रजनीश वाणी; भाग 34.

 संत सुंदरदास म्हणतात.. 

गोविंद के किये जीव जात है रसातल कौं .. 

गुरु उपदेशे सु तो छुटे जम फंद तें .. 

गोविंद के जीव बस परे कर्मानी कै .. 

गुरु के निवाजे सो फिरत है स्वच्छंद तै!! 

खूप अद्भुत वचन आहे.. सुंदर दास म्हणतात.. 

गोविंद के किये जीव जात है रसातल कौं.. गोविंदाने बनवले आहे लोकांना..आणि लोक नरकात जात आहेत.

गुरुउपदेश सु तो छुटे जम  फंद तें.. 

गुरुचा उपदेश ऐकाल तर मृत्यूच्या फासातून सुटका होईल, फाशी टळेल.

गोविंद के किये जीव बस परे कर्मणी के.. गोविंदाने बनविलेले जीव..आणि कर्माच्या फेऱ्यात पडले आहेत, वासनांमध्ये गुंतले आहेत, इंद्रियांमध्ये गुंतले आहेत, हजार प्रकारच्या कारागृहांमध्ये पडले आहेत.

गुरु के निवाजे सो फिरत  है  स्वच्छंद तें.. 

परंतु ज्याला गुरुने वाचवले,तो मुक्त होऊन, स्वतंत्र  बनून, स्वच्छंद बनून फिरत आहे ,विचरत आहे.ते असे म्हणत आहेत की जरा बघा तर..गोविंदाने बनविलेल्या जीवाची अशी गत होत आहे. ज्याच्यावर गोविंदाच्या हाताची छाप आहे, तो भटकत आहे.पण ज्याच्यावर गुरुचा हात पडला, तो वाचला. असे समजू नका की सुंदर दास गोविंदाची काही निंदा करत आहेत.ते खूप मधुर गोष्ट सांगत आहेत.त्या मधुर गोष्टीच्या खूप खोलवर उतरणे गरजेचे आहे.परमात्मा स्वतंत्रता देतो,ती त्याची भेट आहे.स्वतंत्रतेमध्ये वाईट होण्याची स्वतंत्रता ही संमिलीत आहे, कारण ती स्वतंत्रता काय स्वतंत्रता असेल ज्यामध्ये फक्त चांगले होण्याचीच स्वतंत्रता आहे? ती तर स्वतंत्रता नसेल,ती तर  परतंत्रताच असेल आणि परतंत्रता चांगली कशी असू शकते?तर गुरु काही वेगळे देतो आणि परमात्मा काही वेगळे.परमात्मा हे  देतो की तुम्हाला जे व्हायचे असेल ते व्हा.तो तुमचे पुस्तक कोरे सोडून देतो.तुम्हाला जे  लिहायचे असेल ते लिहून घ्या.तुम्हाला पाप करायचे असेल तर पाप करा ,पुण्य करायचे असेल तर पुण्य.तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात.आणि स्वाभाविकरित्या खाली उतरणे सोपे आहे,वर चढणे कठीण आहे .लोक खाली उतरतात, लोक पापा मध्ये उतरतात. पापा मध्ये प्रबल आकर्षण जाणवते ,कारण ते सोपे वाटते.परमात्म्याने स्वतंत्रता दिलेली आहे आणि परिणाम हा झाला आहे की लोक गुलाम झाले आहेतवासनांचे आणि संसाराचे.गुरुचे काम  ठीक उलट आहे.गुरु अनुशासन देतो.गुरु तुमच्या जीवनाला जगण्याची पद्धती,शैली देतो.गुरु शास्ता आहे.तो तुमच्या जीवनाला एक रंग रूप देतो.तुमच्या जीवनरुपी न घडलेल्या दगडाला घडवण्याचे काम गुरु करतो.म्हणून वरवर तर असे वाटते की जे लोक गुरु जवळ गेले, ते गुलाम झाले.तसे वरवर पाहता ही गोष्ट ठीकही वाटते, कारण आता गुरु जे म्हणेल तसे हे लोक जगतील.गुरुचा इशारा आता त्यांचे जीवन असेल . गुरुच्या  सहार्‍याने चालतील.गुरुच्या नावे मध्ये त्यांची यात्रा होईल,गुरुच्या अटी त्यांना स्वीकार कराव्या लागतील,गुरुच्या प्रति समर्पण करावे लागेल.तर हे सगळे खूप विरोधाभासी आहे . परमात्मा स्वतंत्रता देतो आणि परिणाम असा झाला आहे की सगळे लोक परतंत्र झाले आहेत,आणि गुरु अनुशासन देतो आणि परिणामांमध्ये स्वतंत्रता उपलब्ध होते.कारण जसे जसे व्यक्ती अनुशासित होत जातो, जसे जसे व्यक्तीच्या जीवनात एक व्यवस्था, एक तंत्र जन्माला येते, जसे जसे व्यक्तीच्या जीवनामध्ये जागृती येते, जसे जसे व्यक्तीचे जीवन जागरूक जीवन व्हायला लागते, तसे तसे स्वतंत्रतेचा एक नवीन पैलू उघडतो, स्वच्छंदता निर्माण होते.स्वच्छंदतेचा ठीक तोच अर्थ होतो जो स्वतंत्रतेचा आहे.स्वच्छंदता हा शब्द स्वतंत्रता शब्दापेक्षाही बहुमूल्य शब्द आहे.