रजनीश वाणी: भाग 31.
रजनीश वाणी: भाग 31.
तुम्ही आत्महत्येबद्दल काय विचार करता? तुम्ही काय वेडे आहात की आणखी काही? मला माहित आहे की तुम्ही जीवनाला कंटाळून गेला आहात, तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे. जर तुम्ही खरोखरच जीवनाला कंटाळून गेला आहात , तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे, तर आत्महत्या करू नका, कारण आत्महत्या पुन्हा तुम्हाला याच जीवनात ओढून आणेल आणि असेही होऊ शकते की याहून अधिक घाणेरडे जीवन तुम्हाला भेटेल ,या जीवनापेक्षा जे तुम्ही आता जगत आहात. कारण आत्महत्या तुमच्यामध्ये अजून जास्त घाण जन्माला घालेल. आत्महत्या करणे हा अस्तित्वाचा अनादर आहे.अस्तित्वाने तुम्हाला विकसित होण्यासाठी जन्म दिला आहे,या जीवनाचा अवसर दिला आहे आणि तुम्ही हा अवसर असाच व्यर्थ गमावता आणि जोवर तुम्ही विकसित होत नाही,विकसित होऊन बुद्ध बनत नाही, तोवर तुम्ही जीवनात पुन्हा पुन्हा फेकले जाल .लाखो वेळा यापूर्वीही हे झालेआहे.आता वेळ आलेली आहे, जागे व्हा! ही संधी ,हा अवसर चुकवू नका.इथे माझ्याजवळ राहून आत्महत्येची खरी कला शिका.खऱ्या कलेमध्ये आपल्या देहाला नष्ट केले जात नाही.देह सुंदर आहे, देहाने काहीही चूक केलेले नाही.ते तर मन आहे ,जे अ सुंदर आहे.आत्माही सुंदर आहे, पण शरीर आणि आत्मा याच्यामध्ये असे काहीतरी आहे जे की शरीरही नाही आणि आत्माही नाही.ही दोन्हीं च्या मध्ये असणारी घटना म्हणजेच मन आहे .ते मनच आहे, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा गर्भामध्ये ओढून नेते.जेव्हा तुम्ही मरता, जर तुम्ही आत्महत्या करत असाल ,तेव्हा तुम्ही जीवनाबाबतच विचार करत असाल .आत्महत्या करणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनाबाबत विचार करीत आहात.तुम्हाला जीवनाचा उबग आला आहे, तुम्ही जीवनात थकून गेला आहात ,तुम्हाला पूर्णपणे वेगळे जीवन हवे आहे ,त्यामुळे तुम्ही आत्महत्या करीत आहात .असे नाही की तुम्ही जीवनाच्या विरोधात आहात.तुम्ही फक्त 'या'जीवनाच्या विरोधात आहात .असे असू शकते की तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला नको आहात, असे असू शकते की तुम्ही सिकंदर ,नेपोलियन, हिटलर व्हावे अशी तुमची इच्छा असेल.असे असू शकते की या जगातील सर्वात धनवान व्यक्ती तुम्हाला बनावयाचे आहे आणि तुम्ही ते नाहीत.हे जीवन असफल होऊन गेले आणि तुम्हाला प्रसिद्ध व्हायचे होते, तुम्हाला सफल व्हायचे होते.म्हणून आता तुम्ही हे जीवनच नष्ट करण्याची इच्छा बाळगून आहात.लोक आत्महत्या यामुळे करत नाहीत की ते जीवनामध्ये खरोखरच थकून गेले आहेत ,तर या कारणाने करतात की जीवन त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे.तुमच्याकडे नेहमी काही ना काही कमतरता असेलच .जर तुमच्याकडे धन असेल, तर असे असू शकते की तुमच्याकडे सौंदर्य नसेल .जर तुम्ही सुंदर असाल, तर होऊ शकते तुम्ही बुद्धिमान नसाल.जर तुम्ही बुद्धिमान असाल, तर कदाचित तुमच्याकडे धन नसेल आणि असेही होऊ शकते की एखाद्याकडे सर्व काही असेल तरीही या गोष्टीची कशी मदत होऊ शकते? तुम्ही अतृप्तच राहता. प्रत्येक जीवनात याच गोष्टी पुनरुक्त होत राहतात .देह बदलतो, पण दिशा तीच कायम राहते .लोकांना वाटते की जे लोक आत्महत्या करतात, ते जीवनाच्या विरोधात आहेत.पण हे सत्य नाही.त्या लोकांना जीवनाच्या प्रती खूप जास्त लालसा आहे, त्यांच्या मनात या जीवनाबद्दल खूप जास्त वासना आहे आणि जीवन त्यांच्या वासना पूर्ण करत नाही, त्यामुळे रागाच्या भरात ,तणाव,वि शा द, आणि हताशे मध्ये ते स्वतःला नष्ट करून टाकतात .मी तुम्हाला आत्महत्येची खरी पद्धत शिकवेल.देहाला नष्ट करून नव्हे .देह तर अस्तित्वाचा सुंदर तम उपहार आहे.मन अस्तित्वाकडून मिळालेला उपहार नव्हे.