रजनीश वाणी भाग 35.
1) मी काय पाहतोय? पाहतोय की मनुष्य झोपलेला आहे. तुम्ही झोपलेले आहात.प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे.रात्रच नव्हे ,दिवसही निद्रेतच जात आहेत . निद्रा तर निद्रा आहेच परंतु हे तथाकथित जागरण ही निद्राच आहे.केवळ डोळ्यांच्या उघडल्याने झोप संपत नाही.त्यासाठी तर अंतःकरणाचे खुलणे आवश्यक आहे.वास्तविक जागरणाचे द्वार अंत:करण आहे.ज्याचे अंत:करण झोपलेले आहे ,तो जागा असूनही जागा नसतो आणि ज्याचे अंत:करण जागे असते तो झोपलेला असूनही झोपत नाही.
2) जीवन जागरणामध्ये आहे. निद्रा तर मृत्यूचेच रूप आहे.जागृतीचा दिवा हृदयाला आनंदाने भरतो.निद्रा तर अंधकार आहे आणि अंधकारामध्ये असणे दुःखामध्ये, पिडे मध्ये, संतापामध्ये असणे आहे..स्वतःला विचारा की तुम्ही कुठे आहात? काय आहे? जर संतापात असाल, भयग्रस्त असाल ,दुःख आणि पिडे मध्ये असाल तर समजा की अंधकारामध्ये आहात.हे जाणून घ्या की निद्रावस्थेत आहात.जगण्याच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वी हे जाणणे आवश्यक आहे की तुम्ही निद्रेत आहात.जो हे समजून घेत नाही तो जागाही होऊ शकत नाही. कारा गृहातून मुक्त होण्याच्या आकांक्षेचा जन्म होण्यासाठी स्वतःच्या कारागृहामध्ये असण्याचा बोध आवश्यक नाही का?
3) मी प्रत्येकाला प्रार्थना करतो की त्यांनी आत डोकावून पहावे.स्वतःच्या मनाच्या खोल विहिरीत व वाकून पहावे. तिथून नजर फिरवण्याची वृत्ती होते का?तिथून पळून जाण्याचा विचार मनात येतो का ?निश्चितच जर तिथून पळून जाण्याचा विचार मनात उठत असेल तर जाणून घ्या तिथे खूप अंधकार साचला आहे .तुमचे डोळे अंधकारापासून दूर जाण्याची इच्छा प्रकट करत आहेत आणि आनंदाच्या दिशेने उठण्याची त्यांची इच्छा आहे.
4) प्रतिदिन नव्या नव्या मनुष्यांना जाणण्याची संधी मला मिळते.हजारो लोकांचे अध्ययन करण्याची संधी मला मिळाली आहे.एक गोष्ट त्या सर्वांमध्ये समान आहे ,ती आहे दुःख.सगळेच दुखी आहेत .सर्वजण पिडेमध्ये बुडालेले दिसतात.एक गहिरा संताप आहे, चिंता आहे, ज्यामध्ये ते सर्वजण जखडलेले आहेत.त्यामुळे ते बेचैन आहेत आणि तडफडत आहेत .श्वास घेणे ही कठीण होत आहे.आसपास फक्त दुःखच त्यांना दिसते .हवेचा, जीवनदायी हवेचा तर कुठेच पत्ता नाही .तुमची स्थिती ही अशीच आहे का? तुम्हीही तुमच्या अंतकरणात घाबरवून टाकणाऱ्या,एका गुदमरल्यासारख्या अवस्थेचा अनुभव करत नाही काय? काळजी तुमच्या गळ्याला ही दाबत नाही ?आणि काय तुमच्या रक्तामध्ये त्या चिंतांच्या विषाने प्रवेश केला नाही?
5) अर्थहिनतेने मनात घर केले आहे.एक प्रकारच्या कं टा ळ्या ने , निरसतेने सर्वजण दबलेले आहेत आणि तुटत आहेत.हेच जीवन आहे का? तुम्ही यानेच तृप्त आणि संतुष्ट आहात का? जर हे जीवन असेल तर मग मृत्यू काय असेल? मित्रा ,हे जीवन नाही .वस्तुतः हाच मृत्यू आहे जीवनाशी सर्वजण परिचित नाही आहेत.जीवन सर्वथा भिन्न अनुभव आहे.जाणूनच मी हे सांगत आहे .कधी या तथाकथित जीवनालाच जीवन मानण्याची चूक मीही केली होती.ही चूक स्वाभाविक आहे.जेव्हा अजून एखाद्या वेगळ्या प्रकारच्या जीवनाला माणूस जाणतच नसेल तर जे उपलब्ध होते त्यालाच तो जीवन मानून बसतो.हे मानणे पण सचेतन नसते.सचेतन होताच मानणे कठीण होऊन जाते व वस्तुतः अविचारांमध्येच ,अबोधामध्येच तशी चूक होते.स्वतः प्रति थोडासाही विचार त्या चुकीला तोडतो.जे उपलब्ध आहे त्याला स्वीकार नाही, विचार करा .स्वीकार अ चेतन आहे . तो अंधविश्वास आहे.विचार स चेतन नाही.त्याद्वारे च भ्रमभंग होणे प्रारंभ होते.