स्वच्छंदतेचा अर्थ होतो,ज्या व्यक्तीमध्ये त्याचा आतला छंद जागृत झाला, ज्याच्या अंतर्मनातील गीत जागे झाले ,जो आपले गीत गाण्यासाठी योग्य झाला.जे गीत गाण्यासाठी परमात्म्याने तुम्हाला इथे पाठवले होते, आणि तुम्ही भटकला होता, जे बनण्यासाठी तुम्हाला परमात्म्याने पाठविले होते पण तुम्ही विपरीत यात्रेवर निघाला होता, कारण हजारो प्रकारची आकर्षणे जीवनात होती आणि तुम्हाला याची कुठलीही जाणीव नव्हती.असे समजा की एखाद्या लहान मुलाला तुम्ही मोठ्यात मोठे, एखादे बहुमूल्य पुस्तक आणून दिले, आणि त्या मुलाने त्या पुस्तकावर रेघोट्या मारल्या.अजून त्याला लिहायलाच येत नाही.जोवर त्याला लिहिणे येत नाही तोपर्यंत तो कुठलीही अर्थपूर्ण गोष्ट लिहू शकणार नाही.पण लिहिण्याच्यापूर्वी गुरूच्या प्रक्रियेमधून तुम्हाला जावे लागेल, एखाद्या पाठशाले मधून तुम्हाला जावे लागेल,मग हेच गिरवणे, रेघोट्या मारणे, लिहिणे बनून जाते. तसे पाहिले तर तेही गिरवणेच आहे ,पण त्यामध्ये अर्थ येऊन जातो त्यामध्ये भाव येऊन जातो आणि हेच गिरवणे  हळूहळू सम्यक रूप घेते, आकार घेते, आणि याच गिरवण्यातून  महाकाव्य  जन्माला येऊ शकतात. आपण गीत घेऊन आलो आहोत आपल्या प्राणांमध्ये,जे गायचे आहे.ज्याला न गाता तृप्ती मिळू शकणार नाही .ज्याला गाल, तरच तृप्ती आहे. त्या गीताला ज्या दिवशी तुम्ही  गाल ,जसे ही कोकिळा ऐकत आहात, कुहू कुहू म्हणत आहे.हे गीत तिच्या प्राणांचे गीत आहे.वृक्षांवर फुले उमलली आहेत, हे त्यांच्या प्राणाचे गीत आहे.मनुष्यामध्येही कुठले तरी गीत लपलेले आहे.त्या गीताचे नावच निर्वाण आहे, मोक्ष आहे.जेव्हा तुम्ही तुमचे गीत गाल,त्या गीताच्या गाण्यांमध्येच तुमच्या लक्षात येईल की तुमच्यावर परि तृप्ती बरसली आहे, परितोष सर्वत्र पसरला आहे,मग आनंदच आनंद आहे.वसंत ऋतु मध्ये फुलांनी भरलेल्या वृक्षाला पाहिले आहे? तीच सिद्धाची  दशा आहे.त्यांचे फुल तुम्हाला दिसत नाही.त्यांचे फुल पाहण्यासाठी अंतर्दृष्टी पाहिजे.वसंत ऋतु मध्ये नाचणाऱ्या नववधू सारख्या सजलेल्या वृक्षापासून कधी चालत गेला आहात? त्याचा सुवास  कधी अनुभव केला आहे? पण तो सुवास  तुम्हाला अनुभवता येतो कारण तुमच्या नासिका काम करीत आहेत.जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर त्या सुगंधाचा तुम्हाला पत्ता लागणार नाही.तुम्हाला त्या सुवासाची जाणीव होणार नाही.फुलांनी भरलेला वृक्ष असेल, पण तुम्ही आंधळे असाल तर कदाचित तुम्हाला त्याची जाणीवही होऊ शकणार नाही.तसेच आपण आतून आंधळे  आणि बहिरे आहोत आणि आपल्या हृदयात अजून अनुभव करण्याची क्षमता नाही.यामुळे गुरु जवळ गेल्यावर एकदम माहीत होत नाही की काय झाले आहे? पण हेच झाले आहे.वसंत आला आहे, फुले बहरली आहेत, सुवास सर्वत्र दरवळत आहे..जे थोडेसे जवळ येत जातील, जे गुरूच्या जवळ जवळ सरकायला लागतील, जे गुरूच्या हातात आपला हात देऊ लागतील ,हळूहळू हे तरंग त्यांच्यावर पसरतील, ती मस्ती त्यांच्याही डोळ्यात भरली जाईल, ही मस्ती संक्रामक आहे.ते पण बेहोश होऊ लागतील,तेही मदहोश होऊ लागतील. गुरुशी जोडलेला संबंध तुम्हाला अनुशासन देईल,एक जीवन जगण्याची शैली देईल, ध्यान देईल, प्रेम देईल, अंतर यात्रेचे उपाय देईल. परमात्म्याने स्वतंत्रता दिली, आणि परिणाम हा झाला की तुम्ही गुलाम होऊन गेला आहात.गुरु तुम्हाला एक प्रकारची गुलामी देत असलेला वाटतो आणि त्याचा परिणाम म्हणून स्वतंत्रता तुमच्या हाती येते,असे हे विरोधाभासी आहे.

भगवान श्री रजनीश: हरी बोलो हरी बोल.प्रवचन क्रमांक 9 मधून. अनुवाद:प्रा.महेंद्र देशमुख.9096694200.

Comments

Popular posts from this blog

रजनीश वाणी: भाग 32.

रजनीश वाणी: भाग 31.

रजनीश वाणी भाग 28