ओशो वाणी भाग 13

 ओशो वाणी भाग 13.                          एक प्रामाणिक चित्त, एक ऑथेन्टीक माईंड असले पाहिजे. आमचे सारे चित्त औपचारिक आहे, फॉर्मल आहे, प्रामाणिक नाही. ना आपण कधी प्रामाणिक रूपाने प्रेम केले आहे, ना प्रामाणिकपणे कधी घृणा केली आहे, ना प्रामाणिकपणे क्रोध केला आहे, ना कधी प्रामाणिक रूपाने कुणाला क्षमा केली आहे. आमच्या चित्ताचे सारे आवर्तन,आमच्या चित्ताचे सारे रूप औपचारिक आहे, खोटे आहे, मिथ्या आहे.आता मिथ्या चित्ताला घेऊन जीवनाचे सत्य कुणी कसे जाणून घेऊ शकेल? सत्य चित्ताला घेऊनच जीवनाच्या सत्याशी संबंधित होता येईल.आमचे सर्व माईंड, आमचे सर्व चित्त, आमचे सर्व मन मिथ्या आणि औपचारिक आहे हे समजून घेणे उपयोगी आहे. सकाळी सकाळी आपण आपल्या घराच्या बाहेर आला आणि रस्त्यावर तुम्हाला कुणी दिसले आणि तुम्ही त्याला नमस्कार केला,  तुम्ही त्याला म्हणता की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला,तुमचे दर्शन झाले,खूप छान वाटले.पण मनातल्या मनात तुम्ही असा विचार करता कि या दुष्टाचा चेहरा सकाळी सकाळी कुठून दिसला असेल?हे अन ऑथेंटिक माईंड आहे. इथे गैर प्रमाणिक मनाची सुरुवात झाली. 24 तास आपण असेच दुहेरी प्रकारे जीवन जगत असतो. तर जीवनाची संबंध कसा होईल?मग जीवनाला दोष द्याल. दुहेरी पणाने बंधन निर्माण होते.जीवनात कुठलेही बंधन नाही.बंधन जन्मते मनुष्याच्या दुहेरी पणाने. आपण दुहेरी प्रकारे जीवन जगत आहोत. आत काही आहे, बाहेर काही आहे .फक्त दुहेरी ढंग असला तरी ठीक होते .आपण हजारो प्रकारे जगत आहोत. एकाच वेळी हजारो गोष्टी आपल्या मनात चालत आहेत.आपल्या व्यक्तित्वात कुठलीही प्रामाणिकता,कोणतेही सत्य नाही. हे सारे व्यक्तित्व खोटे दिसत आहे. आपले सारे व्यक्तित्व अभिनयाचे, एक्टिंग चे असल्यासारखे दिसते. पण आपण कुणाची फसवणूक करत आहोत? कुणाच्या समोर हा  अभिनय चालू आहे ?कुणा दुसऱ्याची फसवणूक होणार नाही. अशाप्रकारे फसवणूक करून मी स्वतःलाच ओळखण्या पासून वंचित

राहून जाणार.

