Posts

रजनीश वाणी भाग 35.

 1) मी काय पाहतोय? पाहतोय की मनुष्य झोपलेला आहे. तुम्ही झोपलेले आहात.प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे.रात्रच नव्हे ,दिवसही निद्रेतच जात आहेत . निद्रा तर निद्रा आहेच परंतु हे तथाकथित जागरण ही निद्राच आहे.केवळ डोळ्यांच्या उघडल्याने झोप संपत नाही.त्यासाठी तर अंतःकरणाचे खुलणे आवश्यक आहे.वास्तविक जागरणाचे द्वार अंत:करण आहे.ज्याचे अंत:करण झोपलेले आहे ,तो जागा असूनही जागा नसतो आणि ज्याचे अंत:करण जागे असते तो झोपलेला असूनही झोपत नाही. 2) जीवन जागरणामध्ये आहे. निद्रा तर मृत्यूचेच रूप आहे.जागृतीचा दिवा हृदयाला आनंदाने भरतो.निद्रा तर अंधकार आहे आणि अंधकारामध्ये असणे दुःखामध्ये, पिडे मध्ये, संतापामध्ये असणे आहे..स्वतःला विचारा की तुम्ही कुठे आहात? काय आहे? जर संतापात असाल, भयग्रस्त असाल ,दुःख आणि पिडे मध्ये  असाल तर समजा की अंधकारामध्ये आहात.हे जाणून घ्या की निद्रावस्थेत  आहात.जगण्याच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वी हे जाणणे आवश्यक आहे की तुम्ही निद्रेत आहात.जो हे समजून घेत नाही तो जागाही होऊ शकत नाही. कारा गृहातून मुक्त होण्याच्या आकांक्षेचा जन्म होण्यासाठी स्वतःच्या कारागृहामध्ये असण्याचा...

रजनीश वाणी; भाग 34.

 संत सुंदरदास म्हणतात..  गोविंद के किये जीव जात है रसातल कौं ..  गुरु उपदेशे सु तो छुटे जम फंद तें ..  गोविंद के जीव बस परे कर्मानी कै ..  गुरु के निवाजे सो फिरत है स्वच्छंद तै!!  खूप अद्भुत वचन आहे.. सुंदर दास म्हणतात..  गोविंद के किये जीव जात है रसातल कौं.. गोविंदाने बनवले आहे लोकांना..आणि लोक नरकात जात आहेत. गुरुउपदेश सु तो छुटे जम  फंद तें..  गुरुचा उपदेश ऐकाल तर मृत्यूच्या फासातून सुटका होईल, फाशी टळेल. गोविंद के किये जीव बस परे कर्मणी के.. गोविंदाने बनविलेले जीव..आणि कर्माच्या फेऱ्यात पडले आहेत, वासनांमध्ये गुंतले आहेत, इंद्रियांमध्ये गुंतले आहेत, हजार प्रकारच्या कारागृहांमध्ये पडले आहेत. गुरु के निवाजे सो फिरत  है  स्वच्छंद तें..  परंतु ज्याला गुरुने वाचवले,तो मुक्त होऊन, स्वतंत्र  बनून, स्वच्छंद बनून फिरत आहे ,विचरत आहे.ते असे म्हणत आहेत की जरा बघा तर..गोविंदाने बनविलेल्या जीवाची अशी गत होत आहे. ज्याच्यावर गोविंदाच्या हाताची छाप आहे, तो भटकत आहे.पण ज्याच्यावर गुरुचा हात पडला, तो वाचला. असे समजू नका की सुंदर दास गोव...

रजनीश वाणी: भाग 33.

