ओशो वाणी भाग 21

 ओशोवाणी भाग 21                          आपली मनोदशा अशी आहे की  जे काही आपल्या समोर घडते, आपण त्याच्यासोबत एक होऊन जातो. कुणी तुम्हाला शिवी दिली, क्रोध निर्माण झाला, त्या क्षणी तुम्ही क्रोधा सोबत एक होऊन जाता. तुम्ही हे विसरूनच जाता की क्षण भरा पूर्वी क्रोध नव्हता, तेव्हाही तुम्ही होता. क्षणभरानंतर क्रोध पुन्हा निघून जाईल,तेव्हाही तुम्ही असाल, तर हा क्रोध मध्ये आलेल्या धुक्या सारखा आहे.त्याने तुम्हाला कितीही घेरलेले असेल,पण तो तुमचा स्वभाव नाही. चिंता आली, तर चिंतेचे ढग घेरतात आणि सूर्य त्याच्या आड लपून जातो.तुम्ही विसरूनच जाता की मी पृथक आहे,वेगळा आहे. सुख आले, की तुम्ही नाचायला लागता, दुःख आले, की रडायला लागता.जे काही घडते,त्याच्याशी तुम्ही एक होऊन जाता. याला हळूहळू वेगळे करायला शिकायला हवे.प्रत्येक स्थितीत वेगळे करायला शिकायला हवे. भोजन करत असताना हे जाणले पाहिजे की जे भोजन करीत आहे,ते शरीर आहे.भूक लागली, तर हे जाणून घ्या कि ज्याला भूक लागली आहे ते शरीर आहे, मी फक्त जाणणारा आहे. चेतनेला कुठलीही भूक लागू शकत नाही.उष्णता लागेल, आणि घाम वाहत असेल तर हे जाणून घ्या की ते तुमच्या शरीरासोबत घडत आहे. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही गर्मीत बसून राहावे आणि आणि घामाला वाहू द्यावे. तिथून बाजूला हटा,सुविधा बनवा पण सुविधा शरीरासाठी बनवली जात आहे, तुम्ही फक्त फक्त जाणणारे आहात. हळूहळू प्रत्येक घटना, जी तुम्हाला घेरते ,तुम्ही स्वतःला तिच्यापासून वेगळे करत जा. कठीण आहे , पृथक करणे.कारण खूप सूक्ष्म अंतर आहे, सीमारेखा स्पष्ट नाही, कारण अनंत जन्मा पासून तुम्ही फक्त तादात्म्य करणे शिकले आहे,तोडणे शिकले नाही. तुम्ही नेहमी स्वतःला विविध स्थिती सोबत जोडणे शिकले आहे.तुम्ही तोडण्याची गोष्टच विसरून गेला आहात.याचेच नाव बेशुद्धी आहे, मूर्च्छा आहे,हेच जे तुम्ही जोडणे शिकलेले आहे. एका सकाळी मुल्ला नसरुद्दीन आपल्या मित्रा जवळ दवाखान्यात बसला आहे, मित्राने डोळे उघडले आणि तो म्हणाला", नसरुद्दीन, काय झाले?मला काहीही आठवत नाही ".नसरुद्दीन म्हणाला," रात्री तू थोडी जास्तच प्यायला होतास,आणि नंतर तू खिडकीवर चढलास, आणि तू म्हणालास,मी उडू शकतो ,आणि तू उडालास.आपण तिसऱ्या मजल्यावर होतो, घटना जाहीर आहे,तुझी सर्व हाडे मोडली. मित्राने उठण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की, "नसरुद्दीन, आणि तू तिथे होतास? आणि तू हे घडू दिले? तू कशा प्रकारचा मित्र आहेस? नसरुद्दीन म्हणाला,"आता ही गोष्ट काढू नकोस. त्यावेळेस तर मलाही असे वाटत होते कि तु हे करु शकतोस. एवढेच नव्हे, जर माझ्या  पायजम्याचा नाडा थोडासा ढिला नसता, तर मी सुद्धा तुझ्यासोबत येणार होतो.पण मग मला असे वाटले कि कुठे उडत असताना पायजामा सांभाळायचा? म्हणून मी  थांबलो आणि वाचलो. तूच एकटा थोडा पिलेला होतास? मी पण पिलो होतो.बेशुद्धी चा अर्थ आहे जी कोणती दशा चित्ता मध्ये येईल, तिच्यासोबत एक होऊन जाणे. दारुड्याच्या मनात एक विचार आला की मी उडू शकतो, तर तो आता भेद करू शकत नाही,विचार करण्यासाठी मनात जागा नाही, विवेक करण्याची सुविधा नाही. मनात आलेल्या विचाराशी तो एक होऊन गेला.तुमचे जीवन दारुड्या सारखेच आहे. ठीक आहे,की तुम्ही खिडक्यांमधून उडत नाही आणि तुम्ही दवाखान्यात झोपलेले आढळत नाही,आणि हाडे मोडून घेत नाही, पण खूप लक्षपूर्वक पाहिले तर तुम्ही दवाखान्यातच आहात, आणि तुमची सर्व हाडे मोडलेलीआहेत कारण तुमचे संपूर्ण जीवन हा एक रोग आहे, आणि त्या रोगात दुःख आणि पीडे शिवाय काही हाती येत नाही.सर्व जागी तुम्ही पडले आहात,सर्व जागी तुम्ही स्वतःला तोडले आहे, आणि सर्व तोडण्या मागे एक मूर्च्छा, बेशुद्धीचे सूत्र आहे की,जे काही घडते तुम्ही त्यापासून अंतर ठेवू शकत नाही. थोडे दूर व्हा, एक एक पाऊल. खूप दूरवरची यात्रा आहे,कारण हजारो,लाखो जन्मा पासून ज्याला बनवले आहे,त्याला मिटवणे हेही सोपे नसते. पण तुटणे होऊन जाते,कारण तेच सत्य आहे. तुम्ही जे काही बनवले आहे ते असत्य आहे.यामुळे हिंदू त्याला माया म्हणतात. मायेचा अर्थ आहे की तुम्ही ज्या संसारात राहता,तो असत्य आहे, तो खोटा आहे.याचा अर्थ असा नाही , की बाहेर जो वृक्ष आहे, तो खोटा आहे, आणि जो पर्वत आहे तो खोटा आहे, आणि आकाशात जे चंद्र तारे आहेत ते खोटे आहेत. नाही, याचा केवळ एवढाच अर्थ आहे की तुमचे जे तादात्म्य आहे, ते खोटे आहे आणि त्याच तादात्म्यमध्ये तुम्ही जगत असता, तोच तुमचा संसार आहे,तेच तुमचे जग आहे.   प्रा. महेन्द्र देशमुख,९०९६६९४२००

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25