6) विचार विश्वासाच्या बिलकुल विरोधी घटना आहे.विश्वास अ चेतन आहे.जो विश्वासाने चालतो, तो फक्त जगतो.जीवनाला उपलब्ध होत नाही.जीवनाला उपलब्ध करण्यासाठी विश्वासाची नाही, विचार आणि विवेकाची दिशा पकडावी लागते.विश्वास म्हणजे मा न णे, विचार म्हणजे शोधणे जाणण्यासाठी मानणे घातक आहे, शोधण्यासाठी विश्वास बाधा आहे. जे मानतात ते जाणण्याच्या दिशेने चालत नाहीत.चालण्याचे कोणते कारणही राहत नाही .जाणण्याचे काम मान णे करते .या प्रकारे कागदाची फुले ही खऱ्या फुलांचा आभास निर्माण करतात आणि खोट्या कल्पनिक पाण्यानेच तहान भागली असे मानले जाते.
7) ज्ञानाच्या मार्गामध्ये विश्वासाची वृत्ती हा सगळ्यात मोठा अवरोध आहे .विचारांच्या मुक्ती मध्ये विश्वासाचीच अडचण आहे .विश्वासाच्या श्रंखलाच स्वतःच्या विचारशक्तीला जीवनाची यात्रा करू देत नाहीत आणि त्यामध्ये अडकलेला व्यक्ती पाण्याने भरलेल्या डबक्याप्रमाणे होऊन जातो.मग तो सडतो आणि नष्ट होतो ,पण सागराकडे धावणे त्याला संभव राहत नाही .बंधनात राहू नका ,स्वतःला बांधू नका .शोध घ्या.शोध घेण्यामध्येच सत्य जीवनाची प्राप्ती आहे.
8) जीवन जसे भेटले आहे त्यावर विश्वास करू नका, त्याने संतुष्ट होऊ नका.हे जीवन नाही तर जीवनाच्या विकास आणि अनुभव यांची फक्त एक संभावना आहे.एक गोष्ट मी ऐकली आहे ,एका वृद्ध व्यक्तीला आपल्या दोन मुलांची परीक्षा घेऊ वाटली.मरण्यापूर्वी त्याला आपल्या संपत्तीचा उत्तराधिकारी निवडायचा होता.त्याने गव्हाचे काही दाणे दोघांना दिले आणि सांगितले की मी अनिश्चित काळासाठी तीर्थयात्रेला जात आहे ,तुम्ही हे गव्हाचे दाणे सांभाळून ठेवा .पहिल्या मुलाने ते गव्हाचे दाणे जमिनीमध्ये गाडले .दुसऱ्याने त्यांची शेती केली आणि त्यांना वाढवले .काही वर्षांनंतर जेव्हा तो वृद्ध व्यक्ती घरी परतला तर त्याने पाहिले की पहिल्या मुलाचे बियाणे सडून नष्ट झाले होते आणि दुसऱ्याने त्यांना हजारो पटींनी वाढवून संपदेत बदलले होते.हीच स्थिती जीवनाची पण आहे.हे जीवन आपल्याला भेटले आहे ते त्या गव्हाच्या दाण्यांसारखे आहे.त्यानेच तृप्त व्हायचे नाही आहे.बियांमध्ये तर संभावना आहेत.त्यांना ज्याने वास्तविकतेमध्ये परिवर्तित केले तोच त्या बीजांमध्ये लपलेल्या संपदेचा मालक होतो.
9) आपण सर्वजण जे आहोत तिथेच थांबायचे नाही.वस्तूतः जे आपण होऊ शकतो तिथपर्यंत पोहोचायचे आहे.तिथे पोहोचणे हेच आपले वास्तविक होणे आहे फुलांना कधी पाहिलेत? कधी त्यांच्या आनंदाचा,कधी त्यांच्या अभिव्यक्तीचा विचार केलात?सकाळी आम्ही फुलांच्या एका सुंदर बागेमध्ये होतो.जे मित्र सोबत होते त्यांना मी म्हणालो, फुल सुंदर आहेत, स्स्वस्थ आहेत आणि सुगंधाने भरलेले आहेत, कारण ते जे होऊ शकतात ते झाले आहेत.त्यांनी आपल्या विकासाच्या पूर्ण ते ची प्राप्ती केली आहे.जोपर्यंत मनुष्य पण असाच होणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातही सुवास भरणार नाही.
भगवान श्री रजनीश यांच्या मै कौन हू? या विषयावरील प्रवचन मालेतील अंश. अनुवाद: प्रा .महेंद्र देशमुख.9096694200/8830645158
.
Comments
Post a Comment