ओशो वाणी भाग 8

 ओशोवाणी भाग 8.                            जेव्हा तुम्हाला कुणी शिव्या देईल तेव्हा तुम्ही दोन काम करू शकता. एक जे तुम्ही करता कि जेव्हा  तुम्हाला कुणी शिव्या देतो तेव्हा तुम्ही शिव्या देता.. जर शिव्या देणारा तुमच्यापेक्षा शक्तिशाली असल्याचे दिसले तर मनातल्या मनात शिव्या देता आणि वर वर हसत राहता. जर समोरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा कमजोर दिसला तर उघड उघड स्वरूपात शिव्या देता. एका छोट्या शाळेत एक ख्रिश्चन पादरी मुलांना समजावत होता की क्षमा केली पाहिजे.  क्षमा मोठा गुण आहे. जेव्हा तुम्हाला कोणी शिव्या देईल त्याला क्षमा करून टाका. मग त्याने एका लहान मुलाला विचारले की बोल, मी सांगितलेले तुला समजले? तो म्हणाला, बिलकुल समजले, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर मी बिलकुल सहजपणे क्षमा करून टाकतो पण आपल्यापेक्षा लहानांना क्षमा करणे असंभव आहे. आपल्याहून मोठ्यांना मी सहजपणे माफ करू शकतो पणआपल्याहून लहानांना क्षमा करणे असंभव आहे. कमजोर व्यक्तीला क्षमा करणे असंभव आहे. शक्तिशाली व्यक्तीला तर तुम्ही माफ करूनच टाकता कारण झंझट आहे, पण ज्या दिवशी तुम्ही एखाद्या कमजोर व्यक्तीला क्षमा करून टाकाल त्यादिवशी तुमच्या आयुष्यामध्ये एक रूपांतरण होऊन जाते. एक व्यवहार आहे शिव्या देण्याचा, एक तर उघड उघड द्या किंवा मनातल्या मनात द्या .मी ऐकले आहे की एक साधारण सैनिक , त्यालापहिल्या महायुद्धामध्ये पुरस्कार मिळाला. एका साधारण सैनिकाला त्याच्या वीरते मुळे मेजर बनवले गेले. तो एके दिवशी सैन्याच्या जनरल सोबत रस्त्याने चालला होता. आणि तेव्हा सर्व सैनिक सलामी देत होते. जेव्हा जेव्हा तो सलामी ऐकायचा तेव्हा मनातल्या मनात म्हणायचा, दी सेम टू यू.हेच तुमच्या साठी पण. जनरल ला थोडे आश्चर्य वाटले, तो म्हणाला, तू हे वारंवार काय म्हणत आहेस की सेम टू यू?वर वर सलामी करत आहेस आणि हळूच हे काय म्हणत आहेस की तेच तुमच्यासाठी पण.तो म्हणाला, आपल्याला माहीत नाही की मनातल्या मनात हे लोक काय म्हणत आहेत ?मला माहित आहे, मी पूर्वी सैनिक होतो. हे लोक मनातल्या मनात शिव्या देत आहेत आणि वरून सलामी देत आहेत. यासाठी मी हळूच म्हणत आहे,  दि सेम फॉर यू. यांची खरी परिस्थिती मला माहित आहे, मी पूर्वी राहिलेलो आहे सैनिक.माणसाचा हा तर सहज व्यवहार आहे की कुणी शिव्या दिल्या तर तोही शिव्या देईल. जर उघड-उघड देऊ शकला तर ठीक आहे, नाहीतर मनातल्या मनात शिव्या देईल कारण दिल्या नाही तर त्याला बेचैनी होईल. आणि  लाओ- त- से म्हणतो की तुम्हाला कोणी जेव्हा शिव्या देईल, तेव्हा तुम्ही त्यांना पिऊन टाका.तुम्ही उत्तर देऊ नका.तुम्ही कोणत्याही प्रकारचा बाहेरून किंवा आतून प्रतिकार करू नका आणि लाओ- त- से एक अशी गहन गोष्ट सांगत आहे, की ही जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही  चकित होऊन जाल की तुम्ही आज वर किती ऊर्जा व्यर्थ वाया घालविली.जेव्हा तुम्ही कुणाची शिवी चुपचाप,शांतपणे पिऊन टाकता तेव्हा त्याची शिवी तुम्हाला मजबूत करून टाकते, शक्तिशाली करून टाकते.एक तर तुम्ही शिव्या देण्यात जेवढी ऊर्जा खर्च केली असती, क्रोधित झाला असता, परेशान झाला असता, बेचैन झाला असता,या सर्व गोष्टींपासून तुम्ही वाचता. दुसऱ्याने शिवीच्या द्वारे जी ऊर्जा तुमच्याकडे फेकली आहे,तुम्ही ती ऊर्जा पण सामावून घेतली.तिला पण तुम्ही आत्मसात केले.तो व्यक्ती शिव्या देऊन कमजोर झाला. तो शिवी देऊन लहान झाला, संकुचित झाला. त्याच्या शिवीला तुम्ही आत्मसात केले, तुम्ही सबल झालात.जरी जग असे म्हणेल की हा माणूस किती निर्बल आहे, की लोक याला शिव्या देतात आणि हा शिवी चे उत्तरही देत नाही. लोक तुम्हाला निर्बल म्हणतील, पण जीवनाच्या शास्त्राला जर तुम्ही विचारले, तर तुम्ही सबल होत आहात. तुमच्यामध्ये ही कला असायला पाहिजे की तुमच्यामध्ये काट्यांचे रूपांतरण फुलांमध्ये होईल. आणि ही एक कला आहे.जर तुम्ही लढला नाहीत,जर तुम्ही स्वीकार केले, जर तुम्ही अहो भावाने स्वीकार केले, जर तुम्ही शिव्यांचाही अहो भावाने स्वीकार केला,की जरूर याच्यामागे ही काही रहस्य असेल, काही लपलेले रहस्य असेल, आणि परमात्म्याने जर अशी स्थिती बनविली आहे की मला शिव्या मिळतील तर नक्कीच तो माझ्यापेक्षा जास्त जाणतो. ज्याने जन्म दिला आहे, ज्याने जीवन दिले आहे, तो निश्चितच आपल्यापेक्षा जास्त जाणतो.अस्तित्व आपल्या पेक्षा खूप मोठेआहे. या क्षणी त्याने शिव्या दिल्या, जरूर काही रहस्यअसेल, एखादे गूढ रहस्य असेल,काही लपलेली गोष्ट असेल,आपण घाई करू नये,आपण स्वीकार करावा.तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दुःखातही सुखाचा सुगंध येण्यास सुरुवात झाली आहे आणि  क्रोधातून ही करुणेचा चा जन्म होत आहे, आणि तुमच्या मध्ये प्रत्येक काट्याचे फूल बनते. तुमच्या दिशेने निखारे फेकले जातात आणि तुमच्यामध्ये पोहोचताच ते सर्व निखारे शीतल होऊन जातात.     प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25