 व्यक्ती,जेवढा बुद्धिमान होईल तेवढी स्वतःच्या पद्धतीने जगण्याची त्याची इच्छा होईल.फक्त बुद्धिहीन व्यक्तीवर वरून लादल्या गेलेले नियम प्रतिक्रिया, रिएक्शन निर्माण करणार नाहीत.म्हणून जग जेवढे बुद्धिहीन होते तेवढे वरून लादल्या गेलेल्या नियमांच्या विरोधात क्रांती नव्हती. जेव्हापासून जग बुद्धिमान होत चालले आहे, क्रांतीची सुरुवात झाली आहे .सगळीकडे नियम तोडले जात आहेत.मनुष्याचा वाढत असलेला जो  विवेक आहे, त्याला स्वतंत्रता पाहिजे आहे.स्वातंत्र्याचा अर्थ स्वच्छंदता  नाही, पण स्वातंत्र्याचा अर्थ हा आहे की मला आपल्या व्यक्तित्वाची स्वतंत्रता, पूर्ण निर्णय घेण्याची स्वयंव्यवस्था हवी आहे.आपली व्यवस्था हवी आहे.तर अनुशासनाची जुनी सर्व परंपरा एकदम खड्ड्यात येऊन उभी राहिली आहे. ती आता तुटेलच.तिला पुढे नेण्याचे प्रयत्न केले जाऊ शकत नाहीत. तिला पुढे चालवण्याचे प्रयत्न करू नये कारण जेवढे आपण तिला चालवण्याची इच्छा करू तेवढ्याच तीव्रतेने आपली मनो प्रेरणा तिला तोडण्यासाठी आतुर होईल आणि तिला  तोडण्याची आतुरता बिलकुल स्वाभाविक आणि उचित आहे.हे चूकही नाही.तर आता एका नवीन अनुशासनाच्या विषयाबद्दल...

रजनीश वाणी: भाग 32.

 रजनीश वाणी :भाग 32 जीवनाला जेवढे तुम्ही जागे राहून जगताल तेवढ्याच बारीक आणि सूक्ष्म जीवनाचा तुम्हाला अनुभव येईल, आणि जेवढ्या सूक्ष्माचा तुम्ही अनुभव कराल तेवढेच जास्त तुम्ही जाणताल.ते दोन्ही संयुक्त आहेत आणि एक दुसऱ्याचे सहयोगी आहेत.रस्त्यावर तुम्ही चालत आहात, दारुड्या व्यक्ती पण चालत आहे त्याच रस्त्यावर, पण त्याचे पाय बघा,एकही पाय जागेवर पडत नाही.तसे तर तोही घरी पोहोचेलच.तुम्ही पण चालता आणि मग तुम्ही एका बुद्धालाही चालताना पहा, तेव्हा  तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये आणि दारुड्या व्यक्तीमध्ये जेवढा फरक आहे, तितकाच तुमच्यामध्ये आणि बुद्धामध्येही आहे.तसे तर दारुड्या व्यक्तीही घरी पोहोचतो, तुम्हीही घरी पोहोचता, बुद्ध ही घरी पोहोचतील, पण तुमच्या चालण्याचा गुण वेगवेगळा आहे.दारुड्या व्यक्ती बिलकुल बेहोशी मध्ये चालत आहे, बुद्ध बिलकुल शुद्धीवर राहून चालत आहेत ,तुम्ही कुठेतरी दोघांच्या मध्ये आहात.कधीतरी थोडीशी शुद्धीची झलक मिळते, पुन्हा अंधार येतो.कधी तुम्ही  जागे असता, कधी तुम्ही झोपलेले असता,कधी तुमचे डोळे उघडे असतात, कधी बंद होऊन जातात.तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितले, तर ...

रजनीश वाणी: भाग 31.

 रजनीश वाणी: भाग 31. तुम्ही आत्महत्येबद्दल  काय विचार करता? तुम्ही काय वेडे आहात की आणखी काही? मला माहित आहे की तुम्ही जीवनाला कंटाळून गेला आहात, तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे. जर तुम्ही खरोखरच जीवनाला कंटाळून गेला आहात , तुम्हाला जीवनाचा उबग आलेला आहे, तर आत्महत्या करू नका, कारण आत्महत्या पुन्हा तुम्हाला याच जीवनात ओढून आणेल आणि असेही होऊ शकते की याहून अधिक घाणेरडे जीवन तुम्हाला भेटेल ,या जीवनापेक्षा जे तुम्ही आता जगत आहात. कारण आत्महत्या तुमच्यामध्ये अजून जास्त घाण जन्माला घालेल. आत्महत्या करणे हा अस्तित्वाचा अनादर आहे.अस्तित्वाने तुम्हाला विकसित होण्यासाठी जन्म दिला आहे,या जीवनाचा अवसर दिला आहे आणि तुम्ही हा अवसर असाच  व्यर्थ गमावता आणि जोवर तुम्ही विकसित होत नाही,विकसित होऊन बुद्ध बनत नाही, तोवर तुम्ही जीवनात पुन्हा पुन्हा फेकले जाल .लाखो वेळा यापूर्वीही हे झालेआहे.आता वेळ आलेली आहे, जागे व्हा! ही संधी ,हा अवसर चुकवू नका.इथे माझ्याजवळ राहून आत्महत्येची खरी कला शिका.खऱ्या कलेमध्ये आपल्या देहाला नष्ट केले जात नाही.देह सुंदर आहे, देहाने काहीही चूक केलेले नाही.ते तर मन आ...

