ओशो वाणी भाग 4

 ओशो वाणी भाग 4.ओशोवाणी भाग 4.                            या बोधाने भरायला उशीर की मीच मालक आहे, मीच सृष्टा आहे,जे काही मी करत आहे, त्यासाठी मीच जिम्मेदार आहे.. जीवनात क्रांती घडून येते. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला जिम्मेदार समजाल तोपर्यंत क्रांती असंभव आहे कारण तोपर्यंत तुम्ही निर्भर राहाल. तुम्हाला वाटते की दुसरे तुम्हाला दुःखी करत आहेत तर मग तुम्ही कसे सुखी व्हाल ?हे असंभव आहे कारण दुसऱ्यांना बदलणे तुमच्या हातात नाही .तुमच्या हातात तर फक्त स्वतःला बदलणेआहे .जर तुम्हाला असे वाटते की भाग्या मुळे तुम्ही दुखी होत आहेत तर गोष्ट तुमच्या हाताबाहेर गेली.भाग्य तुम्ही कसे बदलाल? भाग्य तुमच्या वर आहे आणि तुम्ही जर असा विचार करता की जे होत आहे ते तुमच्या नशिबातच विधात्याने लिहिले आहे तर तुम्ही एक परतंत्र यंत्र होऊन जाल. तुम्ही आत्मवान राहणार नाहीत. आत्म्याचा अर्थच हा आहे की तुम्ही स्वतंत्र आहात आणि कितीही पीडा तुम्ही भोगत असाल ते तुमच्याच निर्णयाचे फळ आहे.ज्या दिवशी तुम्ही निर्णय बदलाल त्यादिवशी जीवन बदलून जाईल आणि जीवनाला पाहण्याच्या दृष्टीकोणा वरच सर्व काही अवलंबून असते. मी एके दिवशी मुल्ला नसरुद्दीन च्या घरी अतिथी म्हणून गेलो होतो.सकाळी बागेत फिरताना अचानक मला दिसले की त्याच्या पत्नीने त्याच्या दिशेने एक पेला फेकला.तो त्याच्या डोक्यात लागला नाही पण भिंतीवर आदळून फुटला. नसरुद्दीन ने हे पाहिले की मी सर्वकाही पाहिले आहे.तो बाहेर आला आणि म्हणाला, क्षमा करा,तुम्हाला वेगळेच काही वाटेल पण आम्ही खूप सुखी आहोत.असेच कधीकधी पत्नी वस्तू फेकून मारते पण यामुळे आमच्या सुखात काही फरक पडत नाही. मला आश्चर्य वाटले.मी विचारले, थोड्या विस्ताराने सांगशील का? तो म्हणाला, जर तिचा निशाना बरोबर लागला तर ती खूश होते आणि चुकला तर मी खुश होतो म्हणून आमच्या खुशीत काही फरक पडत नाही आणि कधी कधी निशाणा लागतो,तर कधी चुकतो. आम्ही दोघे खुश आहोत.आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर सर्व अवलंबून आहे. तुम्ही बनवता, मग तुम्हीच पाहता आणि मग तुम्हीच व्याख्या करता.तुम्ही बिलकुल एकटे आहात. तुमच्या जगात कुणीही प्रवेश करत नाही, करू शकत नाही,  कुणी प्रवेश केलाच तर तोही तुमच्याच आज्ञेने केला असेल. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे हे एकदा समजले की माणूस दुःखी होऊ शकणार नाही. आणि दुःखी व्हायचे असेल तर तक्रार करू शकणार नाही .पण माणसाला दुखी होण्यात, तक्रार करण्यात, इतरांची सहानुभूती मिळवण्यात खूप आनंद मिळतो. म्हणूनच लोक आपल्या दुःखाची कथा एकमेकांना चढाओढीने सांगत असतात कुणी ऐकायलाही तयार नाही पण आपण सांगत जातो आणि ऐकणारा ही यासाठी ऐकत असतो की त्यालाही त्याचे दुःख सांगण्याची संधी मिळेल. माणूस दुःखाची चर्चा का करतो?कारण त्याला सहानुभूतीची अपेक्षाअसते. आपले दुःख ऐकून कुणीतरी आपल्याला प्रेमाने जवळ घेईल,तू किती दुःखी आहेस असे म्हणेल अशी आपली अपेक्षा असते. दुःखा द्वारे तुम्ही इतरांकडून प्रेम मागत असता.