ओशो वाणी भाग 20

 *ओशोवाणी भाग 20


या जगात प्रत्येक मनुष्याला, इथे ज्याने जन्म घेतला आहे, अनेक समस्यांपैकी एका समस्येचा सामना करावा लागतो. त्याचे अस्तित्व आणि संसारिक उद्देश हे दोन्ही सोबत चालू शकत नाहीत. हे जग त्याच्याकडून काम करून घेऊ पाहते,त्याला गुलाम बनविण्याची त्याची इच्छा आहे. त्या लोकांची त्याला वापरून घेण्याची इच्छा आहे, जे सत्तेत बसलेले आहेत, आणि तो स्वाभाविकपणे त्यांचा प्रतिरोध करतो. तो स्वतः आपल्या स्वतःमध्ये मग्न राहू इच्छितो .जग कुठल्याही व्यक्तीला त्याच्या स्वभावा प्रमाणे होण्याची आणि फुलण्याची परवानगी देत नाही. जग प्रत्येक व्यक्तीला एका उपयोगी, कुशल, आणि आज्ञाकारी वस्तूच्या रूपात घडविण्याचा प्रयत्न करते. त्याला असे वाटत नाही की कुणी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा विद्रोही, आपल्या अधिकारांचा दावा करणारा आणि आपल्या वैयक्तिकतेची घोषणा करणारा बनावा. उलट त्याला नेहमी एका साधना प्रमाणे प्रयोग केला जाणारा,जवळपास एखाद्या यंत्र मानवाप्रमाणे बनवून ठेवू इच्छिते. या जगाला असे वाटत नाही की तुम्ही मनुष्य बनून राहावे .त्याला वाटते की तुम्ही एक योग्य यंत्राप्रमाणे बनून राहावे. तुम्ही जेवढे योग्य असाल तेवढा तुमचा जास्त आदर होईल, तेवढा तुम्हाला जास्त सन्मान दिला जाईल. या गोष्टीमुळे समस्या उत्पन्न होते. इथे कोणीही व्यक्ती मशीन बनण्यासाठी उत्पन्न झालेला नाही.हे त्याला अपमानित करणे,त्याला कमी दाखवणे, त्याच्या स्वाभिमानाला दुखावणे, आणि त्याच्या आत्मिक अस्तित्वाला मिटवून आपल्या अधीन राहणारा एक यांत्रिक पुतळा बनविणे यासारखे आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच जेव्हा तो समाज, माता पिता,शिक्षण प्रणाली, देश आणि धर्म यांच्या योजनां प्रति सजग बनतो,तेव्हा तो आपल्या स्वतःला बंद करून घेणे सुरू करतो. तो भीतीपोटी फक्त सुरक्षात्मक बनणे सुरू करतो कारण त्याला एका खूप मोठ्या दबावाचा सामना करावा लागतो.तो असतो एवढा छोटा, नाजूक, आघात सहन करण्या साठी असहाय्य, आणि त्याच लोकांवर एवढा जास्त आश्रित ज्यांच्या विरोधात त्याला स्वतःची सुरक्षा करावयाची आहे.ही समस्या अधिकच जटिल होऊन जाते कारण ते लोक, ज्यांच्यापासून त्याला आपली सुरक्षा करावयाची आहे ते त्याच्या विरोधात आहेत आणि ते विचार करतात ,की ते त्याच्यावर प्रेम करतात. खरेतर ते खोटेही बोलत नाहीयेत. त्यांचे विचार प्रामाणिक आहेत.पण ते आपल्या चेतन पासून दूर झाले आहेत. ते खूप गहिऱ्या  मूर्छित अवस्थेतआहेत. त्यांना माहीत नाही कि ते कुठल्यातरी आंधळ्या शक्तीच्या हातातील खेळणे बनले आहेत,जिला समाज आणि सामाजिक व्यवस्था म्हटले जाते.