रजनीश वाणी: भाग 30.

 तुमच्याकडे संवेदनशील इंद्रिये आहेत, पण तुम्ही संवेदना हरवून बसला आहात.तुमच्यातील संवेदनशील अंश जवळपास संवेदना शून्य ,मृत आहेत.ते तुमच्या शरीरावर आहेत फक्त पण त्यात ऊर्जा प्रवाहित होत नाही आहे.ते तुमच्या अस्तित्वाचे जिवंत अंग राहिले नाहीत .तुमच्या आत काहीतरी मृतप्राय होऊन गेले आहे.ते थंड, अवरुद्ध होऊन गेले आहे.हजारो वर्षांच्या दमनामुळे संपूर्ण मानव जाती सोबत हे घडले आहे,आणि शरीराच्या विरोधात चालत आलेल्या विचारधारा आणि संस्कार बद्धतांच्या हजारो वर्षांनी तुम्हाला पंगू बनवून टाकले आहे.तुम्ही फक्त नावालाच जिवंत आहात.आता  सर्वात पहिले काम हेच करावे लागेल, तुमच्या संवेदी अंगांना वास्तविक रूपात जिवंत आणि संवेदनशील असले पाहिजे,केवळ तेव्हाच त्यांच्यावर स्वामीत्व निर्माण होऊ शकेल.तुम्ही पाहता, पण वस्तूंना खोलवर नाही पाहू शकत.तुम्ही वस्तूंना फक्त वरवर, त्यांचा पृष्ठभाग तेवढा पाहता.तुम्ही स्पर्श करता, पण तुमच्या स्पर्शात उष्णता नसते.तुमच्या स्पर्शाने आत आणि बाहेर काहीही निर्माण होऊ शकत नाही,प्रवाहित होत नाही.तुम्ही ऐकताही.पक्षी गीत गात आहेत,आणि तुम्ही ऐकता आणि तुम्ही म्हणू शकता की होय, मी...

रजनीश वाणी भाग 29.

 मृत्यूची घटना अतिशय रहस्यमय आहे, आणि त्याच प्रमाणे आत्महत्येची घटनाही.पृष्ठभागावरून हे निश्चित करू नका की आत्महत्या काय आहे?अनेक गोष्टी असू शकतात.मला स्वतःला असे वाटते की जे लोक आत्महत्या करतात हे या जगातील खूप संवेदनशील, खूप प्रतिभावान लोक आहेत.त्यांच्या संवेदनशील आणि प्रतिभावान असल्यामुळे त्यांचा या विक्षिप्त जगाशी ताळमेळ बसू शकत नाही.समाज विक्षिप्त आहे,तो विक्षिप्त पायावर आधारलेला आहे.त्याचा सर्व इतिहास वेडेपणा, हिंसा, युद्ध आणि विध्वंसाचा आहे.कुणी म्हणते की माझा देश जगातील महानतम देश आहे,आता ही विक्षिप्तता आहे.कुणी म्हणतो की माझा धर्म जगातील महानतम आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आता ही विक्षिप्तता आहे आणि ही विक्षिप्तता रक्त मास मज्जा या पर्यंत जाऊन पोहोचली आहे.आणि लोक खूप खूप निस्तेज आणि संवेदनाहीन झाले आहेत.त्यांना व्हावे लागते, नाहीतर जगणे मुश्किल होऊन जाते.या चारी बाजूंना पसरलेल्या संवेदनाहीन समाजात तुम्हालाही संवेदनाहीन होऊन जावे लागते.अन्यथा तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊ लागता.जर तुम्ही समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊ लागलात तर समाज समजतो की तुम्ही वेडे झाला आहात .खरे तर समा...

