ओशो वाणी भाग 28

 मनुष्याने स्वतःचे एक जग बनवले आहे.. निसर्गाच्या विपरीत असे एक जग मनुष्याने बनवले आहे.सिमेंटचे रस्ते ,सिमेंटची घरे ,सिमेंटची जंगले मनुष्याने बनविली आहेत,ज्यात ही खबरच मिळत नाही की परमात्मा ही आहे.मोठ्या नगरांमध्ये परमात्मा जवळजवळ मेला आहे कारण परमात्म्याची खबर फक्त तिथेच मिळू शकते जिथे गोष्टींची वाढ होत असते.रोप मोठे होते तर ते खबर देते की ते जिवंत आहे .आता कुठली इमारत ,कुठले घर तर वाढत नाही.ते जसे आहे तसेच राहते.सिमेंटचा रस्ता तर काही वाढत नाही .जसा आहे तसाच राहतो ,मृत आहे.

जीवनाचे लक्षण काय आहे? वाढणे, वृद्धी.वर्धमान होणे हे जीवनाचे लक्षण आहे.आम्ही एक मृत जग बनवले आहे.मशीन वाढत नाही,घरे वाढत नाहीत ,सिमेंटचे रस्ते वाढत नाहीत,सर्व मृत आहेत ,सर्वकाही थांबलेले आहे.या थांबलेल्या अवस्थेत आम्हीही जगत आहोत, आम्ही ही थांबलेले आहोत.या? ज्यांच्या सोबत आपण राहतो तसेच आपणही होऊन जातो.मनोवैज्ञानिक म्हणतात की जो माणूस यंत्रांसोबत काम करतो तो शेवटी यंत्रच होऊन जातो.आणि होऊन जातोच .हे बिलकुल स्वाभाविक आहे . आमचे कृत्य हळूहळू ,हळूहळू आपल्या सवयी बनवत.तेच आपल्याला घेरून टाकते.माणसाने जे एक सिमेंट आणि लोखंडाचे जग बनवले आहे, ते खूप खतरनाक आहे,,धोकादायक आहे.त्यावर माणसाची स्वाक्षरी तर पाहायला मिळते ,पण परमात्म्याची कुठलीही खबर मिळत नाही.परमात्म्याला शोधण्यासाठी ,परमात्म्याची थोडीशी झलक मिळवण्यासाठी निसर्गाच्या जवळ जाणे उपयोगी आहे, कारण तिथे सर्व काही नाचत असलेले आहे.सर्वकाही आताही जिवंत आहे.आताही वृक्ष वाढतात ,आताही फुले उमलतात.

शहरांमध्ये तर आकाश दिसतच नाही.महानगरा मध्ये तर

चंद्र तारे उगवतात की नाही हे कळतच नाही.महानगरांमध्ये सूर्य आताही येतो  की जातो, केव्हा येतो, केव्हा जातो कुणाला कळतही नाही .जीवनातील जे ही श्रेष्ठ आहे, जेही सुंदर आहे त्याच्याकडे आपली दृष्टी बंद झाली आहे.आपले डोळे एकाग्र करून आपण पळत असतो, घरून ऑफिसला ,ऑफिस वरून घरी.एका घरून दुसऱ्या घरी पळत असतो.चारी बाजूंना गर्दी आहे.माणसेच माणसे आहेत.चारी बाजूंना वेडेपणा आहे.चारी बाजूंना उपद्रव आहे.दंगली आहेत आणि माणसांनी बनवलेले खोटे ,कृत्रिम जग आहे.या खोटेपणात जर परमात्मा मेला असेल किंवा परमात्म्याचा मागमुस लागत नसेल तर त्यात काही आश्चर्य तर नाही.

या युगात जर परमात्मा सर्वात कमी उपस्थित असेल तर त्याचे एकूण कारण हे आहे की माणसाची उपस्थिती जास्त झाली आहे आणि माणसाने सगळीकडून आपली व्यवस्था करून

घेतली आहे.सगळीकडून परमात्म्याला उखडून बाहेर काढून टाकले आहे.परमात्म्याचे निष्कासन केले गेले आहे .त्याला दूर फेकून टाकले गेले आहे .राहू द्या कुठे हिमालयात ,राहू द्या कुठे दूर पर्वतांमध्ये ,राहू द्या कुठे जंगलांमध्ये.

एस धम्मो सनंतनो प्रवचन 88.

अनुवाद: प्रा. महेंद्र देशमुख. मो.9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25