  जीवनाशी संबंधित होण्यापासून वंचित राहून जाणार.माणूस सर्व प्रकारची फसवणूक करत आहे. सगळ्यात मोठी फसवणूक मनाच्या तळावर आहे, ज्या ठिकाणी  कुठलीही गोष्ट सत्य राहिली नाही. कधी तुम्ही खरोखर कुणावर प्रेम केले आहे? समजदार लोक म्हणतात की मूर्ख माणूस प्रेम करतो,समजदार नाही. समजदार माणसे फक्त प्रेमाच्या गोष्टी करतात, अभिनय करतात. प्रेम वगैरे कधी करत नाही. हे व्यावहारिक लोक, हे प्रॅक्टिकल लोक आहेत, ते कधी प्रेम वगैरे करत नाहीत, फक्त प्रेमाबद्दल गोष्टी करतात.आमचे सर्व भाव बोलण्या पर्यंत सीमित झाले आहेत. कधीही जीवनातील कुठलीही अनुभूती अशा तीव्रतेने आपण पकडली नाही, ज्यासाठी आपण जगू किंवा मरून जाऊ.कोणतेही ऑथेंटिक, प्रामाणिक खेळी आपल्या जीवनात नाही. आपण क्रोधही करतो तर तो मिळमिळा, नपुंसकअसतो.त्या क्रोधातही कुठले बळ नसते,कुठलीही शक्ती नसते. जो व्यक्ती प्रामाणिकपणे क्रोधहि करु शकत नाही, तो क्षमा कसा करू शकेल? क्षमा ही तोच करू शकतो जो क्रोध करण्यास समर्थ आहे, मित्रही तोच होऊ शकतो जो शत्रु होण्यासाठी समर्थ आहे.पण आपण ना शत्रू होऊ शकतो,ना मित्र होऊ शकतो.आपण बिलकुल त्रिशंकू होऊन गेलो आहोत. आपल्या जीवनाची कुठलीही भावदशा  राहिलेली नाही.आमच्या सर्वांच्या जीवनातून माणूस असण्याची चमक विलीन होऊन गेली आहे. ना कधी तिथे क्रोध अशाप्रकारे चमकतो की वीज कडाडली आहे,किंवा कधी प्रेम चमकत नाही विजे प्रमाणे. तिथे कुठली चमकच उरलेली नाही. आम्ही बिलकुल बिना चमक,बिना विद्युत, बिना बल, बिना शक्तीचे लोक होत चाललो आहोत.जीवनाशी आमचा संबंध होऊ शकत नाही. जीवनाशी संबंधित होण्यासाठी शास्त्रांचे अध्ययन, मंदिरातील प्रार्थना यांची आवश्यकता नाही,तर जीवनाशी संबंधित होण्यासाठी एक प्रकारची इन्टेन्सिटी,तीव्रता असणाऱ्या जीवनाची आवश्यकता आहे.एकच प्रार्थना आहे आहे जीवन देवतेच्या मंदिरात तीआहे इंटेन्स लिव्हिंग,ती आहे तीव्र जीवन,ती आहे ती आहे उद्दाम जीवन,ती आहे बल, शक्तिशाली जीवन ,ऊर्जेने भरलेले जीवन. आम्ही सर्व जण बिना ऊर्जेचे जगत जातो. रस्त्यांवर चालत नाही तर जणू काही धक्के खात असतो. माझ्या दृष्टीने जीवनाच्या कलेची पहिली शिक्षा ही असेल की आपण जीवनाला किती तीव्रतेने घेऊ शकू.एक एक क्षण इतक्या तीव्रतेने घेऊ शकू जसे एक एक क्षण आपले जीवन दावावर लागले असेल. कोण जाणे एका क्षणानंतर जीवन येईल न येईल,श्वास येईल, न येईल. सत्य हेच आहे की प्रत्येक क्षण जीवन दावावर लागले आहे.आता आपण  तिथे बसले आहात, एवढ्या आरामात.तुम्हाला जर कोणी सांगितले की तुमच्या आयुष्यातला एकच तास शिल्लक आहे, किंवा हा अंतिम क्षण आहे,तर त्या क्षणी तुम्ही कसे जगाल? हेही सत्य आहे की एका माणसाला एका क्षणा पेक्षा जास्त जीवन मिळालेले नाही. दुसऱ्या क्षणाचा काहीही भरोसा नाही. तो येईल, न येईल. जो क्षण माझ्या हातात आहे, तोच माझ्या हातात आहे.  त्या क्षणी,त्या क्षणाला मी आपल्या पूर्ण शक्तीने जगात नसेल,तर मी जीवनाची कला कधीही शिकू शकणार नाही.जर मी भोजन करत आहे, तर कुणास ठाऊक दुसऱ्यांदा भोजन करू शकेल की नाही. जर मी कुणावर प्रेम करत असेल तर कुणास माहित की पुन्हा हा प्रेमाचा क्षण येईल की नाही. जर मी आकाशातील तारे बघत असेल, तर कोण सांगू शकेल की पुन्हा हे तारे मला पहायला मिळतील की नाही.तर फक्त एकच गोष्ट होऊ शकते की, जीवनकलेचे पहिले सूत्र हेच होऊ शकेल की, जे काही मी करत असेल, ज्या क्षणांमधून मी जात असेल, मी जे काही असेल,ते मी समग्रतेने पूर्ण पणे होऊन जाईल. तो माझा पूर्ण,समग्र जीवनाचा केंद्रित अनुभव बनून जावा. कारण त्याच्या बाहेरचे मला काही माहीत नाही. त्याबद्दल मी काहीही जाणत नाही.आज रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा हे कुठे माहित असते की सकाळी तुम्ही जागे व्हाल. तर आज रात्री पूर्णपणे झोप घ्या कारण पुन्हा दुसऱ्यांदा झोपता येईल की नाही हे सांगता येत नाही. आणि जर मित्राला सोडायला गेला असाल तर तो निरोप एवढा परिपूर्ण असावा, एवढा परिपूर्ण की कुणास ठाऊक तो मित्र दुसऱ्यांदा भेटेल की नाही.हो ना.पण आपण एवढे वर वर जगतो की आपल्याला जीवनात क्षणांच्या तीव्रतेचा कुठलाही बोध नाही.कुठली ही स्पष्टता ही नाही. आम्ही असे जगतो की जसे कायमचे जगणार आहोत.आम्ही असे जगतो की जणू काही जीवन एक आलस्य आहे, एक प्रमाद आहे. जीवन एक तीव्रता आहे, आणि जो जितक्या तीव्रतेने जगतो तो जीवनाच्या मंदिरात तेवढाच खोलवर प्रविष्ट होऊन जातो.पण ही तीव्रता तर शिकवली जात नाही. ना कधी आपण एवढ्या तीव्रतेने रडतो ,की आपले सारे प्राण अश्रू बनून जावे.तेव्हा ते अश्रू पण अद्भुत होऊन जातात.जे पूर्ण प्राणा पासून येतात. तेव्हा त्या अश्रूंचे मोल खूप जास्त आहे. तेव्हा ते कुठल्याही हिऱ्या मोत्या जास्त बहुमूल्य आहेत. हे अश्रू, जे पूर्ण प्राणांचीप्रति छाया आहेत,एकदाही असा माणूस रडतो तेव्हा रडण्याच्या द्वाराने तो जीवनाशी संबंधित होऊन जातो,किंवा जर आपण हसू,तर पूर्ण प्राणापासून जर ते हसणे असेल,तर ते हसणे ही आम्हाला त्याच तीव्रते मध्ये घेऊन जाते. जीवनाचा प्रत्येक अनुभव तीव्रता बनावा,प्रत्येक अनुभवात इन्टेन्सिटी असावी.     प्रा. महेन्द्र देशमुख,९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25