मन तर समाजाकडून संस्कारीत झालेले आहे.देह उपहार आहे आणि आत्मा उपहार आहे. आणि या दोन्हींमध्ये समाजाने तुमच्यासोबत एक खेळी खेळली आहे.त्यामुळे समाजाने मन बनविले आहे.ते तुम्हाला महत्वकांक्षा देते,ते तुम्हाला ईर्षा ,प्रतिस्पर्धा, हिंसा देते.ते तुम्हाला प्रत्येक प्रकारचे घाणेरडे आजार देते ,पण या मनाचे अतिक्रमण केले जाऊ शकते त्या मनाला एका बाजूला ठेवले जाऊ शकते.हे मन जरुरी नाही आहे.मी तुमच्यासमोर बसलो आहे, आणि स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला सांगत आहे, आपल्या अधिकाराने तुम्हाला सांगत आहे की मनाला एका बाजूला ठेवले जाऊ शकते.हे खूप सोपे आहे ,फक्त याची पद्धत तुम्हाला आली पाहिजे.आणि आत्महत्येमध्ये मरणे एवढे पीडादायक आहे कारण ही प्राकृतिक गोष्ट नाही.ही सर्वात मोठी अप्रकृतिक अशी गोष्ट आहे, कधीही कुठला वृक्ष आत्महत्या करत नाही.फक्त माणूस आत्महत्या करतो.निसर्गाला आत्महत्या ही गोष्ट माहित नाही.निसर्गाला आत्महत्येबद्दल काहीच ठाऊक नाही.आत्महत्या हा माणसाचा शोध आहे,हे सर्वात घाणेरडे आणि कुरूप कृत्य आहे ,आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे घाणेरडे आणि कुरूप कृत्य स्वतःच्या बाबतीत करता तर तुम्ही अशी आशा ठेवू शकत नाही की पुढे तुम्हाला एक सुंदर जीवन मिळेल, यापेक्षा चांगले जीवन मिळेल तुम्ही मनाच्या अत्यंत निकृष्ट अवस्थेमध्ये मराल आणि तुम्ही अत्यंत निकृष्ट गर्भामध्ये प्रवेश कराल .पण आत्महत्येची आवश्यकताच का आहे? जरा प्रश्न करा स्वतःला! तुम्ही निश्चितच चुकीच्या पद्धतीने जगला आहात.त्याच कारणामुळे तुमचे जीवन एक सुंदर गीत झाले नाही.तुम्ही निश्चितच मूर्खतापूर्ण पद्धतीने जगला आहात. मू ढता पूर्व, अज्ञानी व्यक्ती सारखे .त्यामुळेच तुमच्या जीवनात उत्सव आला नाही.तुम्ही ताऱ्यांसोबत आनंदात नाचू शकत नाही ,आणि फुलांसोबत, हवे सोबत नाचू शकत नाहीत किंवा पावसामध्ये मस्त होऊन नाचू शकत नाही ,कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने जगला आहात .जे तुमच्यावर तुमच्या सारख्याच लोकांनी थोपले आहे.ही सतत चालणारी घटना आहे .मूढता स्वतः सतत चालत राहते.माता पिता आपल्या मुलांना ही मू ढता देतात, त्यांची मुले त्यांच्या मुलांनाही मू ढ ता देतात, त्यांची मुले पुढच्या पिढीला ती गोष्ट
सोपवत जातात . ही वंशपरंपरागत वारसा आहे .याला परंपरा म्हणतात, त्याला वारसा म्हणतात, त्याला संस्कृती म्हणतात .मोठी मोठी नावे आहेत .तुम्ही ज्याप्रमाणे आजवर जगत राहिलात त्यावर विचार करा.आणि तेव्हा तुमच्या जीवनात एक नवीन प्रकारची बुद्धिमत्ता येईल.आणि तुमचे जीवन अधिक प्रखर होईल.आपल्या संस्कारांवर विचार करा. त्यावर ध्यान द्या .कुठेतरी पायाभूत स्तरावर काही चूक झालेली आहे.पक्षी गीत गात आहेत आणि वृक्ष फुल ,हे अनंत अस्तित्व ...ही जागा काय आत्महत्या करावयाची आहे ?या जागी नृत्य करा, गीत गा ,उत्सव साजरा करा.प्रेम करा आणि प्रेम करू द्या .आणि जर तुम्ही या अस्तित्वावर प्रेम करू शकाल, जर तुम्ही या अस्तित्वाच्या आशीर्वादांना जाणून घेऊ शकाल तर मी तुम्हाला अशी हमी देतो की जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुम्हाला परत इथे यावे लागणार नाही अस्तित्व कधीच पुन्हा त्या व्यक्तीला परत पाठवत नाही ज्या व्यक्तीने जीवनाचा पथ शिकून घेतला आहे.जर तुम्ही आनंदित होणे शिकून घ्याल तर तुम्ही स्वीकार्य व्हाल.तेव्हा उच्च तर रहस्यासाठी तुमची द्वारे उघडतील.तेव्हा जीवनाच्या अंतर्तम रहस्या मध्ये तुमचे स्वागत होईल.यालाच मी खरी आत्महत्या म्हणतो ,आणि त्याचे मी नाव ठेवले आहे ध्यान.
ओशो:" बी सेटल अँड नो "या प्रवचन मालेतील एक अंश.
अनुवाद: प्रा.महेंद्र देशमुख. मो .नंबर:9096694200.
Comments
Post a Comment