ओशो वाणी भाग, 14

 ओशो वाणी भाग 14.                          या जगात प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचे एक प्रयोजन आहे, एक लक्ष्य आहे, जे त्याला पूर्ण करावयाचे आहे. पण प्रत्येक व्यक्ती मनातून अनेक खंडांमध्ये विभागला गेलेली आहे, कारण त्याला आपल्या लक्ष्याचा बोध नाही. त्याचे संपूर्ण चित्त त्या उसण्या घेतलेल्या लक्ष्यानी भरलेले आहे जे दुसऱ्यांनी त्याला दिलेले आहेत. जर तुम्ही हे जाणत नसाल की तुमच्या असण्याचे, तुमच्या अस्तित्वाचे काय लक्ष्य आहे ?जर तुम्ही हे जाणत नसाल की वास्तवात तुम्हाला काय व्हायचे आहे ,आणि काय करावयाचे आहे? तर सगळं काही एक दिशा भ्रम बनून जाते. कधी तुम्ही तिकडे ओढले जाता, तर कधी इकडे.तुम्ही वेगवेगळ्या दिशांना भटकत राहताआणि हेच संपूर्ण विषादाचे कारण आहे. तुम्ही एवढ्या दिशांमध्ये विभक्त झालेले आहात की तुमचे संपूर्ण व्यक्तित्व खंड खंड होऊन गेले आहे.एक खंड उत्तरेच्या दिशेने जात आहे,तर दुसरा खंड दक्षिणेकडे. तुम्ही सतत एका संघर्षांमध्ये जगत आहात. तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्ही कोणत्या दिशेला जात आहात, कारण तुमचे कोणतेही एक व्यक्तित्व नाही. तुम्ही एक अखंड व्यक्ती तेव्हाच बनू शकता ज्यावेळी तुम्हाला हे निश्चित माहित असेल की तुम्हाला काय हवे आहे? माझ्याकडे लोक येतात, आणि मी त्यांना विचारतो,' तुम्हाला खरेच काय हवे आहे?' ते खांदे उडवतात आणि म्हणतात की त्यांना माहीत नाही.अशा स्थितीत एक गोष्ट निश्चित आहे की तुमचे जीवन कधीही एक परिपूर्ण जीवन बनवू शकत नाही.तुम्हाला दिशेचा कुठलाही बोध नाही. तुम्ही दिशाहीन आहात. पण अजून खूप उशीर झाला नाहीये. कधीही खूप उशीर होत नसतो.तुम्ही कुठल्याही क्षणी आपले जीवन आपल्या हातामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही हा निर्णय घेत असाल, तर पहिली गोष्ट तुम्हाला ही करावी लागेल की, तुमच्यामध्ये इतरां द्वारा रेकॉर्ड केलेल्या आवाजांना ऐकणे बंद करा. या आवाजा पासून मुक्त होण्यासाठी तुम्ही एक छोट्याशा विधी चा प्रयोग करू शकता. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी आपल्या अंथरूणावर बसा,आपले डोळे बंद करा,आणि ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला जे काही करावयाचे आहे, जे काही करण्याची किंवा होण्याची तुमची इच्छा आहे,काय तो विचार तुमचा स्वतःचा आहे?जाणून घेण्याचा प्रयत्न करा की तुमची कोणतीही इच्छा, तुमची कोणती अपेक्षा कुठून येत आहे ?आणि तो आवाज कुणाचा आहे ?जर तुम्ही शांत होऊन हे ऐकले तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल की तुमची आई तुम्हाला सांगत आहे की तुम्ही हे बना, तुमचे वडील तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही ते बना, काही गोष्टी तुमचे शिक्षक सांगत आहेत, काही तुमचे शेजारी सांगत आहेत ,काही तुमचे भाऊ बांधव सांगत आहेत. तुम्ही शांत बसून आपल्या इच्छांचा आवाज ऐकत बसाल तर तुम्हाला ठीक ठीक या गोष्टीचा माहिती मिळेल की कोणता आवाज कुणाचा आहे?