ओशो वाणी भाग 24

 तुम्ही कधीच निश्चित नसता, कारण निश्चय केंद्रित होण्याने येत असतो. तुम्ही स्वतःच्या बाबतीतच निश्चित नाहीयेत, आणि दुसर्यां संबंधी निश्चित होने तर असंभवच आहे, जेव्हा तुम्ही स्वतः संबंधीच अनिश्चित आहात. तुम्ही स्वतः संबंधी अस्पष्ट, अन्धूक अन्धूक आहात. 

काही दिवसां पूर्वी एक व्यक्ति इथे आला होता. त्याने मला सांगितले कि मी कुण्या मुलीवर प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. 

मी काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोल वर पहात राहिलो.. काहीही न बोलता. तो बेचैन झाला, मग त्याने विचारले, "तुम्ही मला असे का पहात आहात? मला अजब वाटत आहे"

मग त्याने विचारले, "तुम्हाला काय वाटते, माझे प्रेम खोटे आहे? "तरी मी काही बोललो नाही. त्याला पहातच राहिलो. आणि तेव्हा त्याने विचारले, " तुम्ही असे का समजता कि हा विवाह योग्य होणार नाही? आणि तो स्वतःच म्हणाला कि, "मी स्वतः या गोष्टी वर फार विचार केला नव्हता. आणि हेच कारण आहे कि मी आपल्या कड़े आलो आहे. मला माहित नाही कि मी प्रेमात आहे सुद्धा की नाही. "

मी एक ही शब्द बोललो नव्हतो. मी फक्त त्याच्या डोळ्यांत डोकवून पहात होतो. पण तो बेचैन झाला आणि ज्या गोष्टी त्याच्या अंतरात लपून बसलेल्या होत्या, बाहेर यायला  लागल्या. 

तुम्ही निश्चित नाहीयेत, तुम्ही कुठल्याही गोष्टी बाबत निश्चित होऊ शकत नाही, ना आपल्या प्रेमा बाबत, ना आपल्या घृणे बाबत, ना आपल्या मित्रते बाबत. तुम्ही कुठल्याही गोष्टी बाबत निश्चित होऊ शकत नाही, कारण तुमचे केंद्र नाही. केंद्रा शिवाय निश्चय नाही. तुमचे निश्चयाचे सर्व भाव खोटे आणि क्षणिक आहेत. एका क्षणी तुम्हाला वाटेल कि आपण निश्चित आहोत, पण दुसर्याच क्षणी  तो निश्चय निघून गेलेला असेल, कारण प्रत्येक क्षणी तुमचे केंद्र भिन्न असेल. तुमचे कोनते ही स्थायी केंद्र नाही. कुठलेही क्रिसत्लाइजड केंद्र नाहीये, प्रत्येक क्षणाचे आपले आण्विक केंद्र आहे, म्हणून प्रत्येक क्षणाची आपली अस्मिता आहे. 

जॉर्ज गुरुजीएफ म्हणत असे कि माणूस एक समूह आहे. व्यक्तित्व खोटे आहे, फसवणूक आहे, कारण तुम्ही एक व्यक्ति नाहीत, अनेक व्यक्ति आहात. म्हणून जेव्हा एक व्यक्ति तुमच्या मधून बोलतो, तो तेव्हा त्या क्षणाचे केंद्र आहे, दुसर्या क्षणी दुसरा येतो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक आण्विक स्थिति सोबत तुम्हाला निश्चिति जाणवत आसते, पण तुम्हाला या गोष्टि चा बोध कधीही होत नाही कि मी फक्त एक प्रवाह आहे ज्या मध्ये फक्त लाटाच  लाटा आहेत, केंद्र नाही. आणि तेव्हा शेवटी तुमच्या लक्षात येईल, की जीवन व्यर्थ गेले. असे होने अनिवार्य आहे. हा एक प्रयोजनहीन भटकाव आहे, फक्त एक अर्थहीन भटकाव आहे. 

तंत्र, योग, धर्म या सर्वाना एक मूलभूत फिकीर् आहे, ती म्हणजे आधी केंद्र कसे प्राप्त करायचे, आधी व्यक्ति कसे बनायचे? त्यांना फिकीर् आहे ते केंद्र प्राप्त करण्याची, जे प्रत्येक स्थितित आत विराजमान असते. जेव्हा जीवन बाहेर बदलत असते, जेव्हा जीवन प्रवा हाच्या लाटा येतात आणि जातात, तेव्हा ही आत एक केंद्र कायम असते, तेव्हा  तुम्ही एक झालात, आधारित आणि केंद्रित. 

महेंद्र देशमुख, 9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25