ओशो वाणी भाग 7

 ओशो वाणी भाग 7.                           एका फकिराची गोष्ट मला आठवते.. एक छोटीशी फकिराची झोपडी होती. रात्र होती, जोराचा पाऊस चालू होता. रात्रीचे बारा वाजले असतील, फकीर आणि त्याची पत्नी दोघे झोपले होते,कुणी माणसाने दरवाजा ठोठावला. छोटीशी झोपडी होती, कदाचित कुणाला आश्रय पाहिजे असेल. त्या फकीराने आपल्या पत्नीला सांगितले की द्वार उघड, कुणीतरी दारात उभा आहे, कुणी यात्री, कुणी अपरिचित मित्र. ऐकले तो काय म्हणाला? तो म्हणाला, कुणी अपरिचित मित्र. आपले तर जे परिचित आहेत, तेही मित्र नसतात. तो म्हणाला, कुणी अपरिचित मित्र!हा प्रेमाचा भाव आहे. कुणी अपरिचित मित्र दारात उभा आहे, दार उघड. त्याची पत्नी म्हणाली, पण जागा तर फार कमी आहे, आपल्या दोघांच्या लायकच मुश्किलीने आहे. त्यात कुणी तिसरा माणूस मध्ये आला तर आपण काय करायचे? तो फकीर म्हणाला, वेडे, हा कुण्या श्रीमंतांचा महाल नाही की छोटा पडेल, ही गरीबाची झोपडी आहे. श्रीमंतांचा महाल छोटा पडतो नेहमी, एक पाहुणा आला तर महाल छोटा पडतो त्यांचा. ही गरीबाची झोपडी आहे. त्याची पत्नी म्हणाली, यात झोपडी, श्रीमंत आणि गरीब याचा काय प्रश्न? जागा लहान आहे. तो फकीर म्हणाला, जिथे हृदयात जागा मोठी असेल तिथे झोपडी महाला सारखी वाटते आणि जिथे हृदयात छोटी जागा असेल, ह्रदय विशाल नसेल, तिथे झोपडी तर काय, महाल पण छोटा आणि झोपडी होऊन जातो. जा आणि द्वार उघड.. दारात उभ्या असलेल्या माणसाला परत कसे पाठवले जाऊ शकते? आता आपण दोघे झोपलो होतो, आता तिघे झोपू शकणार नाही, तिघे बसू, बसण्यासाठी खूप जागा आहे. नाईलाज होता, पत्नीला दरवाजा उघडावा लागला. एक मित्र आला, पाण्यात पूर्णपणे भिजलेला. त्याने कपडे बदलले. मग ते तिघे बसून गप्पा मारायला लागले. दरवाजा पुन्हा बंद आहे. पुन्हा कुणी दोन माणसांनी दार वाजवले. आता त्या फकिराने त्या मित्राला सांगितले, की जाऊन दार उघड, कुणीतरी आले आहे असे वाटते. तो दरवाज्याच्या जवळ होता, तो माणूस म्हणाला, कसा उघडू दरवाजा? जागा कुठे आहे इथे? तो माणूस आत्ता दोन घटका आधीच आला होता स्वतः आणि ही गोष्ट विसरून गेला होता की ज्या प्रेमाने मला जागा दिली होती, ती मला जागा दिली नव्हती, त्याच्या अंतःकरणात प्रेम होते म्हणून जागा दिली होती. आता कुणी दुसरे आले, पुन्हा जागा बनवावी लागेल. पण तो माणूस म्हणाला, नाही, दरवाजा उघडण्याची गरज नाही, आपणच तिघे इथे कसेबसे बसलो आहोत. तो फकीर हसायला लागला. तो म्हणाला, खूप वेडे आहात. मी तुमच्या साठी जागा केली नव्हती, प्रेम होते म्हणून जागा केली होती. प्रेम अजूनही आहे, ते तुमच्या वर संपून गेले नाही. दार उघडा. आता आपण दूर- दूर बसलो आहोत, नंतर आपण जवळ जवळ बसू. जवळ- जवळ बसण्यासाठी खूप जागा आहे. आणि खूप थंडीची रात्र आहे, जवळ- जवळ बसण्यामध्ये आणखी आनंदच मिळेल. दरवाजा उघडावा लागला. दोन माणसे आत आली. पुन्हा ते जवळ- जवळ बसून गप्पा मारायला लागले. अजून थोडा वेळ गेला आणि रात्र अजून पुढे गेली आहे, पाऊस पडतच आहे, आणि एका गाढवाने डोक्याने दरवाजा ढकलला. पाण्यात भिजले आहे, त्याला रात्री शरण पाहिजे होती. तो फकीर म्हणाला की मित्रांनो-ते दोन मित्र दरवाज्याजवळ बसले होते जे मागून आले होते-त्यांना तो म्हणाला की दरवाजा उघडा,कुणी अपरिचित मित्र पुन्हा आलेला दिसतोय.