शालेय जीवनापासून तुम्हाला जीवनाचे लक्ष्य शिकविले गेले आहेत. काही लक्ष्य तुम्ही इतरांना पाहून बनविलेले आहेत. जर तुम्हाला आपल्या स्वतःच्या लक्ष्या ला जाणून घ्यायचे असेल,तर ते फक्त तुमचे हृदयच सांगू शकेल.त्यासाठी पहिल्यांदा ही गोष्ट आवश्यक आहे की तुम्हाला बाहेरच्या आवाजापासून मुक्त होऊन जावे लागेल.आपल्या मनाला त्या आवाजा पासून रिक्त करून टाका. आणि त्यासाठी त्या आवाजांशी  लढायचे नाही. फक्त दृष्टा होणे पुरेसे आहे.प्रत्येक रात्री कमीत कमी एक तासासाठी आपल्या अंथरुणावर बसा, आणि आपल्या इच्छां कडे आपले ध्यान घेऊन चला .त्यानंतर एकेका इच्छेच्या मुळापर्यंत जा,आणि पहा कोणती इच्छा कुठून येत आहे?मागे मागे जाऊन पहा की या इच्छेचे बीज कधी आणि कुणाकडून पेरले गेले आहे? तुम्ही मागे परत जात राहाल, अजून मागे जात राहाल,तर स्त्रोता पर्यंत जाऊन पोहोचू शकाल.आणि जेव्हा कधी तुम्ही स्त्रोतापर्यंत जाऊन पोहोचतात,त्या आवाजापासून निर्भार होऊन जाता, मुक्त होऊन जाता. अचानक तुमच्या हे लक्षात येते की तो आवाज तुमचा नाही ,आणि हा बोध येताच  तो आवाज तुम्हाला छळणे बंद करून टाकतो. हे हळूहळू, मंदगतीने होणारे कार्य आहे ,पण जर तुम्ही सतत या कामात लागून राहिला तर काही महिन्यांतच तुम्ही पहाल की तुम्ही स्वच्छ व्हायला लागला,तुमचे पुस्तक कोरे व्हायला लागले. तेव्हा तुम्ही स्वतः चा मंद असा आवाज ऐकू शकाल. आणि एकदा आपला स्वतःचा आवाज ऐकू आला,तर तो आकाशातील विजेच्या कडाडण्यासारखा अनुभव असेल. अचानक तुम्हाला ही गोष्ट समजून जाईल की तुमचे खरे लक्ष्य काय आहे? मग एखाद्या बाणा प्रमाणे आपल्या लक्ष्याच्या दिशेने निघून जा. अजून एक प्रयोग.प्रत्येक रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्या भूतकाळात प्रवेश करा,त्याला पुन्हा जगा. हळूहळू अनेक आठवणी जाग्या होतील .अनेक आठवणी तर अशा असतील की त्यांना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या आठवणी तुमच्यामध्ये दबून होत्या. आणि एवढ्या ताज्या, की जणू आत्ताच घडल्या आहेत.तुम्ही पुन्हा लहान मुल बनून जाल, तरुण व्हाल, प्रेम प्रसंगांमधून जाल, अनेक भूतकाळातील गोष्टी पोतडीतून बाहेर निघतील.हळूहळू त्या गोष्टींमधून बाहेर पडा. ज्या ज्या आठवणींमधून तुम्ही जागरूकतेने बाहेर पडाल, त्या पूर्ण होऊन जातील. तुमचा आठवणींचा पर्वत छोटा व्हायला लागेल.तो पर्वत जेवढा छोटा होईल,तेवढे तुम्ही अधिक मुक्त अनुभव कराल.तुमच्या मध्ये स्वतंत्रतेच्या ताजेपणाची एक गुणवत्ता येऊ लागेल. तुम्ही असे अनुभव कराल की तुम्ही जीवनाच्या स्त्रोताला स्पर्श करून परत आला आहात.तुम्ही जीवनाने भरून जाल.दुसऱ्यांना पण असे वाटू लागेल, की तुमची चाल बदलली आहे.त्यामध्ये नृत्याची गुणवत्ता आहे. आता तुम्ही एखाद्या गोष्टीला स्पर्श कराल, तर त्या स्पर्शाची गुणवत्ता ही बदलून जाईल.तुमचा हात जिवंत होऊन जाईल.आता तुमच्या मधून जीवन मुक्तपणे वाहायला लागेल, कारण तुमच्यामध्ये साचलेले बरेच काही मुक्त होऊन गेलेले असेल.                 प्रा. महेंद्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25