ओशो वाणी..bhag1

 ओशो वाणी भाग 1




 : भाग १. "जीवन काय आहे?". _________________. जीवन काय आहे? एक पवित्र यज्ञ. पण त्यांच्यासाठीच जे सत्यासाठी स्वतःची आहुती देण्यास तयार असतात. जीवन काय आहे? एक अमूल्य अवसर. पण त्यांच्याचसाठी जे साहस, संकल्प आणि श्रम करतात. जीवन काय आहे? एक वरदान रूपी आव्हान.. पण त्यांच्यासाठीच जे त्याचा स्वीकार करतात, त्याला सामोरे जातात. जीवन काय आहे? एक महान संघर्ष. पण त्यांच्यासाठीच जे स्वतःची संपूर्ण शक्ती एकवटून विजयासाठी झुंजतात. जीवन काय आहे? एक भव्य जागरण. पण त्यांच्यासाठीच जे स्वतःच्या निद्रेशी आणि मुर्च्छेशी लढत असतात. जीवन काय आहे? एक दिव्य गीत. पण फक्त त्यांच्यासाठी ज्यांनी स्वतःला परमात्म्याच्या वाद्यात रूपांतरित केले आहे. अन्यथा, जीवन एक लांबलचक आणि मंदगतीने होत असलेल्या मृत्यूशिवाय आणखी काही नाही. जीवन तेच होत असते, जे आपण जीवनासोबत करत असतो. जीवन भेटत नसते, जिंकले जात असते.स्वतः द्वारे स्वतःचे सतत केले जाणारे सृजन म्हणजे जीवन.. जे नियती नाही, निर्माण आहे. न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडताना एका विधिज्ञाने आपल्या अतिशय लांब आणि कंटाळवाण्या भाषणाच्या मध्यंतरी थांबून रागाने न्यायाधीशाला सांगितले,"महाशय, ज्युरीचे सर्व सदस्य झोपले आहेत."न्यायाधीश म्हणाले,"मित्रा, तूच त्यांना झोपवले आहे. कृपया आता आसे काही कर कि ते जागे होतील. मी स्वतः कित्येक वेळा झोपता झोपता वाचलो आहे.". जीवन निद्रिस्त अवस्थेत असल्याप्रमाणे जाणवत असेल तर जाणून घ्या की तुम्हीच असे काही केले आहे की ते झोपी गेले आहे. जीवन दुःखमय प्रतीत होत असल्यास हे जाणून घ्यावे लागेल की आपणच काहीतरी असे केले आहे, ज्यामुळे ते दुःखपूर्ण झाले आहे. जीवन तर आपली प्रतिध्वनी आहे. ते तर आपलेच प्रतिफलन आहे.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25