ओशो वाणी भाग 2

   ओशो वाणी: भाग 2.                             अनुशासन म्हणजे काय? आज जे जगात दिसत आहे, तो तर अर्थ असा आहे की बाहेरून लादलेले नियम. शिक्षक लादतात, आई वडील लादतात, शाळा लादतात, समाज लादत असतो, असे करा, आणि तसे करू नका. असे उठा, असे बसा. याला ते शिस्त म्हणतात. मी याला शिस्त म्हणत नाही. मी तर अनुशासन त्याला म्हणतो की तुमच्या मधील विवेकाला जागे केले जावे आणि तुमचा विवेक तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करावे. एकच शिस्त आहे ती म्हणजे मनुष्याचा विवेक जागा असावा. अजून कोणतीही शिस्त नाही. आणि जी आंतरिक शिस्त आहे, ती आतून येणारी शिस्त हीच खरी शिस्त आहे आणि तीच खूप किमती आहे. बाहेरून थोपलेली शिस्त ही भयंकर गोष्ट आहे,ती आत्म्यालाच नष्ट करत असते. तर एक म्हणजे व्यक्तीची समज वाढली पाहिजे. जसे आपण आज शांत बसला आहात. याची दोन कारणे असू शकतात. एक तर तुम्हाला बोलण्याची परवानगी नसेल. सर्वांनी चूप बसावे अशी शिस्त, आज्ञा असेल तर ती बाहेरून लादलेली शिस्त होय, जी हानिकारक आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून मला ऐकण्यासाठी शांत बसला असाल, तर ती आतून अंतकरणा मधून आलेली शिस्त आहे. आतून येणारी शिस्त ही स्वतंत्रता आहे.आणि बाहेरून लादली गेलेली शिस्त ही गुलामी आहे. जे काही बाहेरून येते ती गुलामी असते, आणि मी गुलामीच्या विरोधात आहे. मला असे जग आवडेल ज्यात शिस्त नसेल, विवेक असेल. मुलांना आपण शिस्त शिकवतो, विवेक नाही आणि तुम्ही हे करा, ते करा म्हणून सांगतो, पण तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा हे शिकवत नाही. आपली शिस्त ही सैनिकी शिस्त आहे जी अजिबात चांगली नाही. अशा प्रकारच्या जबरदस्तीच्या शिस्तीचे खूप दुष्परिणाम होतात. जबरदस्ती लादली गेली असेल तर अशी शिस्त लादल्या गेलेला व्यक्ती कमजोर होईल, त्याचे बल नष्ट होईल. जेव्हा संधी मिळाली तेव्हा तो नेमकी उलट गोष्ट करेल. बाप दूर जाताच सिगरेट ओढेल. जबरदस्ती ची शिस्त माणसाला चोर बनवते म्हणूनच जगात सर्वत्र पहायला मिळते की आता कमजोर असलेल्या मुलांना तुम्ही कडक शिस्त लावाल, पण जेव्हा ते मोठे होतील आणि तुम्ही म्हातारे आणि कमजोर होताल तेव्हा तो बदला घेईल. ती त्याची प्रतिक्रिया असेल. जगात सर्वत्र हेच चालू आहे. ते लहान असताना तुम्ही त्यांना सतावले असेल, तर मोठे होउन ते तुम्हाला सतवतील. साऱ्या जगातील आईबाप मुलांमुळे कंटाळून गेले आहेत, त्रासून गेले आहेत. याचे कारण एवढेच की मुले लहान असताना त्यांनी जबरदस्तीने त्यांच्यावर काही नियम लादले असतील. ते मोठे होऊन त्याचा सुड घेत आहेत. हे एक वर्तुळ आहे जे आता पूर्ण झाले आहे. सर्व जगातील विद्यार्थी जाळपोळ, तोडफोड करत आहे. हा विद्रोह आहे आणि तो पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेल्या शिस्तीचा परिणाम आहे.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25