शकतो. जसे आपण त्याला राम राम जपायला शिकवले,तेव्हा तर तो टिकेल कारण आम्हीच तो त्याला देत आहोत आणि आम्ही इच्छा करीत आहोत की तो टिकावा.पण समजून घ्या की त्याने स्वतः आधार शोधण्याचा प्रयत्नही केला,जसे की बाहेरून आवाज येत असतात,त्याने त्यांनाच आधार बनविण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आधार देण्यास उत्सुक नाही आहात.उलट तुम्ही त्याला निराधार करण्यास उत्सुक आहात तर तो आधार थोड्या बहुत काळापेक्षा जास्त टिकू शकणार नाही.तोआधार निघून जाईल, आपोआप. आपणास आधार द्यायचा नाही. चित्त आधार शोधत असेल तरीही आम्ही जो प्रयोग करीत आहोत आम्हाला तोच प्रयोग करावयाचा आहे. त्याच्या आधार शोधण्यामध्ये सहयोगी व्हायचे नाही आहे. ते स्वतः होऊन निराधार होऊन जाईल. निराधार होऊन जाईल, शून्य होऊन जाईल. जसे त्याचे आधार नष्ट झाले की ते मिटून जाईल, नष्ट होऊन जाईल. ज्या क्षणी चित्त बिलकुल अस्तित्वात नसते .ती जी नो माईंड ची स्थिती असते ,जेव्हा कुठलेही चित्र राहत नाही, त्यावेळी तुम्ही स्वतःला जाणता .तर स्वतःला जाणायचे असेल तर चित्ताला ते ज्या गोष्टींना जाणते त्यांच्यापासून मुक्त करणे जरुरी आहे. कारण चित्त जे आहे ते दुसऱ्या गोष्टींना जाणत असेल तर तुम्ही स्वतःला जाणू शकणार नाही. आत्मदर्शन तेव्हा होते जेव्हा सर्व परदर्शनापासून आपण मुक्त होऊन जातो. स्वतःचे ज्ञान तेव्हा होते जेव्हा आपण सर्व परज्ञानापासून  शून्य होऊन जातो.ध्यान आपल्यात तेव्हा येते जेव्हा आपण त्याला सर्व आधारांपासून हिरावून घेतो आणि निराधार करून टाकतो. जेव्हा आपण ध्यानाचे सर्व आधार हिरावून घेतले तेव्हा ते कुठे जाईल? आपण त्याचे एक एक आधार हिरावून घेत  जातो. अखेर ते निराधार होऊन जाते.जेव्हा ते निराधार होऊन जाते तेव्हा त्याला स्वतःवर उभे राहावे लागते. ते स्व आधार होऊन जाते.तर कोणतेही देवाचे नाव तुम्हाला भगवतेपर्यंत घेऊन जाणार नाही ते नाम चित्ताचेच एक रूप आहे तो पण एक शब्द आहे. कुठलाही मंत्र तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही. ती ही चित्ताचीच एक प्रक्रिया आहे, तो पण एक विचार आहे.जेव्हा तुम्ही निर्विचार व्हाल, कुठलाही विचार तुमच्या मध्ये नसेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल? यावर थोडा विचार करा .जेव्हा तुमच्यामध्ये कोणताही विचार नसेल तर तुम्ही कुठे असाल? तुम्ही संपून, नष्ट होऊन तर जाणार नाही .त्या निर्मितीच्या क्षणी तुम्ही कुठे असाल ?तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये असाल.त्या स्वतःमध्ये होण्याचे नाव सामायिक आहे, त्या स्वतःमध्ये होण्याचे नाव समाधी आहे. समाधी कमल ,प्रवचन क्रमांक दोन. 

अनुवाद:प्रा.महेंद्र देशमुख, मो. नं. 9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25