ओशो वाणी भाग 17

 ओशोवाणी भाग 17.                        जीवनात दुःखही आहे आणि सुखही. कारण जन्मही आहे,आणि मृत्यूही.पण या गोष्टीवर बरेच काही अवलंबून आहे, की दोन्हीपैकी आपण कुणाची निवड करून जीवनाचा पाया रचतो? जर कोणी व्यक्ती मृत्यूची निवड करून जीवनाचा पाया रचत असेल,तर मग जन्मही केवळ मृत्यूची सुरुवात वाटेल. आणि जर कुणी जीवनाची निवड करून पाया रचत असेल तर मग मृत्यूही जीवनाची परिपूर्णता आणि जीवनाचा शेवटचा बहार वाटू लागतो.जर एखादा व्यक्ती दुःखाला जीवनाचा आधार म्हणून  निवडत असेल तर सुख ही फक्त दुःखात जाण्याचा उपाय दिसू लागेल आणि जर एखादा व्यक्ती सुखाला जीवनाचा आधार बनवेल तर दुःखही केवळ एका  सुखातून दुसऱ्या सुखात परिवर्तन होण्याची मधली कडी वाटू लागेल. हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे, आपण कशाची निवड करतो याने संपूर्ण जीवनाची व्यवस्था बदलून जाते.जीवनात अशांती आहे, शांती ही आहे. आपण कशाची निवड करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. ध्यान अशांती ला जीवनाच्या आधारापासून हटवण्याची विधी आहे आणि जीवनाच्या आधारात मौन आणि शांती ठेवण्याची व्यवस्था आहे. पण आपण अशांत होण्यामध्ये खूप निष्णात आहोत.आणि आपण कोणतीच संधी सोडत नाहीत. अशांतीची कुठलीही संधी मिळत असेल तर आपण सोडत नाही. खूप तत्पर आहोत, प्रतीक्षा करत आहोत की काही कारण मिळावे आणि आपण अशांत व्हावे. तुम्हाला आठवते का आजवरच्या जीवनात अशांत होण्याची एखादी तरी संधी तुम्ही सोडून दिली आहे?हे आठवण येणार नाही कीकुणी तुम्हाला शिवी दिली आणि तुम्ही क्रोधीत झाला नाही. तुम्ही तत्काळ क्रोधीत होण्याचे कारण शोधून काढाल. संधी तुम्ही सोडणार नाही. पण असे काही अवसर शोधणे सुरू करा .जर ध्यानात पुढे जायचे असेल तर असे अवसर शोधणे सुरू करा. कुणी शिवी दिली तर त्याच क्षणी त्या शिवीवर लक्ष देऊ नका.या गोष्टीवर लक्ष द्या ही काय मी हा अवसर सोडू शकतो?आणि जो व्यक्ती अशांती ची संधी सोडत नाही, तो नियमित रूपाने अशांत होतच असतो.तो व्यक्ती शांती चा अवसर सोडून जातो कारण दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. अशा अवसरा चे दोन भाग लक्षात घ्या. शांतीचे अवसर आहेत, अशांतीचे पण अवसर आहेत. जर तुम्ही अशांतीचे अवसर सोडत नसाल तर शांती पासून दूर राहाल, शांतीच्या संधी तुम्ही सोडून द्याल, कारण तुमच्या चित्ताची बनावट निवड करण्याची होऊन जाते, आणि तुम्ही तत्काळ अशांती ची निवड करता. एखादा माणूस जर क्रोधाने तुमच्याकडे बघत असेल तर आपण कधी असा विचार करत नाहीत की त्याचा क्रोध खोटा असू शकेल, पण कुणी तुमच्या कडे पाहून स्मितहास्य करत असेल तर लगेच विचार करता की ते हास्य बनावट असेल. पण क्रोधा बद्दल तुम्ही कधीही विचार करत नाही  कीतो बनावटी असेल. कोणी व्यक्ती तुमच्याप्रती प्रेम व्यक्त करत असेल तर मनात हा संदेह निर्माण होतो की त्याच्या मनात काय स्वार्थ असेल, पण कोणी क्रोध प्रकट केला तर कधीही मनात संदेह निर्माण होत नाही की काय अर्थ असेल? अर्थ बिलकुल स्पष्ट आहे.ही आमच्या निवड करण्याची वृत्ती आहे .कोणी एखाद्या व्यक्तीच्या संबंधात तुम्हाला सांगितले की तो खूप चांगला माणूस आहे तर तुम्ही समजता की असे होऊ शकत नाही, पण एखाद्याने जर सांगितले की एखादा माणूस खूप वाईट आहे तर पक्का निश्चय होऊन जातो तुमचा की निश्चितच तो माणूस वाईट असेलच. जर कोणी माणूस तुम्हाला सांगत असेल की फलाना माणूस चांगला आहे तर तुम्ही असा विचार करतात की सांगणारा माणूसच अशा स्थितीत आहे की त्याला चांगल्या ची ओळख काय असेल? पण तोच माणूस तुम्हाला येऊन सांगत असेल की एखादा माणूस वाईट आहे तर मग तुम्ही कधीही विचार करत नाही की हे सांगणारा माणूस स्वतः तर वाईट नाही?आपण निवड करत असतो वाईटाची. चुकीची निवड आपण खूप शिघ्रते ने करतो. आपण संवेदनशील असतो.लगेच पकडतो. ही सवय बदला. जर ध्यानात खूप खोलवर जायचे असेल तर 24 तास या गोष्टीचे स्मरण ठेवा की अशांत होण्याची संधी सोडून द्या.शांत होण्याचे अवसर पकडा. जेव्हाही शांत होण्याची संधी मिळेल तर क्षणभरासाठी शांत व्हा,आणि जेव्हा अशांत होण्याची संधी येईल तेव्हा स्वतःवर कृपा करा,ती संधी सोडून द्या. थोड्याच दिवसात तुमची निवड करण्याची दिशा बदलून जाईल आणि तेव्हा तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की आजवर तुमचे जे दुःख होते ती तुमचीच निवड होती, तुमचीच चॉईस होती. ध्यानाच्या यात्रेवर निघणाऱ्या लोकांना हे स्मरण असले पाहिजे की ध्यान एकटे पुरेसे नाही. तुमच्या चित्ताची निवड करण्याची पद्धती बदलली पाहिजे. जे शुभआहे, सुंदर आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. असुंदराची उपेक्षा करा.कुरूप असेल त्याकडे लक्ष देऊ नका. अंधाराची ची निवड करण्याची काय आवश्यकता आहे? तुमच्या लायक प्रकाश जगात खूप आहे. अंधार आहे जरूर, पण तुम्हाला अंधारात उभे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला उभे राहण्यासाठी खूप प्रकाश आहे आणि एखादा व्यक्ती  हवे तर संपूर्ण जीवन प्रकाशात व्यतीत करू शकते, पण आपली निवड कशी आहे की प्रकाश असेल आणि अंधार ही असेल तर आपण अंधारात जाऊन उभे राहतो आणि अंधारात उभे राहून आपण ओरडत राहू की अंधारच अंधार आहे, दुःखच दुःख आहे, इथे सुखा चा एखादा किरण पण नाही. लक्षात असू द्या ,आनंदाला उपलब्ध व्हायचेअसेल तर आपल्या निवडीची पद्धत पूर्णपणे बदलली पाहिजे. आणि हे आपल्या हातात आहे.. सकाळी उठल्यापासून..  प्रा. महेन्द्र देशमुख,9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25