ओशो वाणी भाग27

 मनुष्याच्या वासना तोपर्यंत त्याला पकडून ठेवतात तोपर्यंत त्याच्याकडे संकल्प, विल नाही .जोपर्यंत त्याच्याजवळ  संकल्प सारख्या सत्तेचा जन्म झाला नसेल या संकल्प बाबत थोडे खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय कोणीही मनुष्य आपल्या वासनांना वश करू शकत नाही. संकल्पचा काय अर्थ आहे? संकल्पचा अर्थ इंद्रियांचे दमन नाही. संकल्प चा अर्थ स्वतःच्या होण्याचा अनुभव आहे. संकल्पचा अर्थ आहे स्वतःच्या असण्याचा अनुभव .तुम्हाला भूक लागली आहे, तुमचे शरीर म्हणते मला भूक लागली आहे .तुम्ही म्हणता की हो,मी ऐकले आहे,पण आत्ताच मी राजी नाही जेवण करण्यास.आणि तुम्ही जर हे पूर्ण मनापासून म्हणू शकला, की मी आत्ताच जेवण करण्यासाठी राजी  नाही,तर शरीर तत्काळ त्याची मागणी बंद करते. तत्काळ मागणी बंद करते. ज्या क्षणी शरीराला माहीत होते की तुमच्यापाशी शरीराच्या वर असा संकल्प आहे, तेव्हा शरीर तत्काळ मागणी बंद करते. तुमची कमजोरी च शरीराची ताकद बनते आणि तुमची ताकद हीच शरीराची कमजोरी बनते. पण आपण कधी शरीरापासून भिन्न आहोत अशी घोषणा करत नाहीत. कधी कधी छोटे छोटे प्रयोग करून बघणे गरजेचे आहे.खूप छोटे प्रयोग, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला शरीरापासून भिन्न असल्याची घोषणा करता. सर्व धर्मांनी अशा प्रकारचे प्रयोग विकसित केले आहेत, पण जवळजवळ सारे प्रयोग ना समज लोकांच्या हाती पडून नष्ट होत असतात.उपवास अशाच प्रकारचा प्रयोग होता, मनुष्याच्या संकल्पना जन्म देण्यासाठी बनविण्यात आला होता. माणूस जर म्हणू शकेल, पूर्ण मनापासून म्हणू शकेल की भोजन नको तर शरीर मागणी बंद करून टाकेल.आणि जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत होते कि शरीरा व्यतिरिक्त ही माझी काही स्थिती आहे तेव्हा तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन शक्ती जन्म घ्यायला लागते,अंकुरित व्हायला लागते.झोप येत आहे, आणि तुम्ही म्हणालात की नाही, मला झोपायचे नाही, आणि हे जर टोटल असेल, ही गोष्ट पूर्ण असेल, जर ही गोष्ट पूर्ण मनापासून बोलली गेली असेल, तर शरीर तत्काळ झोपेची आकांक्षा सोडून देईल.तुम्हाला हे अचानक लक्षात येईल की झोप हरवून गेली आहे आणि पूर्ण जागरण आले आहे.पण आपण आयुष्यभर कधी याचा प्रयोग करत नाही.आम्ही कधीही शरीरापासून भिन्न असल्याचा कोणताही प्रयोग करत नाही. शरीर जे सांगते त्याला चुपचाप आपण करत राहतो.मी हे म्हणत नाही की शरीर जे सांगते त्याला तुम्ही पूर्ण करू नका,पण कधी कधी काही क्षणांमध्ये आपल्या असण्याचा अनुभवही करणे आवश्यक आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही शरीरापासून भिन्न असेही आपले काही असणे आहे हे तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही हैरान होऊन जाल. त्या दिवसापासून तुमच्या मनाची शक्ती तुमच्या इंद्रियांवर विस्तारित होण्याची सुरुवात झाली असेल .कधी तुम्ही तुमच्या शरीराला आज्ञा दिली आहे? कधीतरी तुम्ही आदेश दिला आहे?तुम्ही फक्त आदेश स्वीकारले आहेत. तुम्ही कधी आदेश दिले नाहीत.वनवे ट्रॅफिक आहे सध्या तरी. शरीराकडून आदेश येतात, शरीराकडे कुठलाही आदेश जात नाही. कधी जात नाही.त्याचे परिणाम भयंकर आहेत. त्याचा सर्वात मोठा परिणाम हा आहे की आमच्या मध्ये विल सारखी संकल्प सारखी कुठली तरी गोष्ट आहे हे आपण विसरून गेले आहोत. आणि ज्या व्यक्तीकडे संकल्प नाही, तो व्यक्ती श्रेष्ठ होऊ शकत नाही. संकल्प हिनताच निकृष्टता आहे. संकल्प वान होणे म्हणजेच आत्मवान होणे होय. 

गीता दर्शन, अध्याय तिसरा, प्रवचन तिसरे. 

प्रा. महेंद्र देशमुख,मो नंबर 90 9 6 6 9 4 200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25