ओशो वाणी भाग 15

 ओशो वाणी भाग 15.                        जे लोक जीवनात लीन होतात आणि आणि जे जीवनाला पूर्णपणे पिऊन घेतात, जे जीवनाला पूर्णपणे आत्मसात करतात, ते जीवनाचा साक्षात्कार पण करू शकतात.ही गोष्ट थोडी समजून घेणे आवश्यक आहे कारण जी गोष्ट याच्या पूर्णपणे विरोधी आहे, त्याची मुळे आपल्या खूप खूप खोलवर गेलेली आहेत.जीवनाला सर्व बाजूंनी सोडून देण्याचा, त्याचा त्याग करण्याचा भाव हजारो वर्षांपासून आपल्या मध्ये आहे. तो खूप खोलवर आपल्या अन कॉन्शस पर्यंत, आपल्या अचेतन मनापर्यंत प्रविष्ट झालेला आहे. भोजन करावयाचे असेल तर अस्वादाने भोजन करावे, स्वाद घेणे पाप आहे. शिक्षक समजावतात की स्वाद घेणे पाप आहे. अस्वाद. स्वाद घेऊ नका, संगीत ऐकू नका. कारण संगीता चा रस तर इंद्रियाचे सुख आहे. कानाचे सुख आहे. सौंदर्य पाहू नका, कारण सौंदर्य..सौंदर्य तर रूप आहे .डोळे फोडून घ्या, तर तुम्ही त्यागी आहात कारण सौंदर्य तर रूप आहे, डोळ्यांचे सुख आहे. ही तर सगळी इंद्रियांची सुखे आहेत. या सर्वांना सोडून द्या, या सर्वांचा त्याग करा,आणि इंद्रियांचे सर्व द्वार बंद केले गेले तर माणसात काय शिल्लक राहते?तुम्हाला माहित आहे? काही नाही. नकार.इंद्रियांचे दरवाजे सर्व बाजूंनी बंद करण्यात आले तर माणसात काय शिल्लक राहील? फक्त नकार.काही नाही. त्याच्या अनुभवांचे सारे स्त्रोत जर विषाक्त केले गेले त्याला सांगितले कि हे रूप आहे, त्याला सांगितले कि हा स्वर आहे, हा स्वाद आहे,सांगितले की हा स्पर्श आहे,तर जीवनाशी संबंधित होण्याचे सर्व मार्ग बंद झाले. तर जीवनाला पिण्याचे, जीवनाचा आस्वाद घेण्याचे सर्व द्वार बंद होऊन गेले. आता स्वभावतः माणूस उदास होऊन जाईल, दुःखी होऊन जाईल,पीडित होऊन जाईल, घाबरून जाईल, बेचैन होऊन जाईल. आणि या बेचैनी, उदासी आणि दुःखात तो परमात्म्याची प्राप्ती करू शकेल का? परमात्म्याची प्राप्ती फक्त तोच व्यक्ती करू शकतो जो आनंदाने भरून गेलेला असतो.दुःखाच्या अश्रुंनी नव्हे. जो आनंदाच्या गीतांनी भरून गेलेला असतो, तोच परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. प्रभूच्या द्वारा पर्यंत तेच लोक पोहोचू शकतात जे नाचत आणि हसत पोहोचतात.रडणाऱ्या लोकांसाठी त्याद्वारा वर कुठलीही जागा नाही. दुःखात रडणाऱ्या लोकांसाठी तिथे कुठलीही जागा नाही.हे दुःख आणि पिडेने भरलेले लोक तर कुंठित लोक होऊन जातात.दुःख आणि पीडेने  भरलेले लोक उदास होऊन जातात. आणि उदासीन लोक तर आतून संकुचित होऊन जातात. त्यांचा विस्तार तुम्हाला माहीतच असेल. दुःखात माणूस संकुचित होऊन जातो, आनंदात विस्तारतो.तुम्हाला माहीतच असेल कि जेव्हा माणूस दुःखात असतो,तेव्हा म्हणतो की मला कुणालाही भेटायची इच्छा नाही. दुःखात माणूस संकुचित होतो. आनंदात विस्तारत जातो. दुःखात कुणी कुणाशी भेटू इच्छित नाही. का? कारण दुःख माणसाला संकुचित करते, तोडून टाकते .