Posts

Showing posts from August, 2026

रजनीश वाणी भाग 35.

 1) मी काय पाहतोय? पाहतोय की मनुष्य झोपलेला आहे. तुम्ही झोपलेले आहात.प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे.रात्रच नव्हे ,दिवसही निद्रेतच जात आहेत . निद्रा तर निद्रा आहेच परंतु हे तथाकथित जागरण ही निद्राच आहे.केवळ डोळ्यांच्या उघडल्याने झोप संपत नाही.त्यासाठी तर अंतःकरणाचे खुलणे आवश्यक आहे.वास्तविक जागरणाचे द्वार अंत:करण आहे.ज्याचे अंत:करण झोपलेले आहे ,तो जागा असूनही जागा नसतो आणि ज्याचे अंत:करण जागे असते तो झोपलेला असूनही झोपत नाही. 2) जीवन जागरणामध्ये आहे. निद्रा तर मृत्यूचेच रूप आहे.जागृतीचा दिवा हृदयाला आनंदाने भरतो.निद्रा तर अंधकार आहे आणि अंधकारामध्ये असणे दुःखामध्ये, पिडे मध्ये, संतापामध्ये असणे आहे..स्वतःला विचारा की तुम्ही कुठे आहात? काय आहे? जर संतापात असाल, भयग्रस्त असाल ,दुःख आणि पिडे मध्ये  असाल तर समजा की अंधकारामध्ये आहात.हे जाणून घ्या की निद्रावस्थेत  आहात.जगण्याच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वी हे जाणणे आवश्यक आहे की तुम्ही निद्रेत आहात.जो हे समजून घेत नाही तो जागाही होऊ शकत नाही. कारा गृहातून मुक्त होण्याच्या आकांक्षेचा जन्म होण्यासाठी स्वतःच्या कारागृहामध्ये असण्याचा...