रजनीश वाणी: भाग 33.

 व्यक्ती,जेवढा बुद्धिमान होईल तेवढी स्वतःच्या पद्धतीने जगण्याची त्याची इच्छा होईल.फक्त बुद्धिहीन व्यक्तीवर वरून लादल्या गेलेले नियम प्रतिक्रिया, रिएक्शन निर्माण करणार नाहीत.म्हणून जग जेवढे बुद्धिहीन होते तेवढे वरून लादल्या गेलेल्या नियमांच्या विरोधात क्रांती नव्हती. जेव्हापासून जग बुद्धिमान होत चालले आहे, क्रांतीची सुरुवात झाली आहे .सगळीकडे नियम तोडले जात आहेत.मनुष्याचा वाढत असलेला जो  विवेक आहे, त्याला स्वतंत्रता पाहिजे आहे.स्वातंत्र्याचा अर्थ स्वच्छंदता  नाही, पण स्वातंत्र्याचा अर्थ हा आहे की मला आपल्या व्यक्तित्वाची स्वतंत्रता, पूर्ण निर्णय घेण्याची स्वयंव्यवस्था हवी आहे.आपली व्यवस्था हवी आहे.तर अनुशासनाची जुनी सर्व परंपरा एकदम खड्ड्यात येऊन उभी राहिली आहे. ती आता तुटेलच.तिला पुढे नेण्याचे प्रयत्न केले जाऊ शकत नाहीत. तिला पुढे चालवण्याचे प्रयत्न करू नये कारण जेवढे आपण तिला चालवण्याची इच्छा करू तेवढ्याच तीव्रतेने आपली मनो प्रेरणा तिला तोडण्यासाठी आतुर होईल आणि तिला  तोडण्याची आतुरता बिलकुल स्वाभाविक आणि उचित आहे.हे चूकही नाही.तर आता एका नवीन अनुशासनाच्या विषयाबद्दल विचार करणे आवश्यक झाले आहे जे व्यक्तीच्या विवेकाच्या विकासातून सहज फलित होते.एक तर हा नियम आहे की दरवाज्यातून निघाले पाहिजे, भिंतीतून निघाले नाही पाहिजे.हा नियम आहे.ज्या व्यक्तीला हा नियम दिला गेला त्याच्या विवेकांमध्ये त्याला कधीही हे लक्षात आले नाही की भिंतीतून निघणे म्हणजे डोके फोडून घेणे होय, आणि दरवाजा मधून निघण्याच्या शिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही.त्याच्या लक्षात ही गोष्ट आलेली नाही.त्याच्या विवेकाला हे लक्षात आले असेल तर आपल्याला हे सांगावे लागेल का की दरवाज्यामधून निघाले पाहिजे?  तो दरवाजा मधून निघेल.निघण्याची ही जी व्यवस्था आहे ती त्याच्या आतून येईल,बाहेरून नाही.आज पर्यंत शुभ काय आहे,अशुभ काय आहे, चांगले काय आहे, वाईट काय आहे?हे आम्ही ठरवले होते.ते आम्ही सुनिश्चित केले होते.त्यावर विश्वास ठेवून चालणे हेच सज्जन व्यक्तीचे कर्तव्य होते.आता हे होऊ शकणार नाही, होत नाही,  व्हायला नाही पाहिजे.मी जे सांगत आहे ते हे आहे, की एकेक व्यक्तीच्या मध्ये तेवढे चिंतन, तेवढा विचार, तेवढा विवेक जागवला जाऊ शकतो.त्याला हे दिसू शकेल, की काय करणे ठीक आहे आणि काय करणे चुकीचे.निश्चितच त्याच्यातील विवेक जागला तर तो जवळजवळ आपल्या विवेकाप्रमाणेच एक सारखे उत्तर देईल.पण त्या उत्तरांचे एकसारखे असणे बाहेरून निर्धारित झालेले नसेल, ते आतून निर्धारित होईल.प्रत्येक व्यक्तीचा विवेक जागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि विवेकातून जे अनुशासन येईल ते खूप शुभ आहे.मग सर्वात मोठा फायदा हा आहे की विवेकातून आलेल्या अनुशासनामध्ये व्यक्तीला कधी परतंत्रता वाटत नाही. दुसऱ्यांच्या द्वारा लादल्या गेलेला सिद्धांत परतंत्रता आणतो.आणि हेही लक्षात ठेवा,परतंत्रतेच्या विरुद्ध आमच्या मनात विद्रोह जन्म घेतो.विद्रोहाने नियम तोडले जातात, आणि जर व्यक्ती स्वतंत्र असेल, आपल्या पद्धतीने जगण्याच्या प्रयत्नातून त्याच्यात अनुशासन आले असेल तर कधीही विद्रोह जन्मणार नाही.या जगात नवीन मुले जो विद्रोह करत आहेत, तो त्यांच्या परतंत्रतेच्या विरोधात आहे.आणि सगळीकडून पर तंत्रता जाणवत आहे.माझी दृष्टी ही आहे की चांगल्या गोष्टींच्या सोबत परतंत्रता जोडणे खूप महाग काम आहे.चांगल्या गोष्टींसोबत परतंत्रता जोडणे खूप धोकादायक गोष्ट आहे.कारण परतंत्रता तोडण्याची आतुरता वाढेल, त्यासोबतच चांगली गोष्टही तुटेल.चांगल्या गोष्टींचाही विनाश होईल.शिक्षण वाढले आहे, संस्कृती वाढली आहे, सभ्यता वाढली आहे,ज्ञान वाढले आहे, माणसाच्या विवेकाला आता जागृत केले जाऊ शकते .आता त्याचे वरून लादणे अनिवार्य राहिलेले नाही.माझे म्हणणे हे आहे की विवेक ही विकसित करण्याची गोष्ट आहे.एक एका गोष्टीच्या संबंधात एक मोठी प्रक्रिया आहे.एखाद्याला पूर्वीपासून चालत आलेले नियम देणे खूप सोपे आहे ,जसे की खोटे बोलू नका,सत्य बोलणे हा धर्म आहे, पण नियम देण्याने काही होते का?नियम दिल्याने काहीही होत नाही.जुने अनुशासन गेले,ते आता शेवटचे श्वास मोजत आहे .आणि जुनी बुद्धी त्या अनुशासनाला जबरदस्ती रोखण्यात चे प्रयत्न करीत आहे.त्यांना वाटत आहे की अनुशासन गेले तर काय होईल? कारण त्यांचा अनुभव हा आहे की अनुशासन असतानाही माणूस चांगला नव्हता, आणि जर अनुशासन गेले तर मग परिस्थिती अवघड होऊन जाईल.त्यांना माहीत नाही की माणसाच्या वाईट होण्यामध्ये त्याच्या अनुशासनाचा 90% हात होता .चुकीचे अनुशासन होते.अज्ञान पूर्ण होते.लादले गेलेले होते, जबरदस्तीचे होते.