रजनीश वाणी भाग 28

 मनुष्याने स्वतःचे एक जग बनवले आहे.. निसर्गाच्या विपरीत असे एक जग मनुष्याने बनवले आहे.सिमेंटचे रस्ते ,सिमेंटची घरे ,सिमेंटची जंगले मनुष्याने बनविली आहेत,ज्यात ही खबरच मिळत नाही की परमात्मा ही आहे.मोठ्या नगरांमध्ये परमात्मा जवळजवळ मेला आहे कारण परमात्म्याची खबर फक्त तिथेच मिळू शकते जिथे गोष्टींची वाढ होत असते.रोप मोठे होते तर ते खबर देते की ते जिवंत आहे .आता कुठली इमारत ,कुठले घर तर वाढत नाही.ते जसे आहे तसेच राहते.सिमेंटचा रस्ता तर काही वाढत नाही .जसा आहे तसाच राहतो ,मृत आहे. जीवनाचे लक्षण काय आहे? वाढणे, वृद्धी.वर्धमान होणे हे जीवनाचे लक्षण आहे.आम्ही एक मृत जग बनवले आहे.मशीन वाढत नाही,घरे वाढत नाहीत ,सिमेंटचे रस्ते वाढत नाहीत,सर्व मृत आहेत ,सर्वकाही थांबलेले आहे.या थांबलेल्या अवस्थेत आम्हीही जगत आहोत, आम्ही ही थांबलेले आहोत.या? ज्यांच्या सोबत आपण राहतो तसेच आपणही होऊन जातो.मनोवैज्ञानिक म्हणतात की जो माणूस यंत्रांसोबत काम करतो तो शेवटी यंत्रच होऊन जातो.आणि होऊन जातोच .हे बिलकुल स्वाभाविक आहे . आमचे कृत्य हळूहळू ,हळूहळू आपल्या सवयी बनवत.तेच आपल्याला घेरून टाकते.माणसाने जे एक सिमेंट आ...

रजनीश वाणी भाग27

 मनुष्याच्या वासना तोपर्यंत त्याला पकडून ठेवतात तोपर्यंत त्याच्याकडे संकल्प, विल नाही .जोपर्यंत त्याच्याजवळ  संकल्प सारख्या सत्तेचा जन्म झाला नसेल या संकल्प बाबत थोडे खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय कोणीही मनुष्य आपल्या वासनांना वश करू शकत नाही. संकल्पचा काय अर्थ आहे? संकल्पचा अर्थ इंद्रियांचे दमन नाही. संकल्प चा अर्थ स्वतःच्या होण्याचा अनुभव आहे. संकल्पचा अर्थ आहे स्वतःच्या असण्याचा अनुभव .तुम्हाला भूक लागली आहे, तुमचे शरीर म्हणते मला भूक लागली आहे .तुम्ही म्हणता की हो,मी ऐकले आहे,पण आत्ताच मी राजी नाही जेवण करण्यास.आणि तुम्ही जर हे पूर्ण मनापासून म्हणू शकला, की मी आत्ताच जेवण करण्यासाठी राजी  नाही,तर शरीर तत्काळ त्याची मागणी बंद करते. तत्काळ मागणी बंद करते. ज्या क्षणी शरीराला माहीत होते की तुमच्यापाशी शरीराच्या वर असा संकल्प आहे, तेव्हा शरीर तत्काळ मागणी बंद करते. तुमची कमजोरी च शरीराची ताकद बनते आणि तुमची ताकद हीच शरीराची कमजोरी बनते. पण आपण कधी शरीरापासून भिन्न आहोत अशी घोषणा करत नाहीत. कधी कधी छोटे छोटे प्रयोग करून बघणे गरजेचे आहे.खूप छोटे प्रयो...

रजनीश वाणी भाग 26.

 चित्ताची ही सवय आहे की त्याला कोणता ना कोणता आधार हवा असतो.चित्ताला आपल्या जीवनासाठी भोजन हवे असते.ते आधार मागत असते. कुठलातरी आधार पाहिजे.राम राम जपत असाल तर चित्ताला खूप प्रसन्नता आहे,काहीही हरकत नाही. कुठले भजन गात राहाल तर चित्ताला कुठलीच कठीणता नाही. त्याला कुठले ना कुठले भोजन मिळाले तर ते अस्तित्वात राहील, आणि ते टिकून राहिले तर आत्म्याचा अनुभव होऊ शकणार नाही. तर त्याचे भोजन हिरावून घ्यायचे आहे, त्याला निराधार करावयाचे आहे.हीच आपली साधना आहे.आता आपणच त्याला आधार दिला तर तर चित्त तर खूप प्रसन्नतेने त्याचा स्वीकार करेल. एक आधार दिला तर थोड्या कमी प्रसन्नतेने, जास्त आधार दिला तर जास्त प्रसन्नतेने. चंचलतेमध्ये चित्त खूप प्रसन्न राहते.  ध्याना त  त्याला अडचण वाटायला लागते कारण आपण त्याचा आधारच हिरावून घेत  आहोत. तुम्हाला ही गोष्ट समजली ना? ते बिना आधाराचे राहूच शकत नाही. त्याला आपल्या मरणाची भीती वाटते .आणि ते बिलकुल स्वाभाविक आहे. आणि हीच तपश्चर्या आहे की जेव्हा ते आधार मागत असेल तेव्हा आपण साहस करून त्याला आधार देऊ नये. तर हे होऊ शकेल की सुरुवातीला आपण आधार न देत...

