ओशो वाणी भाग 5.

 ओशो वाणी भाग 5.ओशो वाणी भाग 5                             सुदैवी आहेत ते लोक, ज्यांना कुणी गुरू भेटतो. गुरूचा अर्थ आहे, माणसाच्या रुपात परमात्मा.तो माणूस देखील आहे,तो तुमचया चुका अन तुमची दुःख देखील समजू शकेल अन् तो परमात्मा देखील समजू शकेल. अन् तो परमात्मा देखील आहे. तो तुमची दुःख अन् चुका नुसत्या समजूच नाही शकणार, त्याला नुसती तुमची सहानुभूतीच नाही वाटणार तर तो तुमचे मार्गदर्शनही करू शकेल. पण जर गुरू नाही मिळाला.. जे सोपे नाहीये. कारण शंभर गुरूंची दारे ठोठावली तर नव्यांनव चुकीचे सिद्ध होतील, ते अगदी स्वाभाविक आहे. जगात जिथे खरी नाणी असतात, तिथे खोटी नाणीही चालतात. आणि खोटी जास्त चालतात! तुमच्या खिशात ही एक खरे नाणे असेल, अन् एक खोटे तर तुम्ही खोटं चालवायचा प्रयत्न करता. खरं तर कधीही चालेल. म्हणुन अर्थशास्त्री असे म्हणतात की  खोट्या पैशाला चालायची मोठी सनक असते, ती आधी चालतात. खरी तर तिजोरीत लपून जातात, खोटी बाजारात जातात! ही स्थिती साऱ्या खऱ्या गोष्टींची आहे. खऱ्या गुरूची देखील तीच स्थिती आहे. तुम्हाला तो बाजारात नाही आढळू शकणार. तो तर बाजूला होऊन जातो. बाजारात तुम्हाला तो भेटेल जो तुमची वाट पहात होता! तो तुमच्या दारा समोरच बसलेला आढळेल! त्याला मिळवायला तुम्हाला कोणताही प्रयत्न नाही करावा लागणार, काहीही खर्च नाही करावा लागणार! उलट तुम्हाला तो प्रसादही देईल! प्रसादाच्या लोभाने तरी तुम्ही यावं म्हणून! तो साऱ्या प्रकारे तुम्हाला अडकवेल! गुरू शोधणं मोठी कठिण गोष्ट आहे. भेटला तर सुदैव. मग त्याच्यासमोर रडल जाऊ शकतं. ते तुमच्या आसवांना समजेल. तुमची आसवे वाहत असलेली पाहून तो असे नाही समजणार की तुम्ही दीन हीन आहात. तुमच्या आसावांच मोठेपण त्याच्या लक्षात येईल. तुमची आसव त्यांच्याबाबतीत मोठी पवित्र असतील. तुम्ही रडून त्याच्यासमोर मोठे होऊन जाल. तुमची आसवे तुमचा महिमा सांगतील. तुमचा पश्चाताप तुम्हाला दीन हीन नाही बनवणार. तुम्ही आपल्या पश्चातापा चे बोलणे करून त्यातून मुक्त होऊन जाल. तुम्ही आपले दुःख सांगून हलके होऊन जाल. पण हे जर होऊ शकले नाही.. जे होणे अवघड आहे की गुरू मिळावा.. तर परमात्मा सर्वत्र उपलब्ध आहे. त्याला तर शोधायला कुठे जायचं नाहीये. तुम्ही एका वृक्षापाशी बसून वृक्षालाच दूत बनवू शकता. तुम्ही त्यालाच आपली व्यथा सांगू शकता की तू परमात्म्या कडे चालला आहेस तर माझीही खबरबात सांग. गुरू नाही मिळाला तर परमात्मा तर सगळीकडे उपलब्ध आहे. पण गुरू नाही मिळाला तर तुम्हाला कोण जागे करेल? कोण तुम्हाला सांगेल की परमात्मा चोहीकडे आहे. गुरू मिळाला तर गोष्ट सुगम होऊन जाते. कारण गुरू तुमच्या सारखाच असतो एका अर्थानं. अन् एका अर्थानं अगदी वेगळा असतो. गुरू तुमच्या अन् परमात्म्या मधील द्वारा सारखा असतो. प्रा. महेन्द्र देशमुख.मो.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25