रजनीश वाणी भाग 26.
चित्ताची ही सवय आहे की त्याला कोणता ना कोणता आधार हवा असतो.चित्ताला आपल्या जीवनासाठी भोजन हवे असते.ते आधार मागत असते. कुठलातरी आधार पाहिजे.राम राम जपत असाल तर चित्ताला खूप प्रसन्नता आहे,काहीही हरकत नाही. कुठले भजन गात राहाल तर चित्ताला कुठलीच कठीणता नाही. त्याला कुठले ना कुठले भोजन मिळाले तर ते अस्तित्वात राहील, आणि ते टिकून राहिले तर आत्म्याचा अनुभव होऊ शकणार नाही. तर त्याचे भोजन हिरावून घ्यायचे आहे, त्याला निराधार करावयाचे आहे.हीच आपली साधना आहे.आता आपणच त्याला आधार दिला तर तर चित्त तर खूप प्रसन्नतेने त्याचा स्वीकार करेल. एक आधार दिला तर थोड्या कमी प्रसन्नतेने, जास्त आधार दिला तर जास्त प्रसन्नतेने. चंचलतेमध्ये चित्त खूप प्रसन्न राहते. ध्याना त त्याला अडचण वाटायला लागते कारण आपण त्याचा आधारच हिरावून घेत आहोत. तुम्हाला ही गोष्ट समजली ना? ते बिना आधाराचे राहूच शकत नाही. त्याला आपल्या मरणाची भीती वाटते .आणि ते बिलकुल स्वाभाविक आहे. आणि हीच तपश्चर्या आहे की जेव्हा ते आधार मागत असेल तेव्हा आपण साहस करून त्याला आधार देऊ नये. तर हे होऊ शकेल की सुरुवातीला आपण आधार न देत...