ओशो वाणी भाग 18

 ओशो वाणी भाग 18.                          तिसरा स्तर आपल्या वेदनांचा आहे, आपल्या संवेदनांचा आहे .24तास आपण कुठल्या ना कुठल्या संवेदनांनी घेरलेले असतो एकतर आपण सुखाने घेरलेले असतो किंवा दुःखाने वेढलेले असतो.जेव्हा दुःख असते, तेव्हा आपण दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आणि सुखाची आकांक्षा करतो. हेच आपले टेन्शन, हीच आपली समस्या असते ,हाच आपला त्रास असतो. जेव्हा सुख येते, तेव्हा आपल्या मनात ही भीती निर्माण होते की पुन्हा दुःख तर येणार नाही? म्हणून आपण सुखाला पकडून ठेवण्याची इच्छा करतो,आणि दुःखाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा टेन्शन,त्रास आणि तणाव कायम राहतो. माणूस खूप विचित्र परिस्थितीत आहे. दुःख असेल तेव्हा तो दुःख सहन करतो, यासाठी दुःख सहन करतो कि दुःख आहे आणि ते दूर व्हावे,आणि सुख असेल तर यासाठी  दुःखी होतो की सुख तर आहे,पण दुःख येऊ नये. दुःख बाहेर राहावे आणि सुख कायम राहावे. सुखाला पकडू इच्छितो, दुःखाला दूर हटवायला पाहतो. दुःखाला दूर करण्यात आणि सुखाला पकडण्यात ,दोन्ही परिस्थितीत उत्तेजना निर्माण होते. दुःखही एक उत्तेजना आहे ,ती व अप्रितिकर उत्तेजना आहे.सुख ही एक उत्तेजना आहे,ती प्रीती कर उत्तेजना आहे, आणि कुठलीही उत्तेजना मनासाठी अशांतीचे कारण आहे, हे स्मरण ठेवा. सुखाची असो किंवा दुःखाची असो, उत्तेजना ही अशांती आहे. जर शांत व्हायचे असेल तर उत्तेजनेला थोडे सोडावे लागेल.तर उत्तेजना काय आहे? दुःख येते,त्याला आपण दूर करण्याची इच्छा करतो.ही उत्तेजना आहे.सुख येते, त्याला आपण पकडू पाहतो. जेव्हा दुःख येते, तेव्हा त्याला दूर हटवण्याचे बाबतीत जास्त विचार करू नका. जेव्हा चित्त दुःखाने भरलेले असेल, तेव्हा त्या दुःखाचा स्वीकार करा. त्याला घाबरू नका.त्याच्यामुळे त्रस्त,उत्तेजित होऊ नका. थोडी समता ठेवा. आणि जेव्हा सुख येईल तेव्हाही त्याने उत्तेजित,आंदोलित होऊ नका, थोडी समता ठेवा. सुख-दुःखाच्या प्रति समतेचा भाव. आपल्या मनात जिथे संवेदना आपल्याला व्यथित करतात, तिथे संवेदनांच्या व्यथे पासून वाचण्याचा उपाय मिळेल. तिथे क्रमशः जरा पहा,प्रयोग करून पहा, सुख येईल तेव्हा थोडे अनुत्तेजित राहून पहा. कठीण बिलकुल नाही,केले नाही एवढेच. सुख येईल तेव्हा जरा अनुत्तेजित राहून पहा.जरा पहा की सुख आले आहे तेव्हा काय उत्तेजना आत मध्ये होत असते,का होत असते? आणि आपल्याला दिसेल की कुठलीही उत्तेजना होत नाहीये. सुख आले आहे, उत्तेजना नाही.सुख आले,आणि उत्तेजना नसेल,तर ज्या दिवशी दुःख येईल, त्या दिवशीही उत्तेजना नसेल. त्या दोघांची, एकाचीही उत्तेजना शून्य होऊन जाईल, तर दुसऱ्याची आपोआप शून्य होऊन जाईल..तपश्चर्या दुसरे काही नाही आहे, तपश्चर्ये ची दोन रूप आहेत ,जे दुःखात असतील, त्यांनी दुःखाची उत्तेजना सोडून द्यावी,जे सुखात असतील, त्यांनी सुखाची उत्तेजना सोडून द्यावी.सम्राट ही तपस्वी होऊ शकतो, जनक तसा होता.जनकाची साधना अशी होती, सुख आहे, त्याची उत्तेजना घ्यायची नाही. महावीर दुसरे साधक आहेत, दुःख आहे, त्याची उत्तेजना घेणार नाही. अशा गावात जाऊन उभे राहायचे,जिथे लोक त्यांना त्रास द्यायचे, अशा स्मशानामध्ये थांबायचे, जिथे लोक त्यांना त्रस्त करायचे. त्यांचे साथी,त्यांचे मित्र यांनी त्यांना निवेदन केले की अनेक चांगल्या जागा ही आहेत .तुम्ही अशाच जागा का शोधता, आणि तिथे जाऊन का उभे राहता?  महाविरा साठी तो तपश्चर्येचा भाग होता. दुःखाला जसे आमंत्रण देत फिरत असत.आणि दुःख येईल, तेव्हा पाहायचे की उत्तेजनाआहे की नाही? दुःख आले तरी अनुत्तेजित आहे का मनुष्य?तर मी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही दुःखाच्या शोधात निघावे. दुःख तर असेच खूप येतात. तुम्हाला शोधायला जाण्याची आवश्यकता नाही. ते तसेच खूप मोठ्या प्रमाणात येतात. तुम्ही त्यांना परीक्षा समजा आणि पहा की चित्ता चा समतोल आहे का?त्यावेळी तुमचे चित्त अनुत्तेजित राहू शकते का? जर राहत असेल,थोडा थोडा भाव केल्याने, राहू शकेल एक दिवस, तुम्ही पहाल, दुःख उभे आहे,सुख उभे आहे,आणि तुम्ही बिलकुल अकंप होऊन त्याला पहात आहात.त्याने तुम्हाला स्पर्श केला नाही, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश केला नाही. ही भावना जेवढी खोल असेल, तेवढीच तुमच्या मनातील शांती प्रगाढ होईल आणि समाधीची संभावना सुनिश्चित होत जाईल.        प्रा. महेंद्र देशमुख 90 96 694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25