त्या सर्वांमध्येही निहित स्वार्थ आहे. मूल खूप दुविधे मध्ये पडते. त्याला त्या लोकांच्या विरोधात संघर्ष करायचा आहे,ज्यांच्यावर तो प्रेम करतो, आणि विचार करतो की ते लोक पण त्याच्यावर प्रेम करतात. हे जसे आहे त्याला प्रेम म्हणत नाहीत. ते त्याला म्हणतात, आम्ही तुला प्रेम करू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, पण फक्त तेव्हाच जर तू त्या मार्गाचे अनुसरण करशील ज्याचे आम्ही अनुसरण करतो.जर तू त्या धर्माला मानशील ज्याला आम्ही मानतो आणि ज्या प्रमाणे आम्ही त्या धर्माचे आज्ञाधारक आहोत,तू पण तसाच आज्ञाधारक बनशील. जर तुम्ही या मोठ्या यांत्रिक व्यवस्थेचा एक भाग बनून जाल, ज्यामध्ये तुम्ही जीवनभर राहण्या साठी जात आहात,त्याच्याशी संघर्ष करणे फक्त अर्थहीन होऊन जाते. तुम्हाला तूडवले जाईल. बुद्धिमानी यातच आहे की बस तुम्ही समर्पण करून टाका, आणि हो म्हणायला शिका. जरी तुम्ही त्याला पसंद करत नसाल. आपल्या  सर्व परिस्थितीमध्ये,सर्व अटींवर तुमच्याकडून हीच अपेक्षा केली जाते की तुम्ही हो म्हणावे.नकार देण्याची अनुमती नाही. नकार देणे हेच मूळ पाप आहे.आज्ञापालन न करणे हेच सर्वात मोठे पाप आहे, आणि तेव्हा समाज एक मोठी खोल जखम करीत तुमचा सूड घेतो.तो मुलांच्या मनात खूप मोठे भय उत्पन्न करतो. त्याचे पूर्ण अस्तित्व आपल्या क्षमतेच्या अधिकाराचा दावा करू पाहते. तो जो स्वयम् आहे तेच बनू पाहतो,कारण  कुणी दुसरा बनण्यात त्याला जीवनात कुठलाही अर्थ दिसत नाही. त्यापेक्षा काही दुसरे बनून तो कधीही ही आनंदी राहू शकणार नाही,कधीही आनंद पूर्ण, संतुष्ट आणि संपूर्ण बनू शकणार नाही. तो कधीही विश्रांतीचा अनुभव करू शकणार नाही. आणि  नेहमी विभाजित आणि अस्थिर बनून राहील. आणि त्याचा एक भाग,त्याच्या अस्तित्वातील अंतर्निहित त्याचा स्वाभाविक भाग नेहमी क्षुधा ग्रस्त, तहानलेला,अपूर्ण आणि अतृप्त राहील. पण त्या शक्ती खूप मोठ्या आहेत,आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष करणे खूप मोठ्या जोखमीचे काम आहे.स्वाभाविकपणे प्रत्येक मुल हळूहळू आपली सुरक्षा स्वतः करणे शिकून घेते. त्याला आपल्या स्वतःला वाचवायचे आहे म्हणून तो आपल्या अस्तित्वाचे सर्व दरवाजे बंद करून घेतो .तो कुठल्याही व्यक्तीसमोर स्वतःला उघड करत नाही. तो बहाणे बनवायला सुरुवात करतो. तो अभिनेता बनणे सुरू करतो.त्याला जे आदेश दिले जातात त्यानुसार तो अभिनय करायला लागतो. त्याच्यामध्ये जे संदेह उठतात, त्यांना तो दाबून टाकतो. त्याची बुद्धी त्याला म्हणू इच्छिते, हे ठीक नाही, तुम्ही काय करत आहात? पण तो आपल्या बुद्धीचे बोलणे ऐकत नाही. स्वतःला थांबवणे आणि बुद्धिहीन बनून राहणे यालाच तो सुरक्षात्मक समजतो. कोणतीही गोष्ट जी निहित स्वार्था सोबत तुम्हाला संघर्षात घेऊन जाते, ती खतरनाक आहेआणि त्या लोकांसमोर, जे तुमच्या खूप निकट आहेत, स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करणे

 जोखीम पूर्ण काम आहे.           प्रा. महेन्द्र देशमुख,९०९६६९४२००

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25