ओशो वाणी भाग 11

 ओशो वाणी भाग-11.                         या विश्वात काहीही असंबंधित नाही. एव्हरीथिंग इज रिलेटेड, दि वर्ल्ड इज अ फॅमिली. हे जे जग आहे,एक परिवार आहे.तिथे  असंबंधित काहीही नाही.तिथे सर्व काही जोडलेले आहे. तुटलेले काहीही नाही.तिथे दगडाशी माणूस जोडलेला आहे,जमिनीशी चंद्र-तारे जोडलेले आहेत. चंद्र तार्‍यां शी आपल्या हृदयाची धडधड जोडलेली आहे,आपले विचार सागराच्या लाटांशी जोडलेले आहेत. पर्वतांवर चमकणारे बर्फ आपल्या मनात चालणाऱ्या स्वप्नांशी जोडलेलेआहे.तिथे तुटक असे काही नाही. तिथे सगळे काही संयुक्त आहे, इथे सर्व एकत्र आहे, इथे वेगळे वेगळे होण्याचा उपाय नाही, कारण इथे मध्ये अंतर नाही, जिथून वस्तू तुटतील. वेगळे असणे,तूटलेले असणे हा केवळ आपला भ्रम आहे. यासाठी योगाचे चौथे सूत्र आपणास सांगत आहे:ऊर्जा संयुक्त आहे,ऊर्जा एक परिवार आहे. न चेतन अचेतन यापासून तुटलेले आहे न अस्तित्व अनास्तित्वा पासून तुटलेले आहे, न पदार्थ मनापासून तुटलेला आहे, न शरीर आत्म्यापासून तुटलेले आहे. न परमात्मा पृथ्वीपासून तुटलेला आहे, प्रकृतीपासून तुटलेला आहे. तुटलेला असणे हा शब्दच खोटा आहे. सर्व काही जोडलेलेआहे. सर्व एकत्र आहे, संयुक्त आहे.संयुक्त आणि एकत्र  हे शब्द चुकीचे वाटतात कारण हे शब्द आपण त्यांच्यासाठी वापरतो जे तुटलेले आहेत.हे एकच आहे. जसे एकाच सागरात अनंत लाटा आहेत, प्रत्येक लाट दुसऱ्याला जोडलेली आहे, आपण ज्या किनाऱ्यावर बसला आहात तिथे जी लाट येऊन धडकते, ती लाट अंतहीन किनार्‍यांशी जोडलेली आहे, जे तुम्हाला दिसतही नाहीत. तिथे सर्व काही जोडलेले आहे. या अनंत विस्तारात सर्वकाही संयुक्त आहे.इथे एक फूल उमलले तर तेही आपल्याशी जोडलेले आहे,आणि रस्त्याच्या कडेला एक खडा पडलेला असेल तर तोही आपल्याशी जोडलेला आहे. योग म्हणतो, आपण सर्व जोडलेले आहोत. यासाठी योग म्हणतो की जेव्हा एक माणूस वाईट विचार करतो तेव्हा आसपास असणारे सर्व लोक वाईट होण्यास सुरुवात होऊन जाते. त्या विचाराला प्रकट करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा एक माणूस चांगला विचार करतो तेव्हा त्याच्या आसपास चांगल्या विचारांचे तरंग पसरायला सुरवात होऊन जाते, चांगल्या विचारांना प्रकट करण्याची काही आवश्यकता नाही. अचानक एखाद्या माणसाच्या समोर जाऊन तुम्हाला असे वाटते की तुम्हाला खूप शांत वाटत आहे, तुम्हाला शांती भेटली आहे. आणि अचानक एखाद्या माणसाच्या समोर गेल्यावर तुम्हाला असे वाटते की सर्वत्र अशांती पसरली आहे.एखाद्या रस्त्यावरून जाताना असे वाटते की जसे तुमचे मन हलके झाले आहे.