रजनीश वाणी भाग 25

 संसाराला चिखल समजाल, तर इथूनच चुकीला सुरुवात झाली. संसारात फुललेली कमळे तुम्हाला दिसत नाहीत? बुद्ध कुठे उमलले? महावीर कुठे उमलले? कबीर कुठे उमलले? हे ज्या जगजीवनच्या सूत्रांवर आपण विचार करीत आहोत ते जगजीवन कुठे उमालले? ते सूत्र कुठे जन्मले? हे जगजीवन चे गीत कुठे उमटले?याच संसारात, याच चिखलात. तर चिखलाला फक्त चिखल म्हणू नका त्यात कमळे ही असतात. चिखल कमळाची जननी आहे, त्याचा सन्मान करा. चिखलाशिवाय कमळ कुठे? चिखलाला सोडून पळून जाल तर मग कमळ कसे जन्मेल? चिखलाचा उपयोग करा. कमळ चिखलाची संभावना आहे. कमळ चिखलात  दबुन पडले आहे. शोधा ,तपास करा,भेटेल.भेटले आहे.तुम्हालाही भेटेल. पळून कुठे जाल?चिखलापासून पळून गेलात तर लक्षात ठेवा कमळापासूनही पळून गेलात. लक्षात ठेवा, सुकून जाल,सडून जाल, पण सुगंध कधीही येणार नाही. म्हणून मी म्हणतो,संसारातून पळून जाणे हा पळपुटेपणा आहे ,पलायन आहे. संसाराचा उपयोग करा. संसार एक अवसर आहे ,महान अवसर आहे.एक आव्हान, जिथे प्रत्येक क्षणी परमात्मा तुम्हाला जागे करण्याचे किती आयोजन करत आहे. कुणाच्या तोंडून शिवी निघते तुमच्यासाठी.जर तुम्ही समजदार असाल तर ही शिवी तुम्हाला...

रजनीश वाणी भाग 24

 तुम्ही कधीच निश्चित नसता, कारण निश्चय केंद्रित होण्याने येत असतो. तुम्ही स्वतःच्या बाबतीतच निश्चित नाहीयेत, आणि दुसर्यां संबंधी निश्चित होने तर असंभवच आहे, जेव्हा तुम्ही स्वतः संबंधीच अनिश्चित आहात. तुम्ही स्वतः संबंधी अस्पष्ट, अन्धूक अन्धूक आहात.  काही दिवसां पूर्वी एक व्यक्ति इथे आला होता. त्याने मला सांगितले कि मी कुण्या मुलीवर प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे.  मी काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोल वर पहात राहिलो.. काहीही न बोलता. तो बेचैन झाला, मग त्याने विचारले, "तुम्ही मला असे का पहात आहात? मला अजब वाटत आहे" मग त्याने विचारले, "तुम्हाला काय वाटते, माझे प्रेम खोटे आहे? "तरी मी काही बोललो नाही. त्याला पहातच राहिलो. आणि तेव्हा त्याने विचारले, " तुम्ही असे का समजता कि हा विवाह योग्य होणार नाही? आणि तो स्वतःच म्हणाला कि, "मी स्वतः या गोष्टी वर फार विचार केला नव्हता. आणि हेच कारण आहे कि मी आपल्या कड़े आलो आहे. मला माहित नाही कि मी प्रेमात आहे सुद्धा की नाही. " मी एक ही शब्द बोललो नव्हतो. मी फक्त त्याच्या डोळ्यांत डोकवून पहात होतो. पण...