दुःखामध्ये माणूस द्वार बंद करून  घेतो.आपल्या एका कोपऱ्यात जाऊन बसतो. का? कारण दुःख संकुचीत करते.दुःख कुंठित करते. हे दुःख जास्त झाल्यास माणूस आत्महत्या करून घेतो.आत्महत्येच्या द्वारे स्वतःला संकुचित करून घेतो. आता कोणाशी संबंधित होण्याची काहीही आवश्यकता नाही. आत्महत्येचा तरी दुसरा काय अर्थ आहे ?एवढाच अर्थ आहे की आता मला कोणाशी संबंधित व्हायची इच्छा नाही.आता मला कुणाच्या जीवनात भागीदार होण्याची इच्छा नाही. आता मला कुठलीही अशी संधी ठेवायची नाही की ज्यात स्वतः शिवाय मी इतरांची कुणाशी जोडलेला असेल. आत्मघात करणे हे स्वतःला टोकाचे संकुचित करून घेणे यापेक्षा जास्त काय आहे ?पण आनंदात माणसाचा विस्तार होतो. जर एक माणूस एखाद्या खोलीत बंद आहे आणि तो आनंदाने भरून गेला तर तो भिंत तोडून टाकेल, पळत बाहेर जाईल ,आणि उन्हात मोकळ्यात नाचायला लागेल,आणि लोकांच्या जवळ जाईल.आपला आनंद वाटण्याचा प्रयत्न करेल. आनंदामध्ये माणूस इतरांना भागीदार करून घेतो, आनंद वाटतो, त्याचा विस्तार होतो. दुःखात त्याचा संकोच होतो आणि जितका माणूस विस्तारतो, त्याचा जेवढा विस्तार होतो, तेवढाच सर्वत्र पसरलेल्या परमात्म्याशी तो एक होऊन जातो.परमात्मा काय आहे? एक प्रचंड विस्तार.ब्रम्ह या शब्दाचा तर अर्थच असा आहे की जो विस्तारलेला आहे,जो अंतहीन असा जन्माला आला आहे. तो, ज्या विस्ताराचा कुठलाही अंत नाही. कुठेही जा, त्याचा विस्तार होतच गेला आहे, अजून विस्तार झाला आहे, अजून विस्तार झाला आहे.तुम्ही अशा कुठल्याही ठिकाणी पोचू शकत नाही जिथे तुमच्या हे लक्षात येईल की या अनंत विस्ताराचा अंत आला आहे. त्यालाच तर ब्रम्ह असे म्हणतात. ब्रह्म म्हणजे विस्तार.ब्रह्म म्हणजे अंतहीन विस्तार. तर माणूस जेवढा संकुचित होईल तेवढेच या विस्ताराशी त्याचे नाते तुटेल. जो माणूस जेवढा विस्तारीत होईल, तेवढाच तो या विस्ताराशी एकरुप होऊन जाईल. म्हणून आनंद आपल्याला परमात्म्याशी जोडतो, दुःख त्याच्यापासून तोडते. दुखवादी दृष्टी , पेसिमिस्ट, निराशावादी दृष्टी,जिवनाची निंदा करणारी दृष्टी आपणास तोडून टाकते.संकुचीत करते, एका बिंदूवर आपणास थांबवून टाकते .आनंद, आशा, जीवनाचा रस आणि जीवनाचा छंद आणि जीवनाच्या गीतांसोबत तल्लीन होऊन जाण्याची पात्रता आपला विस्तार करते. विस्तार करते, विस्तारच करीत राहते .हळूहळू फक्त विस्तार शिल्लक राहतो ,एक अंतहीन विस्तार.त्या विस्ताराचे च नाव प्रभू आहे. त्याच विस्तारामध्ये तुम्हाला घेऊन जायची माझी इच्छा आहे.                                प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25