ओशो वाणी भाग 9

 ओशोवाणी भाग 9.                      एका वाळवंटातील धर्मशाळेत एक  मोठा उंटांचा काफिला आला होता. यात्री थकलेले होते आणि उंट ही थकले होते. उंटांच्या मालकाने खुंट्या गाडल्या आणि त्यांना उंटांसाठी दोर खंड बांधले जेणेकरून उंट विश्रांती घेऊ शकतील. पण खुंट्या गाडताना हे लक्षात आले की त्या पैकी एका उंटाची खुंटी आणि दोर हरवले होते.त्या उंटाला मोकळे सोडणेही कठीण होते कारण रात्री अंधारात तो हरवण्याची शक्यता होती. त्यांनी धर्मशाळेच्या मालकाला जाऊन सांगितले की जर आम्हाला एक दोर आणि खुंटी भेटली तर आपली मोठी कृपा होईल कारण आमची खुंटीआणि दोर हरवला आहे. धर्म शाळेचा मालक म्हणाला, खुंटी आणि दोरखंड तर आमच्याकडे नाहीत, पण तुम्ही असे करा, खुंटी काढा, दोर बांधून टाका, आणि उंटाला म्हणा की झोपी जा. काफिल्याचा मालक खूप आश्चर्यचकित झाला.तो म्हणाला की जर खुंटी आणि दोर आमच्याकडे असले,तर आम्ही स्वतः उंटाला बांधले नसते का? आता आम्ही कोणती खुंटी गाडावी आणि कोणती दोरी बांधावी? धर्मशाळेच्या मालक यावर हसायला लागला आणि म्हणाला, हे आवश्यक नाही की उंटाला खरी खुंटी आणि खऱ्या दोरीने बांधावे. नकली  खुंटी ने उंटाला बांधले जाऊ शकते. नकली खुंटी गाडा आणि खोट्या दोरीने उंटाच्या गळ्याला बांधा, आणि त्याला म्हणा ,की तू झोपी जा. दुसरा कुठलाही मार्ग नव्हता.विश्वास तर बसला नाही की असे होऊ शकेल, पण तरी त्यांनी खोटी खुंटी गाडली,जी खुंटी नव्हतीच ती ठोकण्यासाठी त्या खुंटीवर खोटे आघात केले. खुंटी ठोकण्याचे आवाज त्या उंटाने ऐकले आणि त्याला वाटले की खुंटी गाडली जात आहे.आणि जी दोरी अस्तित्वातच नव्हती ती दोरी उंटाच्या गळ्याला बांधण्याचे नाटक त्यांनी केले. उंटाला वाटले असेल की दोरी बांधली जात आहे. जसे त्यांनी इतर उंटाना झोपी जाण्यासाठी सांगितले होते, तसेच त्या उंटाला ही सांगितले. तो उंट बसला आणि झोपी गेला. सकाळी जेव्हा तो काफिला त्या धर्म शाळेतून निघाला तेव्हा त्यांनी 99 उंटाच्या खुंट्या  काढल्या णि दोर्‍या सोडल्या. पण शंभराव्या उंटाची तर कुठलीही खुंटी नव्हती ना कोणती दोरी होती म्हणून ना तर त्याची खुंटी उखडली गेली ना कुणी दोरी सोडली. 99 उंट तर उठून उभे राहिले परंतु शंभराव्या उंटाने उठण्यास नकार दिला. ते खूप हैराण झाले. त्यांनी पुन्हा धर्मशाळेच्या त्या म्हाताऱ्या मालकाला जाऊन विचारले की तुम्ही कोणती कोणता मंत्र टाकला आहे? कोणती जादू केली आहे की आमचा उंट जमिनीशी बांधून बसला आहे,तो उठायला तयार नाही.सगळे  उंट उठून जायला तयार झाले आहेत, पण शंभरावा उंट तर जमिनीवर तसाच बसून आहे. त्या धर्मशाळेच्या म्हाताऱ्या मालकाने सांगितले, जाऊन पहिल्यांदा उंटाची खुंटी तर जमिनी बाहेर काढा, त्याची दोरी तर सोडा. ते म्हणाले, तिथे तर कुठलीही दोरी नाही आणि कुठलीही खुंटी नाही. तो मालक म्हणाला, तुमच्यासाठी नसेल, पण उंटा साठी तरी आहे.जा, लवकर जाऊन खुंटी काढा आणि त्याच्या गळ्यातून दोरी काढा.ज्याप्रमाणे तुम्ही खुंटी काढली आणि खोटी दोरी बांधली, त्याच प्रकारे त्यांना काढावे ही लागेल. ते गेले आणि त्यांनी त्या खुंटीला जमिनी बाहेर काढले जी तिथे नव्हतीच, आणि ती दोरी सोडली, जिचे कुठलेही अस्तित्व नव्हते. तो उंट उठून उभा राहिला, आणि बाकीच्या मित्रांसोबत चालण्यासाठी तयार झाला. ते खूप आश्चर्यचकित झाले, आणि त्यांनी त्या धर्मशाळेच्या मालकाला विचारले की काय रहस्य आहे या गोष्टीचे? तो म्हणाला,फक्त उंटच नाही तर माणसेही अशा खुंट्या ना बांधलेले असतात  ज्यांचे कुठलेही अस्तित्व नाही, आणि अशाच खोट्या दोर्‍यांनी  स्वतःला बांधून घेऊन परतंत्र झालेले असतात, ज्यांची कुठलीही सत्ता नाही . उंटांचा मला कुठलाही अनुभव नाही, पण मनुष्यांच्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला तो सल्ला दिला होता.मी ही या धर्मशाळेच्या म्हाताऱ्या मालकाशी सहमत आहे.मनुष्यांना पाहून मीही त्याच निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे.          प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25