रजनीश वाणी भाग 23

 रजनीश वाणी भाग 23.                        तुम्ही सतत स्वप्न पहात असता. रात्रीच नव्हे,तर संपूर्ण दिवसही स्वप्न पहात असता. हे पहिल्यांदा समजून घेण्याची गरज आहे की जागृत अवस्थेतही तुम्ही स्वप्न पाहत असता. दिवसा एखादेवेळी डोळे बंद करा, शरीराला थोडे शिथिल करा,आणि दिसेल की स्वप्न चालू आहे. ते कधीच बंद होत नाही.आमचे दैनंदिन कामकाज चालत असल्याने ते फक्त दबून राहते. हे दिवसाच्या ताऱ्या सारखे आहे .रात्री तुम्ही ताऱ्यांना पाहता,दिवसा पाहत नाही. तारे सदा असतात .दिवसा सूर्याच्या प्रकाशात फक्त लपून  जातात.तुम्ही एका खूप खोल विहिरीत उतरलात तर तुम्हाला दिवसाही आकाशातील तारे दिसतील. तारे पाहण्यासाठी अंधाराची गरज आहे.त्यामुळे एका विहिरीत उतरा आणि त्याच्या गोलाईतून वर पहा, तुम्हाला दिवसाही तारे दिसतील.तारे तिथेच आहेत.असे नाही की रात्रीचे ते तिथे असतात, आणि दिवसा नसतात. रात्री तुम्ही त्यांना सहजपणे पाहू शकता.दिवसा ते दिसू शकत नाहीत कारण सूर्याचा प्रकाश बाधा बनतो. हीच गोष्ट स्वप्नांच्या बाबतीतही खरी आहे असे नाही की तुम्ही झोपेतच स्वप्न प...

रजनीश वाणी भाग 22

 रजनीश वाणी भाग,22.                        तिबेट मध्ये एक फकीर होता, मिलारेपा.एक व्यक्ती येऊन त्याला म्हणाला,"मला काही सिद्धी प्राप्त करायची आहे, मला काही मंत्र द्या." त्याने खूप समजावले की माझ्याकडे कुठलाही मंत्र नाही. खूप समजावले की मंत्र असेल कुणापाशी तरी व्यर्थ आहे. मंत्र कुठेही नेत नाही. नासमज लोक मंत्र घेतात त्यामुळे जे खूप धूर्त आहेत ,ते मंत्र द्यायला लागतात. कोणता मंत्र कुठे नेत नाही.जे आमच्यामधील खूप चलाख आहेत,धूर्त आहेत ते मंत्र द्यायला लागतात, कारण मूर्ख लोक मंत्र घेण्यासाठी उत्सुक असतात. कारण त्यांना असे वाटते की याने काही होऊन जाईल.तो म्हणाला,"मंत्रा बिंत्राने काही होणार नाही, कधी काही झाले नाही. सर्व मंत्र मनुष्याने शोधून काढले आहेत, म्हणून परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग बनू नाही शकत."पण तो ऐकायला तयार नव्हता, म्हणून त्या फकिराने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कागदावर एक  मंत्र लिहून त्याला दिला आणि सांगितले, "हे घेऊन जा आणि रात्री आंघोळ करून या मंत्राचा 5 वेळेस पाठ कर.,तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होऊन ज...

रजनीश वाणी भाग 21

 रजनीश ्वाणी भाग 21                          आपली मनोदशा अशी आहे की  जे काही आपल्या समोर घडते, आपण त्याच्यासोबत एक होऊन जातो. कुणी तुम्हाला शिवी दिली, क्रोध निर्माण झाला, त्या क्षणी तुम्ही क्रोधा सोबत एक होऊन जाता. तुम्ही हे विसरूनच जाता की क्षण भरा पूर्वी क्रोध नव्हता, तेव्हाही तुम्ही होता. क्षणभरानंतर क्रोध पुन्हा निघून जाईल,तेव्हाही तुम्ही असाल, तर हा क्रोध मध्ये आलेल्या धुक्या सारखा आहे.त्याने तुम्हाला कितीही घेरलेले असेल,पण तो तुमचा स्वभाव नाही. चिंता आली, तर चिंतेचे ढग घेरतात आणि सूर्य त्याच्या आड लपून जातो.तुम्ही विसरूनच जाता की मी पृथक आहे,वेगळा आहे. सुख आले, की तुम्ही नाचायला लागता, दुःख आले, की रडायला लागता.जे काही घडते,त्याच्याशी तुम्ही एक होऊन जाता. याला हळूहळू वेगळे करायला शिकायला हवे.प्रत्येक स्थितीत वेगळे करायला शिकायला हवे. भोजन करत असताना हे जाणले पाहिजे की जे भोजन करीत आहे,ते शरीर आहे.भूक लागली, तर हे जाणून घ्या कि ज्याला भूक लागली आहे ते शरीर आहे, मी फक्त जाणणारा आहे. चेतनेला कुठलीही भूक लागू श...