असे एक नवीन अनुशासन जन्माला घालावे लागेल,आणि ते अनुशासन असे नसेल की पूर्वापार चालत आलेले बांधिव नियम त्यांना दिले जातील. असे होईल की त्याच्या विवेकाला वाढण्याच्या संधी दिल्या जातील आणि त्याच्या विवेकाला वाढ होण्याची संधी दिली जाईल आणि आपले अनुभव जीवनाचे त्यांना सांगा,आणि मुलांच्या रस्त्यातून दूर होऊन जा.एकदम त्यांच्या रस्त्यावर उभे राहू नका.सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना बांधण्याची, श्रृंखला बद्ध करण्याचे प्रयत्न करू नका.ते श्रंखला तोडण्यासाठी उत्सुक झाले आहेत.आता ते श्रंखला सहन करू शकणार नाहीत.जर देव हा श्रृंखला वाटत असेल, तर तोही तुटेल.तोही वाचू शकत नाही.आता तोडण्यासाठीही श्रृंखला उरणार नाही, कारण श्रंखलेच्या विरुद्ध आता हा सगळा मामला उभा राहिला आहे.आता पूर्ण जायला पाहिजे शृंखला. श्रृंखला वाचली नाही पाहिजे.परंतु मनुष्याच्या चेतनेच्या विकासाचा एक क्रम आहे.एक क्रम होता, जेव्हा चेतना एवढी विकसित नव्हती, नियम लादले गेले होते.त्याशिवाय कुठलाही उपाय नव्हता.आता नियम लादण्याची आवश्यकता राहिली नाही.आता नियम बाधा बनले आहेत.आता आम्हाला समज,अंडरस्टँडिंग च वाढवण्याच्या दिशेने श्रम करावे लागतील.तर मला असे म्हणायचे आहे की,समज,विवेक हेच एकमात्र अनुशासन आहे.पूर्ण प्रक्रिया बिलकुल वेगळी असेल, नियम लादण्याची प्रक्रिया बिलकुल वेगळी होती.दोन्ही गोष्टी बिलकुल एकमेकांच्या विरोधात आहेत.यामध्ये असणारे धोके  आपल्याला पत्करणे भाग आहे. जुन्या प्रक्रियेमध्येही खूप धोके आपल्याला पत्करावे लागले होते.सगळ्यात मोठा धोका हा पत्करावा लागला की माणूस जड होऊन गेला.ज्याने नियम मानले, ते जड होऊन गेले.ज्यांनी नियम मानले नाहीत,ते बरबाद होऊन गेले.हे दोन्ही विकल्प वाईट होते.

जर कुणी जुन्या अनुशासनाला मानले, तर तो पूर्ण इडियॉटिक होऊन गेला, जड होऊन गेला त्याची बुद्धी हरवून गेली, आणि ज्याने बुद्धीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला नियम तोडावे लागले, तो बरबाद झाला, तो अपराधी झाला, तो प्रॉब्लेम बनला,तो समस्या बनला.दोन्ही विकल्प वाईट सिद्ध झाले ,ज्याने नियम मानले,तो खराब झाला कारण नियमाने त्याला जड बनवून टाकले, गुलाम बनवून टाकले आणि ज्या व्यक्तीने नियम तोडले तो स्वच्छंद होऊन गेला.नियमाने चांगुलपण आले नाही.

  

ओशो: संबोधी के क्षण .अनुवाद: प्रा.महेंद्र देशमुख.9096694200.

Comments

Popular posts from this blog

रजनीश वाणी: भाग 32.

रजनीश वाणी: भाग 31.

रजनीश वाणी भाग 28