रजनीश वाणी: भाग 31.
रजनीश वाणी: भाग 31. तुम्ही आत्महत्येबद्दल काय विचार करता? तुम्ही काय वेडे आहात की आणखी काही? मला माहित आहे की तुम्ही जीवनाला कंटाळून गेला आहात, तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे. जर तुम्ही खरोखरच जीवनाला कंटाळून गेला आहात , तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे, तर आत्महत्या करू नका, कारण आत्महत्या पुन्हा तुम्हाला याच जीवनात ओढून आणेल आणि असेही होऊ शकते की याहून अधिक घाणेरडे जीवन तुम्हाला भेटेल ,या जीवनापेक्षा जे तुम्ही आता जगत आहात. कारण आत्महत्या तुमच्यामध्ये अजून जास्त घाण जन्माला घालेल. आत्महत्या करणे हा अस्तित्वाचा अनादर आहे.अस्तित्वाने तुम्हाला विकसित होण्यासाठी जन्म दिला आहे,या जीवनाचा अवसर दिला आहे आणि तुम्ही हा अवसर असाच व्यर्थ गमावता आणि जोवर तुम्ही विकसित होत नाही,विकसित होऊन बुद्ध बनत नाही, तोवर तुम्ही जीवनात पुन्हा पुन्हा फेकले जाल .लाखो वेळा यापूर्वीही हे झालेआहे.आता वेळ आलेली आहे, जागे व्हा! ही संधी ,हा अवसर चुकवू नका.इथे माझ्याजवळ राहून आत्महत्येची खरी कला शिका.खऱ्या कलेमध्ये आपल्या देहाला नष्ट केले जात नाही.देह सुंदर आहे, देहाने काहीही चूक केलेले नाही.ते तर मन आ...