रजनीश वाणी भाग 20

 * रजनीश वाणी भाग 20 या जगात प्रत्येक मनुष्याला, इथे ज्याने जन्म घेतला आहे, अनेक समस्यांपैकी एका समस्येचा सामना करावा लागतो. त्याचे अस्तित्व आणि संसारिक उद्देश हे दोन्ही सोबत चालू शकत नाहीत. हे जग त्याच्याकडून काम करून घेऊ पाहते,त्याला गुलाम बनविण्याची त्याची इच्छा आहे. त्या लोकांची त्याला वापरून घेण्याची इच्छा आहे, जे सत्तेत बसलेले आहेत, आणि तो स्वाभाविकपणे त्यांचा प्रतिरोध करतो. तो स्वतः आपल्या स्वतःमध्ये मग्न राहू इच्छितो .जग कुठल्याही व्यक्तीला त्याच्या स्वभावा प्रमाणे होण्याची आणि फुलण्याची परवानगी देत नाही. जग प्रत्येक व्यक्तीला एका उपयोगी, कुशल, आणि आज्ञाकारी वस्तूच्या रूपात घडविण्याचा प्रयत्न करते. त्याला असे वाटत नाही की कुणी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा विद्रोही, आपल्या अधिकारांचा दावा करणारा आणि आपल्या वैयक्तिकतेची घोषणा करणारा बनावा. उलट त्याला नेहमी एका साधना प्रमाणे प्रयोग केला जाणारा,जवळपास एखाद्या यंत्र मानवाप्रमाणे बनवून ठेवू इच्छिते. या जगाला असे वाटत नाही की तुम्ही मनुष्य बनून राहावे .त्याला वाटते की तुम्ही एक योग्य यंत्राप्रमाणे बनून राहावे. तुम्ही जेवढे योग्य असा...

रजनीश वाणी भाग 19

 रजनीश वाणी भाग 19                           विचारांचा एवढाच उपयोग आहे की विचारांची व्यर्थता लक्षात यावी. ही समजदारी एवढ्यासाठीच  गरजेची आहेकी ही समज पर्याप्त नाही. जसे आपण काट्याने काटा काढतो तसे जर आपण विचारांनी विचार काढून शकू तर तेवढे पुरेसे आहे.विचारांनी कुणीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. विचारांनी सत्यापर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये बाधा निर्माण होते. यामुळे जर आपण बाधेला दूर सारु शकलो, तर आपण म्हणू शकतो की एका अर्थाने विचारांनीही आपल्याला सहारा दिला. बाधा राहिली नाही, दूर सारली गेली, तेवढा सहारा दिला.साधारण विचारक आहेत,ते विचारांमध्ये गुंतून राहतात.जे महा विचारक आहेत, ते विचारांपासून मुक्त होऊन जातात. विचार जेव्हा खूप खोलवर प्रवेश करतो तेव्हा लवकरच या गोष्टीची प्रतीती व्हायला सुरुवात होते की विचारांनी पोहोचणे शक्य होणार नाही. विचार करा, परमात्म्याच्या विषयी तुम्हाला काही माहीत नाही, सत्याचा तुम्हाला कुठलाही अनुभव नाही,जीवन काय आहे त्याची कुठलीही प्रतीती नाही, विचार करून तुम्ही काय करावे? कसा विचार करा...