ते लोक म्हणाले, हा मित्र वगैरे नाही,हे गाढव आहे. याच्यासाठी द्वार उघडण्याची काही आवश्यकता नाही.तो फकीर म्हणाला, तुम्हाला कदाचित माहित नाही,श्रीमंताच्या दारात माणसासोबत ही गाढवासारखा व्यवहार केला जातो. ही गरीबाची झोपडी आहे. आम्हाला गाढवा सोबत ही माणसासारखा व्यवहार करण्याची सवय लागली आहे, दरवाजा उघडा. पण ते दोघे म्हणायला लागले,जागा? तो फकीर म्हणाला, जागा खूप आहे. आता आम्ही बसलेलो आहोत, आता आपण सर्वजण उभे राहू. उभे राहण्यासाठी खूप जागा आहे. आणि मग तुम्ही घाबरू नका,जर आवश्यकता भासली तर मी नेहमी बाहेर जाण्यासाठी तयार आहे,प्रेम एवढे करू शकते.एक प्रेमळ दृष्टिकोन, एक प्रेमपूर्ण हृदय बनविण्याची आवश्यकता आहे.जेव्हा प्रेम पूर्ण हृदय बनते तेव्हा माणसाच्या व्यक्तित्वा मध्ये एक तृप्तीचा भाव, एक रसपूर्ण तृप्ती निर्माण होते. तुम्हाला कधी हे लक्षात आले आहे का की जेव्हा कधी तुम्ही कुणाच्या प्रति थोडेसे प्रेमपूर्ण झालात, मागे एक तृप्तीची लाट  सुटली आहे.तुम्हाला हे माहित आहे का की तुमच्या जीवनात तृप्तीचे क्षण फक्त तेच राहिले आहेत जे बिनशर्त प्रेमाचे क्षण असतील,जेव्हा प्रेमासाठी कुठल्याही शर्ती किंवा अटी नसतील आणि जेव्हा तुम्ही रस्त्याने चालत असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केले असेल त्यावेळी मागे सुटलेल्या तृप्तीचा अनुभव तुम्हाला आहे?त्यावेळी मागे मागे तुमच्या सोबत आलेल्या शांतीचा भाव,तुमच्या प्राणातउठलेली आनंदाची लहर याची काही जाणीव तुम्हाला आहे? जेव्हा रस्त्याने चालताना एखाद्या माणसाला उचलून घेतले असेल, एखाद्या पडणाऱ्या व्यक्तीला पडण्यापासून वाचवले असेल, एखाद्या आजारी व्यक्तीला एक फूल दिले असेल,यासाठी नाही की ती तुमची आई आहे, यासाठी नाही की ते तुमचे वडील आहेत,नाही, तो तुमचा कुणीही नाही,पण एखाद्या आजारी व्यक्तीला फूल देणे आनंद पूर्ण आहे. माणसाच्या व्यक्तित्वात प्रेमाची संभावना वाढत गेली पाहिजे. ती इतकी वाढली पाहिजे.. वनस्पतींच्या प्रति, पक्ष्यांच्या प्रति, पशूंच्या प्रति,  माणसांच्या प्रती, अपरिचित व्यक्तींच्या प्रति, अनोळखी व्यक्तींच्या प्रति, परदेशी  व्यक्तींच्या प्रति, जे खूप दूर आहेत त्यांच्याप्रती, चंद्र  तार्‍यांच्या प्रति, आपले प्रेम वाढत गेले पाहिजे.प्रेम आणि ध्यान हे दोन्ही मिळून त्या दरवाजाला उघडतात जो परमात्म्याचा दरवाजा आहे. प्रेम+ ध्यान = परमात्मा. प्रेम आणि ध्यानाची बेरीज झाली की परमात्मा उपलब्ध होऊन जातो.            प्रा. महेन्द्र देशमुख.९०९६६९४२००.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25