ओशो वाणी भाग 10

 ओशोवाणी भाग-10.                          आज पर्यंत ज्या सूत्रावर आम्ही मनुष्याचे निर्माण करण्याचे प्रयत्न केले ते सूत्र असे आहे की मनाला,चित्ताला पळवा,त्याच्या आत्म्याला व्यथित आणि त्रस्त करा, त्याच्या आत्म्या मध्ये विष भरून टाका वेडेपणाचे ,की तो वेडा होऊन जाईल यासाठी, की मी काही बनून दाखविन,मी काही होऊन दाखविन. आणि याच ज्वराच्या आधारे माणसाकडून काम करून घ्या.हे काम स्वस्थ नाहीये.आम्ही जे कोणते काम करत आहोत, ते सारे काम अस्वस्थ आहे, ज्वरग्रस्त आहे, फिवरीश आहे, कारण आपल्या अंतर्यामी प्राण वेड्यासारखे धावत आहेत. आम्ही काम करण्यात उत्सुक नाही आहोत, तर आम्ही  पुढे  जाण्यामध्ये उत्सुक आहोत.त्यामुळेच कुठलेही काम आनंद देत नाही, कुठलेही काम शांती देत नाही, कोणतेही काम जीवनाची प्रफुल्लता बनत नाही, कोणतेही काम संगीत नाही बनू शकत, कोणतेही काम प्रार्थना बनू शकत नाही. प्रत्येक कामाला आपण शिडी बनवतो की आपण त्याद्वारे अजून पुढे पोहोचू. आणि पुढे पोहोचूनही  काही फरक पडणार नाही. अजून पुढच्या पायऱ्या दिसू लागतील आणि कुठेही पोहोचून काहीही फरक पडणार नाही. आम्ही जिथे पोहोचू,आपली नजर पुढची असेल आणि आपण जिथे असू तिथे त्यामुळे आपण अस्वस्थ, त्रस्त आणि पीडित असू. तिथून निघून जाण्यासाठी आतुर झालेले असू.कुठेतरी दुसरीकडे पोहोचण्यासाठी उत्सुक असू आणि जिथे आम्ही पोहोचण्यासाठी उत्सुक आहोत, तिथे पोहोचूनही पुन्हा तीच प्रक्रिया पुनरुक्त होईल. यासाठी माणूस कुठेही पोहोचला तरी कुठेही पोचू शकत नाही,काहीही प्राप्त केले तरी तो रिकामाच राहतो. काहीही भेटले तरी असे वाटत नाही की काही भेटले आहे. आयुष्यभर एक अन्फुलफिलमेंट, एक अपूर्णता, एक अपूर्ती,एक रिक्तता,एक एम्प्टीनेस प्राणांना पकडून राहते. चित्तामध्ये जेवढी महत्वकांक्षा असते, मन तितकेच रिकामे राहून जाते. जितकी कमी महत्वकांक्षा असेल, मन तितकेच भरून जाते,जेवढे भरलेले मन असेल, तेवढाच जीवन आनंदअसतो, जेवढा जीवन आनंद असतो, तेवढा कामाला एक नवीन अर्थ प्राप्त होतो. पण आजवर आपण माणसाला महत्वकांक्षेच्या सूत्रात गढवले आहे.आणि अजूनहीआम्ही याबाबतीत सजग नाही झालोआहोत की येणाऱ्या भविष्यातील मुलांना महत्त्वाकांक्षेच्या दिशेने नेऊ नये.  आजही आपण त्यांना महत्त्वाकांक्षेच्या दिशेने नेत आहोत,त्यांना महत्व कांक्षेच्या च्या साच्यात  गढवत आहोत. प्रत्येक बाप अशांत आहे, प्रत्येक शिक्षक अशांत आहे, प्रत्येक आई अशांत आहे, पण तरी आपण मुलांना त्याच साच्या मधून गढवत आहोत,ज्या साच्यातून आम्ही घडलो आहोत. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. जर आमचा पूर्ण समाज अशांत आहे,तर येणाऱ्या मुलांसाठी आम्ही काही व्यवस्था केली पाहिजे कि ते त्याच साच्यात जाऊ नयेत ज्यामध्ये आम्ही गेलो होतो.कुणी विचारत नाही की महत्त्वकांक्षेच्या शिक्षणाने संपूर्ण मनुष्यजातीच्या जीवनाचे रूपांतर एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये, एका म्याड हाऊस मध्ये झाले आहे. पण नाही, आपण हे जरूर विचारू की अशांत आहोत, शांत कसे व्हावे?मग कुणी तरी माणूस आम्हाला येऊन सांगेल की जपमाळ फिरवून शांती मिळू शकते. महत्वकांक्षेचीआग  अंतर्यामी जळत आहे,जपमाळ जपून काय होणार ?मग एखादा माणूस सांगेल की राम राम जपण्याने शांती मिळू शकते. तुमच्या अंतर्यामी नसा नसा मधून, मस्तिष्क आणि मना मध्ये महत्त्वकांक्षेचे विष प्रवाहित होत आहे. राम राम जपूनकाय होईल? मग ना राम राम जपल्याने काही होईल, न जपमाळ फिरवून काही होईल, मग आपण माळही फेकून देऊ आणि राम नामालाही  फेकून देऊ ,आणि म्हणू, काही होत नाही,सर्व बेकार आहे. पण कुणीही हे विचारणार नाही की तुमच्या जीवनात, तुमच्या अंतर्यामी  प्राणाला जाळणारी जी आग आहे ,अशांती ची तिला विझवायचा, तिला संपवायचा तुम्ही काही उपाय केलाय? त्या आगीला आपण रोज नवीन फ्युएल, नवीन इंधन देत जातो.रोज नवीन लाकडे त्या आगीत टाकत जातो. तिथे एका हाताने आगीला भडकवत राहतो, आणि दुसऱ्या हाताने इथे शांत होण्यासाठी मंदिरांचा,योग्यांचा, महर्षींचा शोध घेत राहतो,की कुणी  ट्रांसेनडेंटल मेडिटेशन सांगावे,कुठले तरी ध्यान सांगावे, कुणी एखादे तप सांगावे, कोणी महर्षी भेटावा, ज्याचे आम्ही पाय धरु, आणि तो आम्हाला आशीर्वाद देईल.एखादा ताईत घालायला सांगेल, तो ताईत आम्ही बांधून घेऊ.आम्ही हे सगळे काही करू, पण एक मूलभूत प्रश्न आम्ही विचारणार नाही की आम्ही अशांत का आहोत? आणि जर आम्ही हे विचारू की आम्ही अशांत का आहोत तर मला असे वाटत नाही की अशा माणसाचा शोध घेणे कठीण आहे, ज्यालाआपल्या अशांतीचे कारण दिसणार नाही.  प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25