ओशो वाणी भाग 12

 ओशो वाणी भाग"12                     माझी धारणा खूप वेगळी आहे, तिला समजून घ्याल तर एक नवीन दृष्टी मिळू शकते.जेव्हा एक माणूस धनाच्या शोधात असेल, तर आपण असा विचार करतो की तो ईश्वराच्या विरुद्ध शोध घेत आहे.मी असा विचार करत नाही. मी असे समजतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. जेव्हा एक माणूस पदाचा शोध घेत आहे, तेव्हा लोक विचार करतात की तो ईश्वराच्या विपरित  काहीतरी शोधत आहे. मी विचार करतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. आणि मी  त्याला याप्रकारे समजतो.एका माणसाची आपण कल्पना करू, तुमचेच उदाहरण घेऊ. मी जर तुम्हाला म्हणेल की आपण किती धनाने तृप्त व्हाल? तर आपले मन एक आकडा ठरवेल,तत्काळ, आणि पुढे निघून जाईल की एवढ्याने काम चालणार नाही. मी कोणताही आकडा तुम्हाला सांगेन, कुठलीही संख्या ,आणि तुमचे मन म्हणेल की एवढ्याने भागणार नाही. याचा अर्थ काय झाला?याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत अनंत धन भेटणार नाही, तोपर्यंत तुमचे काम चालणार नाही. तुम्हाला मी म्हणेल , की मोठ्यात मोठे पद तुम्ही घ्या. हे पद तुम्ही घ्या आणि यानंतर मागू नका. तुम्ही शेवटचे पद मागा. तर कदाचित तुम्ही निर्णय करू शकणार नाही. खरेतर परम पद भेटल्याशिवाय तुमचे काम चालणार नाही. पदाचा शोध घेतानाही  परम पद मिळवण्याचा शोध चालू आहे, धनाचा शोध घेत असताना अनंत संपत्ती मिळवण्याच्या शोध चालू आहे. परमेश्वर झाल्याशिवाय कुणाचा अहंकार तृप्त होणार नाही. हे शोध चालू आहेत. हे सर्व शोध इश्र्वरोंमुख आहेत. म्हणजे हे सर्व शोध आपणास अनंता कडे घेऊन जात आहेत.लोक म्हणतात वासना अनंत आहे,आणि मी म्हणतो की खरेतर अनंताचीच वासना आहे. वासना अनंत आहे हे तर ठीक आहे .अनंताची वासना आपल्या अंतर्मनात आहे .अनंत भेटल्याशिवाय आपण तृप्त होणार नाही. शेकडो वेळा पराभूत होऊन, ठोकर खाऊन, छोट्यामोठ्या गोष्टींनी स्वतःला तृप्त करण्याचा प्रयत्न करू,पण आपले मन सांगेल की आपण तृप्त नाही. लोक म्हणतात हे मन खूप कामी आहे, लोलुप  आहे,मी म्हणतो की खरेतर हे मन त्या परमेश्वराला भेटल्या विना तृप्त होणार नाही. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या जागी जेव्हा आपण त्याला तृप्त करण्याची इच्छा करतो,हे म्हणते, आम्ही तृप्त नाही. मनाची ही जी चंचलता आहे, ती खूप अद्भुत आहे ती माणसांना अध्यात्मिक जीवनात घेऊन जाते. धार्मिक लोक मनाच्या चांचलतेला शिव्या देतात.. मी त्याची ही कृपा समजतो .नाहीतर कोणीही माणूस कधी धार्मिक नसतोच. तुम्ही तर कुठल्याही कचऱ्याच्या ढिगावर बसून तृप्ती करून घेतली असती. धन भेटले की तुम्ही तृप्त झाला असता.पण जे मन आहे ,हे तर चंचल आहे.हे म्हणते ,अजून हवे आहे,अजून हवे आहे. अनंत द्या त्याला, तेंव्हा ही ते म्हणेल, अजून पाहिजे,अजून पाहिजे. जेव्हा अनंत जन्म पळून पळून जन्मभर तुम्ही थकून जाता,चारी बाजूंनी ठोकर खाऊन तुम्ही परत येता, किंवा कुठलेही सीमित तुम्हाला तृप्त करू शकणार नाही, तेंव्हा तुम्हाला दिसेल की प्रत्यक्षात माझी तहान तर अनंत अशा प्रभूला भेटण्याची होती. आणि मी छोट्या छोट्या गोष्टींचा शोध घेत होतो. ती  प्रत्येक वेळ जेव्हा  सर्व प्रकारची समृद्धी असते जसे महावीर किंवा बुद्ध, त्यांच्याजवळ सर्व प्रकारची समृद्धी आहे. सर्व प्रकारच्या समृद्धी मध्ये जगताना त्यांच्या हे लक्षात येते की मी अतृप्त आहे . हा भ्रम नष्ट होतो की समृद्धीने तृप्ती होऊ शकते. कारण समृद्धी तर आहे. जर तिच्याने तृप्ती होत असली तर ती झाली असती. समृद्धी काय असेल,चित्त तृप्त आहे. एवढे तर नक्की झाले की ही समृद्धी तृप्ती नाही देऊ शकत.समृद्ध लोक समृद्धी चा भ्रम तोडण्याचे कारण बनतात आणि तेव्हा एखाद्या नवीन लोकाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांची ही तहान करू लागते. दरिद्र व्यक्तीला हा भ्रम असतो की थोडीशी समृद्धी असेल तर तृप्ती पण होऊन जाईल. त्यामुळे जो दरिद्र आहे, तो थोडक्यात ही तृप्त होण्याच्या मागे पळत असतो. आणि कुणी समजू शकेल ,विचार करू शकेल,तर दरिद्र असेल किंवा समृद्ध, तो एवढी गोष्ट समजून घेऊ शकतो की अनंताची प्राप्ती झाल्याशिवाय परम तत्वाला भेटल्याशिवाय, अंतिमाची प्राप्ती झाल्याशिवाय मन तृप्त होणे शक्य नाही. त्यामुळे मी अंतिमाची प्राप्ती करून घेईन हा जो भ्रम आणि विश्वास आहे ,तो यासाठी चालून जातो की आम्हाला हा धोका होत असतो की कदाचित याच्याने तृप्ती होईल, त्याच्याने तृप्ती होईल,पण प्रत्येक वेळी अनुभव आम्हाला सांगतो की याच्या ने  तृप्ती होऊ शकत नाही. याच  अनुभवांना संयोजित करण्यासाठी साठी आनेक जन्म लागतात.हे आमच्या हातात आहे की आपण त्याला किती लांब ठेवायचे. तर याच क्षणी आपण जागे होऊ शकतो किंवा खूप उशिरा पर्यंत झोपून राहू शकतो हे आपल्या हातात आहे.तर मला या साऱ्या वासना ईश्वर विरोधी दिसत नाहीत. सर्व इश्र्वरोन्मुख आहेत. कारण प्रत्येकाच्या आत खोलवर त्याचीच आकांक्षा दडलेली आहे . प्रा. महेन्द्र देशमुख.9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25