ओशो वाणी: भाग 30.

 तुमच्याकडे संवेदनशील इंद्रिये आहेत, पण तुम्ही संवेदना हरवून बसला आहात.तुमच्यातील संवेदनशील अंश जवळपास संवेदना शून्य ,मृत आहेत.ते तुमच्या शरीरावर आहेत फक्त पण त्यात ऊर्जा प्रवाहित होत नाही आहे.ते तुमच्या अस्तित्वाचे जिवंत अंग राहिले नाहीत .तुमच्या आत काहीतरी मृतप्राय होऊन गेले आहे.ते थंड, अवरुद्ध होऊन गेले आहे.हजारो वर्षांच्या दमनामुळे संपूर्ण मानव जाती सोबत हे घडले आहे,आणि शरीराच्या विरोधात चालत आलेल्या विचारधारा आणि संस्कार बद्धतांच्या हजारो वर्षांनी तुम्हाला पंगू बनवून टाकले आहे.तुम्ही फक्त नावालाच जिवंत आहात.आता  सर्वात पहिले काम हेच करावे लागेल, तुमच्या संवेदी अंगांना वास्तविक रूपात जिवंत आणि संवेदनशील असले पाहिजे,केवळ तेव्हाच त्यांच्यावर स्वामीत्व निर्माण होऊ शकेल.तुम्ही पाहता, पण वस्तूंना खोलवर नाही पाहू शकत.तुम्ही वस्तूंना फक्त वरवर, त्यांचा पृष्ठभाग तेवढा पाहता.तुम्ही स्पर्श करता, पण तुमच्या स्पर्शात उष्णता नसते.तुमच्या स्पर्शाने आत आणि बाहेर काहीही निर्माण होऊ शकत नाही,प्रवाहित होत नाही.तुम्ही ऐकताही.पक्षी गीत गात आहेत,आणि तुम्ही ऐकता आणि तुम्ही म्हणू शकता की होय, मी ऐकत आहे आणि तुम्ही चुकत आहात.तुम्ही ऐकत आहात पण ते कधीच तुमच्या अस्तित्वाच्या अंतर्तम केंद्रा पर्यंत पोहोचत नाही.ते तुमच्या आतपर्यंत नृत्य करत प्रविष्ट होऊ शकत नाही.ते तुमच्या मध्ये उमलत नाही,तुमच्या आतील आवरणे उघडण्यास मदत करत नाही.या ज्ञानेंद्रियांना पुन्हा एकदा ऊर्जावान बनवायचे आहे.लक्षात असू द्या,योग शरीराच्या विरोधात नाही.योग म्हणतो,शरीराच्या पलीकडे जा,पण तो शरीराच्या विरोधात नाही.योग म्हणतो, शरीराचा उपयोग करा पण त्याच्याद्वारे वापरले जाऊ नका.पण तो शरीराच्या विरोधात नाही.योग म्हणतो, शरीर हे मंदिर आहे.तुम्ही शरीरात आहेत, आणि शरीर एवढी सुंदर संघटना आहे,एवढी जटील आणि एवढी सूक्ष्म, एवढी रहस्य पूर्ण, आणि त्याच्या माध्यमातून किती आयाम उघडले जातात.आणि ही ज्ञानेन्द्रिये एक मात्र द्वार आणि झरोके  आहेत ज्यांच्या द्वारे तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता.यामुळे त्यांना मृत होऊ देऊ नका.त्यांना अजून जिवंत बनवा, त्यांना तरंगीत, स्पंदित आणि स्टेनले केले मॅन यांच्या शब्दात प्रवाह मान बनू द्या. हा बिलकुल योग्य शब्द आहे.त्यांना एखाद्या धारा प्रवाह प्रमाणे प्रवाहित होऊ द्या, ओसंडून वाहू द्या.तुम्हालाही अनुभूती होऊ शकते.तुमचा हात जर ऊर्जेच्या धारे प्रमाणे प्रवाहित होत असेल तर तुम्हाला स्पंदनांची अनुभूती होऊ शकेल.तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या काहीतरी प्रवाहित होत आहे, आणि ते तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, संबंधित होऊ इच्छिते.जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्री किंवा पुरुषावर प्रेम करता, आणि त्याचा हात हातात घेता, आणि तुमच्या हातातून काही प्रवाहित होत नसेल तर असे प्रेम काही कामाचे नाही.जर तुमचा हात ऊर्जेने प्रवाहित आणि प्रकंपीत होत नसेल,आणि तुमच्या स्त्रीमध्ये किंवा तुमच्या पुरुषांमध्ये ऊर्जा प्रवाहित करत नसेल तर अगदी प्रारंभी पासूनच हे प्रेम जवळपास मृतप्राय आहे.केवळ  एका प्रवाह मान प्रेम हेच आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा स्त्रोत बनू शकते,पण त्यासाठी तुम्हाला प्रवाह मान होण्याची आवश्यकता भासेल.कधी कधी तुम्हाला याची झलक मिळू शकते.आणि प्रत्येक व्यक्तीला जेव्हा तो मूल असतो, तेव्हा ती मिळते. तुम्ही  फुलपाखराच्या मागे धावणाऱ्या एखादा मुलाला पहा,ते मुल प्रवाह मान आहे, जसे की ते कोणत्याही क्षणी आपल्या शरीराबाहेर झेप घेऊ शकते.एखाद्या मुलाला जेव्हा ते गुलाबाच्या फुलाकडे पहात असेल तेव्हा निरखून पहा.त्याचे डोळे, त्या डोळ्यांतील चमक, ती  प्रदीप्ती, जी त्याच्या डोळ्यांमधून येते ती पहा.ती प्रवाह मान आहे.त्याचे डोळे जणू त्या फुलाच्या पाकळ्यांवर नृत्य करीत आहेत .हीच आहे  असण्याची खरी पद्धत.नदीसारखे होऊन जा.केवळ तेव्हाच या संवेदकांवर स्वामित्व शक्य आहे.( पतंजली योग सूत्र भाग पाच प्रवचन तीन.) 

अनुवाद प्राध्यापक महेंद्र देशमुख मो.क्रमांक:9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी भाग 25