रजनीश वाणी भाग 18

 रजनीश वाणी भाग 18.                          तिसरा स्तर आपल्या वेदनांचा आहे, आपल्या संवेदनांचा आहे .24तास आपण कुठल्या ना कुठल्या संवेदनांनी घेरलेले असतो एकतर आपण सुखाने घेरलेले असतो किंवा दुःखाने वेढलेले असतो.जेव्हा दुःख असते, तेव्हा आपण दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आणि सुखाची आकांक्षा करतो. हेच आपले टेन्शन, हीच आपली समस्या असते ,हाच आपला त्रास असतो. जेव्हा सुख येते, तेव्हा आपल्या मनात ही भीती निर्माण होते की पुन्हा दुःख तर येणार नाही? म्हणून आपण सुखाला पकडून ठेवण्याची इच्छा करतो,आणि दुःखाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा टेन्शन,त्रास आणि तणाव कायम राहतो. माणूस खूप विचित्र परिस्थितीत आहे. दुःख असेल तेव्हा तो दुःख सहन करतो, यासाठी दुःख सहन करतो कि दुःख आहे आणि ते दूर व्हावे,आणि सुख असेल तर यासाठी  दुःखी होतो की सुख तर आहे,पण दुःख येऊ नये. दुःख बाहेर राहावे आणि सुख कायम राहावे. सुखाला पकडू इच्छितो, दुःखाला दूर हटवायला पाहतो. दुःखाला दूर करण्यात आणि सुखाला पकडण्यात ,दोन्ही परिस्थितीत उत्तेजना निर्म...

रजनीश वाणी भाग 17

 रजनीश वाणी भाग 17.                        जीवनात दुःखही आहे आणि सुखही. कारण जन्मही आहे,आणि मृत्यूही.पण या गोष्टीवर बरेच काही अवलंबून आहे, की दोन्हीपैकी आपण कुणाची निवड करून जीवनाचा पाया रचतो? जर कोणी व्यक्ती मृत्यूची निवड करून जीवनाचा पाया रचत असेल,तर मग जन्मही केवळ मृत्यूची सुरुवात वाटेल. आणि जर कुणी जीवनाची निवड करून पाया रचत असेल तर मग मृत्यूही जीवनाची परिपूर्णता आणि जीवनाचा शेवटचा बहार वाटू लागतो.जर एखादा व्यक्ती दुःखाला जीवनाचा आधार म्हणून  निवडत असेल तर सुख ही फक्त दुःखात जाण्याचा उपाय दिसू लागेल आणि जर एखादा व्यक्ती सुखाला जीवनाचा आधार बनवेल तर दुःखही केवळ एका  सुखातून दुसऱ्या सुखात परिवर्तन होण्याची मधली कडी वाटू लागेल. हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे, आपण कशाची निवड करतो याने संपूर्ण जीवनाची व्यवस्था बदलून जाते.जीवनात अशांती आहे, शांती ही आहे. आपण कशाची निवड करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. ध्यान अशांती ला जीवनाच्या आधारापासून हटवण्याची विधी आहे आणि जीवनाच्या आधारात मौन आणि शांती ठेवण...

रजनीश वाणी भाग 16

 रजनीश वाणी भाग 16.                         समस्या तर आहेत,समस्या चारी बाजूंना आहेत,पण तुम्ही स्वतः समस्या नाहीत. तुम्ही त्यांच्या पार जाऊ शकता. तुम्ही त्यांना एका दृष्ट्या प्रमाणे अशाप्रकारे पाहू शकता , जसे तुम्ही शिखरावर उभे राहून दरीमध्ये वाकून पहात आहात. दृष्टा होऊनच तुम्ही समस्यांचे समाधान करू शकता. वास्तविक पाहता एखाद्या समस्येचे दृष्टा होण्यातच ती समस्या अर्धी सुटून जाते,कारण जेव्हा तुम्ही तिला पाहू शकता, तिचे तटस्थ अवलोकन करू शकता, तेव्हा तुम्ही तिच्यापासून बिलकुल दूर राहू शकता, अस्पर्शित राहू शकता.तर तुमच्या डोळ्यात एक स्पष्टता येते.ती स्पष्टता तुम्हाला ही समस्या सोडविण्याची किल्ली प्राप्त करून देते आणि अधिकांशतः  तर साऱ्या समस्या अस्तित्वातच यासाठी असतात की आपल्या जवळ ती स्पष्टता नसते जिने आपण त्यांना समजून घेऊ शकतो. तुम्हाला समस्येच्या समाधानाची आवश्यकता नाही,स्पष्टतेची आहे. समस्येला जर योग्य प्रकारे समजून घेतले गेले, तर ती सुटू शकते कारण समजदारी च्या अभावामुळे समस्या निर्माण होते.तुम्ही समस्या निर्माण...