तुम्हाला आयुष्यात प्रेम भेटले नाही म्हणून तुम्ही सहानुभूतीची अपेक्षा करता. सहानुभूती कचरा आहे पण प्रेमाच्या सर्वाधिक जवळ आहे. म्हणून ज्याला खरे सोने भेटले नाही तो नकली सोन्या ने काम चालवू लागतो. सहानुभूती खोटे प्रेम आहे. जो प्रेम देऊ शकतो त्यालाच केवळ प्रेम मिळते. तुम्ही प्रेमाची भीक मागत आहात. तुम्ही सम्राट नाहीत तर भिकारी आहात.रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्याने आपल्या शरीरावर खोटे घाव बनवले आहेत. त्यावर लावलेले रक्ताचे डागही खोटे आहेत. पण त्याला दुःखीपाहून तुमचा अहंकार जागा होतो आणि असे वाटते की त्याला मदत केली पाहिजे. तो जर निरोगी आणि स्वस्थ असेल तर तुम्ही त्याला म्हणाल की काही काम कर,पैसे कमाव. पण दुःखीमाणसाला पाहून तुम्ही खोटी का होईना सहानुभूती दाखवता. तुम्ही यासाठी दुःखाला पकडून बसले आहात कारण तुम्हाला प्रेम भेटले नाही. ज्याला जीवनात प्रेम मिळाले तो आनंदित होईल,तो आनंदाला पकडेल, दुःखाला नाही.दुःख पकडण्या योग्य नाही आणि तक्रार करण्यात तुम्हाला सुविधा आहे कारण इतर लोक तुम्हाला दुःखी करत आहेत असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा जिम्मेदारी चा बोजा कमी होतो. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो, सारे शास्त्र सांगतात, सारे बुद्ध पुरुष सांगतात की तुम्हीच जिम्मेदार आहात इतर कुणीही नाही,तेव्हा तुमच्यावर जबाबदारीचा बोजा पडतो कारण आता तुम्ही कुणाबद्दल ही तक्रार करू शकणार नाही आणि सहानुभूती मागू शकणार नाही. अजून खोलात गेल्यास ही अडचण निर्माण होते की जर तुम्ही जिम्मेदार असाल तर बदल केला जाऊ शकतो आणि बदल करणे ही एक क्रांती आहे.एका परिवर्तनातून जावे लागेल,तुमच्या जुन्या सवयी, तुमचा जुना साचा तोडावा लागेल कारण तो चुकीचा आहे.आज पर्यंत तुम्ही जी इमारत बनवली तो पूर्णपणे नरक आहे. त्याला पाडून टाकावे लागेल. कितीही मोठी इमारत असेल तरी पाडावी लागेल. भूतकाळातील सर्व श्रम व्यर्थ गेल्याचे दिसेल. म्हणून तुम्ही या सत्यापासून वाचण्याचा प्रयत्न करता पण जितके वाचायला पहाल तितकेच तुम्ही भटकाल. तर पहिल्यांदा हे समजून घ्या की तुम्हीच तुमच्या अस्तित्वाचे केंद्र आहात इतर कुणीही जबाबदार नाही. हे सत्य स्वीकार करताच सर्व दुःख नाहीशी होतील. कारण मीच माझा खेळ बनवला आहे हे लक्षात आल्यावर तो मिटवायला किती वेळ लागेल? म्हणून दुसरे कोणीच नाही आणि जर तुम्हाला दुःखातच रस घ्यायचा असेल तर तुमची मर्जी. पण मग तक्रार करण्याचे काही कारण नाही.जर तुम्हाला संसारात भटकायचेच असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला नरकातच जायचे असेल तर तुम्ही त्याची निवड करा, पण मग तक्रारीचे काही कारण नाही.तुम्ही आनंदाने दुःखात जगण्यासाठी मोकळे आहात. प्रा महेंद्र देशमुख. भ्र. 90 9 66 94 20 0.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25