एखाद्या रस्त्यावरून जात असताना असे वाटते की तुमचे मन खूप जड झाले आहे. एखाद्या घरामध्ये बसल्यावर असे वाटते की तुमचे मन भयभीत झाले आहे,तर एखाद्या घरात बसल्यावर तुमचे हृदय प्रफुल्लित होऊन जाते, हे सगळे चारी बाजूंनी येत असणार्‍या तरंगांचा परिणाम आहे. हे चारही बाजूंनी तुम्हाला घेरणारे तरंग तुम्हाला स्पर्श करीत असतात. असे नाही की फक्त ते तरंग तुम्हाला स्पर्श करत आहेत,तुम्हीपण त्यांना स्पर्श करत आहात. हे पूर्ण वेळ असेच चालत असते. या प्रचंड अशा विस्तारामध्ये आपणही ऊर्जेचे एक पुंज आहोत,आणि आपल्या चारी बाजूंना ऊर्जेचे डायनॅमिक सेंटर आहे, ते सर्व कार्यरत आहेत.या साऱ्या जगाची नियती आम्हा सर्वांची एकत्रित नियती आहे. योगाच्या या चौथ्या सूत्राचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजणे चुकीचे आहे. आपण स्वतःला वेगळेच समजून जगणे म्हणजे स्वतःच्या हातांनी आपल्या डोक्यावर ओझे वाहण्या प्रमाणे आहे.योग असे म्हणतो की फक्त त्याच लोकांचे डोके जड होते जे या सत्याला  समजू शकत नाहीत की जीवन संयुक्त आहे,जीवन एकत्र आहे. श्वास हवेवर निर्भर आहे, प्राणांची उष्णता ताऱ्यांवर आणि सूर्यावर निर्भर आहे जीवनाचे असणे सृष्टीच्या क्रमावर निर्भर आहे, मृत्यूचे होणे ही जन्माची दुसरी बाजू आहे. हे सर्व होत आहे. आपण या सर्वांना उचलून आपल्या डोक्यावर ठेवून घेत असतो.योग म्हणतो की जर आपण हे पाहू शकू की आपण एका मोठ्या जाळ्या मधील एका छोट्याशा तंतू पेक्षा जास्त नाही आहोत. योग म्हणतो की तुम्ही हे समजून घ्या की नदी वहात आहे, तुम्हाला तिला  वाहवायचे नाही.नदी वाहत आहे, तिला थांबवायचे नाही. आणि तुम्ही त्या नदीचा एक भाग होऊन जा.नदीच्या प्रवाहात वाहत जाणारे गवताचे पातेही होऊ नका,एक लाट बनून जा .आणि तेव्हा तुम्ही निर्भर होऊन जाल, हलके होऊन जाल. तेव्हा तुमच्या डोक्यावर कुठलेही ओझे राहणार नाही. पश्चिमेकडील देशात एक नवीन शब्द एलिअनेशन प्रचलित झाला आहे, ज्याचा अर्थ आहे एकटेपण, अनोळखी पण.अनोळखी माणसांप्रमाणे एक एक माणूस झाला आहे. प्रत्येक माणसाला असे वाटत आहे की तो एकटा होऊन गेला आहे, सर्वांपासून तुटलेला आहे. यासाठी पश्चिमे मध्ये एवढी चिंता आणि एवढे ओझे आहे.आणि एक माणूस जणू चिंतेच्या पर्वतांच्या खाली दाबला जात आहे, आणि एक एक माणूस वेडा होत चाललेला आहे,मनोरुग्ण होत आहे, आपल्या इथेही असंच होत आहे. योग म्हणतो की हे चुकीचे आहे, तुम्ही एकटे आहात हा तुमचा गैरसमज आहे.हे जग एकत्र जोडलेले आहे. ज्या दिवशी कुणी माणूस असे समजून घेतो की मी सर्वांशी जोडलेला आहे,त्यादिवशी त्याच्या डोक्यावरील चिंतेचे सर्व ओझे निघून जाते. त्यादिवशी तो अंतरंगातून मुक्त होऊन जातो.त्याच्यावरील सर्व बंधनातून त्याची मुक्ती होऊन जाते.  प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25